संत तुकाराम अभंग ५८३

५८३
आठवे देव तो करावा उपाव । येर त्यजीं वाव खटपटा ॥१॥
होई बा जागा होई बा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥
जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघसि ना ॥२॥
तुका म्हणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥३॥
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा अर्थ आणि त्यावरील तुमचे मत खाली तुमच्या शब्दामध्ये कमेंट बॉक्स लिहा व चर्चा करा धन्यवाद.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
अर्थ:-ज्या उपायाने देवाची आठवण येते तोच उपाय कर.बाकीच्या खटपटी तू टाकून दे.जागा हो रे बाबा,जागा हो रे बाबा,व्यर्थ कशाला शिन करतोस. तू ज्ञानाच्या ओझ्याने भावरूपी डोहात बुडालास तर वर निघू शकणार नाहीस.अरे देव भेटायला हवा तर भाव भक्तीचाच उपयोग आहे.ज्ञानाने तिथले काही कळणार नाही.
इतर खटपटी म्हणजे योग याग तप अशा वीधी करत असतांना संपुर्ण वेळ नियम पाळण्यात जाते त्या करीता असा ऊपाय कर ज्याने देव नेहमी आठवणीत राहील स्मरणात राहील .वरील कर्म करतांना अधिक श्रमाने शीण येईल म्हणुन जागा हो व परीणामी ज्ञानाच्या उपाधी , दंभ या वृत्ती मुळे भव सागरातच बुडशील व काही केल्या तेथुन निघु शकणार नाही .देव पावावयास फक्त फक्त भाव पाहीजे त्या ठिकाणी ज्ञानाचा काहीच उपयोग नाही असेच तुकाराम महाराज या अभंगा द्वारे सांगताहेत……
इतर कोणतीहि खटपट करालतर तुम्हाला शिणच येईल जर तुम्हाला सिन घालवायचा असेल तर त्याला एकच उपाय आठवे देव तो करावा उपाय
इतर खटपटी म्हणजे योग याग तप अशा वीधी करत असतांना संपुर्ण वेळ नियम पाळण्यात जाते त्या करीता असा ऊपाय कर ज्याने देव नेहमी आठवणीत राहील स्मरणात राहील .वरील कर्म करतांना अधिक श्रमाने शीण येईल म्हणुन जागा हो व परीणामी ज्ञानाच्या उपाधी , दंभ या वृत्ती मुळे भव सागरातच बुडशील व काही केल्या तेथुन निघु शकणार नाही .देव पावावयास फक्त फक्त भाव पाहीजे त्या ठिकाणी ज्ञानाचा काहीच उपयोग नाही असेच तुकाराम महाराज या अभंगा द्वारे सांगताहेत……
सगुण आणि निर्गुण साधनेचा तुलनात्मक परिचय या अभंगात दिसून येतो, देवाचे स्वरूप जाणण्ययाचा आग्रह निर्गुण भक्ती मध्ये केला जातो तर त्याला आठउन प्रेम करणे सगुण भक्ती मध्ये अपेक्षित असते, देवाची प्राप्तीसाठी सोपा उपाय सोडून अवघड साधने च्या नादी लागु नये.