सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३१

सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३१

सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि ।
शेज बाज वोवरी ब्रह्मांडाची ॥१॥
गृहदारा दिनमणि तेज देऊनि मेदिनी ।
मेरु प्रदक्षणि आप होय ॥ध्रु०॥
ऐसा हा सांवळा सतेज साजणी ।
म्यां आपुल्या आंगणी देखीयला ॥२॥
ज्ञानदेवा साजण सांवळिये प्रभेचें ।
मी माझें मोहाचें हरिरुप ॥३॥

अर्थ:-
सावळा श्रीहरि सावळ्या तेजाने तळपत असुन त्यांने ब्रह्मांडाच्या बाज करुन त्यावर शेज केले आहे. घरदार सर्व पृथ्वीच तेजस्वी करुन तो मेरु प्रदक्षिणा करत आहे. हे सखी असा तेजःपुंज सावळा त्याला मी माझ्या अंगणात पाहिला. हे सखी त्या सावळ्या प्रभेला पाहताच मी त्याला मोहाने पाहायला गेले तर मोहच हरिरुप झाला असे माऊली सांगतात.

सांवळियाचें तेज सांवळा श्रीहरि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३१

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.