संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग – पदे

संत जनाबाई अभंग – पदे

३३७
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला दरिद्री तो भाग्यवंत केला। धुंद झाला तुझा दरबार।।ध्रु।।
चोरट्याचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ।। १ ।।
वैरिवासी दिधली मोक्षसिद्धि। कपटिया दिली महानिधी सेवकाच्या गा न मिळे चिंधी चालकासी त्रैलोक्य भायें बंदी ||२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली कळी स्वकुळा लावियेली। यादववृंदा ही गोष्ट बरी नाहीं केली।।३।।
सत्त्वत्वानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ । सखा म्हणविसी त्याचें नासी बळ । जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ||४||

३३८
माझें अचडें बचडें छकुडें गे राधे रूपडें पांघरूं घालीत कुंचडें ।।धृ।।
हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा पानें भुलविल्या गोपिबाळा ॥१॥
हरि माझा गे नेणता करी त्रिभुवनाथा पाँगता जो कां नांदे त्रिभुवनीं ॥२॥
ऐसे देवाजीचे गड़ी। पेंद्या सुदामाची जोडी बलिभद्र त्याचा गडी ॥३॥
जनी म्हणे तूं चक्रपाणी खेळ खेळतो वृंदावनीं लुब्ध झाल्या त्या गौळणी ।।४॥

हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग

३३९
विठोबा मला मूळ धाडा । धांवत येईन दुडदुडां चरणीं लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा || १||
कर ठेवुनि कटावरी उभा राहिला विटेवरी। मुगुट घातला सरीं। कलगी खोविली वरी॥२॥
पितांबर नेसूनियां पिवळा गळां में तुळसीच्या माळा । कीं रूप सुंदर सांवळा तेज झळके झळाळा ||३||
नामदेवाचें कौतुक मला सांपडलें माणीक विठोबा पाहुनी तुझें मुख। हारपली माझी तहानभूक ॥४॥
विठोबा तुझी संगत बरी जैसा चंदन मैलगिरी। संत चालले पंढरी निशाण पताका जरतारी||५||
जसी मोहोळासी लुब्ध मासी । तसी तूं सखी माझी होसी सुख दुःख सांगेन तुजपासी माझा जीव होईल खुषी ||६||
काली मध्यान रात्र झाली फेरी विठ्ठलाची आली जनी म्हणे चूक पडली भेट नाही विठ्ठलाची झाली ॥७॥

३४०
नवल वर्तलें नवल वर्तलें नवल गुरूचें पायीं । कापूर जळूनि गेला तेथे काजळी उरली नाहीं ॥१॥
साखर पेरुनी ऊंस काढिला कान झाला डोळा। निवर बायको प्रतार तान्हा सासरा तो भोळा ॥२॥
नवल वर्तलें नवल वर्तलें नवल चोजवेना डोहामाजीं मासोळीनें वांचविलें जीवना ॥३॥
नवल वर्तलें नवल वर्तलें अनाम चक्रपाणी गोकुळ चोरून नेलें तेथे कैचि दासी जनी ||४||

३४१
खंडेराया तुज करितें नवसू । मरूं देरे सासू खंडेराया ।। १ ।।
सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरूं दे सासरा खंडेराया ।।२।।
सासरा मेलिया होईल आनंद मरूं दे नणंद खंडेराया ||३||
नणंद मरतां होईन मोकळी गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडो अवधे मरूं दे। एकटी राहूं दे पायापाशीं ।।५।।


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *