सकळ साधनां वरिष्ठ – संत निळोबाराय अभंग – १०५८

सकळ साधनां वरिष्ठ – संत निळोबाराय अभंग – १०५८


सकळ साधनां वरिष्ठ सार ।
विठ्ठल नामाचा उच्चार ।
आणखी नका वोरबार ।
शीणचि उरेल पुढती ॥१॥
धांवा म्हणोनि अवघे वेगीं ।
चितचि ठेवा पांडुरंगी ।
संसारचि तुटेल मागी ।
फिटेल धगी त्रिविध तापा ॥२॥
आवडी नाचतां पैं गातां ।
पांडुरंग प्रेमदाता ।
अवघी तोडूनियां चिंता ।
करील माथा बैसणें ॥३॥
ऐसें जाणोनियं निरुती ।
करा हरिनामें आवृत्ति ।
मग हा कळिकाळाचें हातीं ।
नेदील तुम्हां सर्वथा ॥४॥
निळा म्हणे सुगम ऐसें ।
संतीं दाविलें सौरसें ।
जतन करिती जे मानसें ।
ते तो पावती सर्वथा ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सकळ साधनां वरिष्ठ – संत निळोबाराय अभंग – १०५८