mohta devi - तीर्थक्षेत्र मोहटादेवी

mohta devi- तीर्थक्षेत्र मोहटादेवी

mohta devi information marathi

तीर्थक्षेत्र मोहटादेवीचे(mohta devi) मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे.. हे मंदिर हे महाराष्ट्रातील देवींच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे.

तीर्थक्षेत्र मोहटादेवी(mohta devi) पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे ९ कि.मी. अंतरावर हे ठिकाण आहे. या मोठ्या मंदिराशिवाय तीर्थक्षेत्र मोहटादेवी चे आणखी एक छोटेसे मंदिर टेकडीवर आहे. या मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुखसोईंनीयुक्त असे दर्शनरांगेसह बांधकाम झाले आहे.

तीर्थक्षेत्र मोहटादेवी(mohta devi) या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणले होते. मंदिरांच्या शिलाखंडांवर दीड वर्षे नक्षीकाम, कोरीव काम सुरू होते. मंदिरांचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झालेले आहे. या नक्षीकामासाठी १५ कारागीर कामाला लावले होते. आजही २०१५ साली या मंदिर परिसरात देवस्थान विकासांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

१० एकर परिसरात, सुमारे २५ कोटी रुपयांच्या देवीभक्तांच्या देणग्यांमधून व दानांमधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले जात आहे. या देवस्थानाच्या आवारात पाच मजली इमारत, भक्त निवास, भोजनकक्ष, व्हीआयपींच्या निवासाची सोय, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थान समितीचे चेअरमन, पदाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय वगैरे उभारली असून कीर्तन, भजन यांसाठी एक भव्य मंडप उभारला आहे.

देवीची आरती दिवसभरात तीन वेळा होते. पहाटे ५ वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो. सकाळी ७ वा. पहिली आरती, दुपारी १२ वा. आणि सायं.७ वा. महाआरती केली जते. भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मंदिर खुले असते. नवरात्रात येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थान समितील भाविक करतात. १५ दिवसांचा हा भक्तिउत्सव असतो. मोहटागडाच्या पायथ्याला असणार्‍या मोहटा गावातून देवीची पालखी, मिरवणूक आयोजित केली जाते.

नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती आहे. रझाकाराच्या काळात मोहटा गावात म्हशीचोरीची आख्यायिका आहे त्यामुळे येथे आजही येथे दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही.


हे पण वाचा :- नवरात्र सणाची संपूर्ण माहिती आणि कथा


तीर्थक्षेत्र मोहटादेवी विषयी माहिती – (mohta devi mandir information marathi)

कुलस्वामिनी जगदंबा तीर्थक्षेत्र मोहटादेवी(mohta devi) ही आई जगाची आई.

श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे ।।

सहास्त्र मुखाचा वर्णिता भागला ।।

वेद जाणु गेला पुढे मौनावाला ।।

या न्यायाने महती कितीही वर्णन करावी तेवढी थोडीच आहे.

ती आईच आहे हीच तिचीमहती. श्री भगवान वृद्धेश्वर (म्हातारदेव) आदीनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ।।

श्री भगवान मच्छिंद्रनाथांची संजीवन समाथी सावरगांव, श्री भगवान कानीफनाथांची संजीवन समाधी मढी,(श्री क्षेत्र कानिफनाथ गड) अशा पुण्यपावन भुमीमध्ये फार फार वर्षापुर्वी श्री भगवान नवनातांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करुन भगवती, महाशक्ती श्री जगदंबादेवीची आराधना केली. या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले. यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या. त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता.

यज्ञाद भवती पर्जन्यो पर्जन्याद अन्न संभवः ।।

श्री भगवान श्री कृष्ण उक्ती प्रमाणे विपुल अशी पर्जन्यवृष्टी होऊन भरपूर अन्य धान्याची निर्मिती झाली. प्राण्याना चारा उपलब्ध झाला. लोक आनंदी झाले. आणि पूर्णाहूती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्यशक्ती प्रगट झाली. तेच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता श्री नवनाथाना व तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आर्शीवचन दिले. त्यावेळी जगत उद्धारार्थ तु याच ठिकाणी रहावे अशी आईस प्रार्थना केली तेव्हा पुढे कार्य आहे हे जाणून योग्यवेळी मी येथे पुन्हा प्रगट होऊन येथेच राहील असे आर्शिवचन दिले.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत । अभ्युत्थान मधर्मस्य संभवामी युगे युगे ।। या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे या नुसार मोहटा गांवच्या दहिफळे बन्सी, हरी गोपाळ, आदिच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ श्री रेणुकामाता येथे प्रगट होऊन स्थानापन्न झाली. व श्री मोहटादेवी या नावाने प्रसिद्ध झाली. तिच्या नावे श्री क्षेत्र मोहटादेवीगड प्रसिद्ध झाले.

जनमानसातील विकाररुपी, मोहादि, राक्षसांचा वध करुन मोहात अडकवून स्धर्माचे विस्मरण होत चाललेल्या माणासास जागे करुन दिव्य शक्ती, दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजु लागले उपासना करु लागले तस तशी त्याची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगु लागले. जीवनातील अगतीकथा, नैराश्य, दुःख दारिद्र्य, क्लेश, दैर्बल्यता, नि राष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ शक्तीसंपन्न बलवाण आहे.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

tags:- mohta devi mahiti – mohta devi temple – mohata devi

1 thought on “mohta devi- तीर्थक्षेत्र मोहटादेवी”

  1. कश्मिरा कैलाशी

    लिखाणात र्‍हस्व दीर्घ च्या अनेक चुका आहेत. श्रुति, सहस्र, भूमि, नवनाथांची, पूर्णाहुती, प्राण्यांना, “तू याचितश्च ठिकाणी..”
    भजू लागले, स्वधर्माचे विस्मरण, अगतिकता, जगू लागले, दौर्बल्य, बलवान असे शब्द हवेत. तसदीबद्दल क्षमस्व!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *