संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग -श्री संत नामदेव चरित्र

संत जनाबाई अभंग – श्री संत नामदेव चरित्र

२७९
गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देई मला ।। १।।
ऐसा पुत्र देई भक्त ज्याला आवडे पंढरीनाथ || २ ||
शुद्ध देखोनियां भाव पोटी आले नामदेव ॥३॥
दामशेटी हरुपला दासी जनीनें ओवाळिता४॥

२८०
गोणाई राजाई दोषी सासू सुना दामा नामा बाप लेक।।१॥
नारा विठा गाँदा महादा चव पु जन्मले पवित्र त्याचे वंशीं ॥२॥
लाडाई गोडाई येसाई साखराई। चवधी सुना पाहीं नामयाच्या ॥३॥
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी वेडीपिशी जनी नामयाची।।४।।

हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग

२८१
सुंबाचा करदोडा रकट्याची लंगोटी नामा वाळवंटी कथा करी।।१।।
ब्रह्मादिक देव येवोनि पाहाती। आनंदें गर्जती जयजयकार ।।२।।
जनी म्हणे त्याचें काय वर्णू सुख पहाती जे मुख विठोबाचें ॥३॥

२८२
अवधियांशीं मार्गे संत झाले नाम्या ऐसें कोण बोले ।।१।।
नामा जातां राउळासी देव बोले केवल सांगावें दासी जनीचें पद लिहावे ॥२॥

२८३
पूर आला पंढरीसी पाणी लागे पायरीसी ॥१॥
संतजन हो मिळाले । उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥
नामा सांगे विठोबासी। उतार द्यावा भिंवरेसी ॥३॥
दीनवत्सल महाराज। जनी म्हणे केलें काज ॥४॥

२८४
सण दिवाळीचा आला नामा राउळासी गेला ॥१॥
हातीं धरूनी देवासी चला आमुच्या घरासी ॥२॥
देव तेथुनी चालिले नामयाच्या घरा आले ॥ ३॥
गोणाईनें उटणें केलें दामाशेटीनें स्नान केलें ।।४।।
पदर काढिला माथ्याचा बाळ पुशिला नंदाचा ||५||
हातीं घेउनी पंचारती । चक्रपाणी ओवाळती ||६||
जेऊनियां तृप्त झाले। दासी जनीनें विडे दिले ।।७॥

२८५
वोढिला ताडिला । देव भक्तीनें फाडिला ।।१।।
एका प्रेमा नामासाठीं । भक्ति काडियला कंठीं ॥२॥
झाला नाम्याचा मजूर । मोळ्या बांधाट्याचा थर ।।३ ॥
भिंती चांदया रचिले। त्याचें छप्पर शेकारिलें ॥४॥
वरी सोडूनियां पाणी धन्य भक्त म्हणे जनी॥५॥

२८६
चारा पाणी मुसळ धारा । तेणें मोडिलें छपरा ।। १ ।।
मग विठाई धांवली हातीं चक्र धांवत आली ॥२॥
वासे लाविले चौफेर क्षणामध्यें केलें घर ||३||
जागा झाला नामदेव द्वारीं उभे पंढरिराव ।।४।।
डोयीं ठेवून पायांवरी। दासी जनी चरण चुरी ॥५॥

२८७
ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवें जेविसीं नाहीं हृषीकेशी म्हणतसे ||१||
सांगितलें एक भलतेंचि बोलसी। आहे याचि प्रांति ज्ञानेश्वरा ||२||
बाहियेलें त्वरें ऐसें कांहीं काम उठे मेघश्याम तांतडीनें ॥ ३॥
निरोप देवोनि सांगावा एकांती म्हणे जनीप्रति पांडुरंग ॥४॥
देव म्हणे नाम्या ऐकायें वचन देई साधोन वेळ तुझी ॥५॥
जनी म्हणे आतां समजलें मज धरीन उमज येथोनियां ॥६॥

२८८
आषाढी एकादशी। नामा होता उपवासी।।१।।
देवें गरुडा धाडिला । वेगीं बोलाविलें त्याला ॥२॥
राही म्हणे पांडुरंगा। कोणा बोलाविलें सांगा ||३||
माझ्या जीवींचें जीवन त्यासी बोलाविलें जाण ॥४॥
ऐसा भक्तराज निका । दासी जनीचा आत्मसखा ॥५॥

२८९
नामा येऊनियां पाहे । आजि कौतुक दिसताहे ।।१।।
व्रत निवेदी राजाई लागे नामयाचे पायीं ॥२॥
नामा म्हणे या द्रव्यासी आम्ही नातळों मानसीं ॥ ३॥
वेगीं बोलवा ब्राह्मण करूं आतां संतार्पण ॥४॥
हातीं टाळ दिंडीगान। हेंचि आमुचें सर्व धन ||५||
ऐसें आश्चर्य देखोनी। जनी हांसतसे मनी ।।६।।

२९०
करुनी आरती। नामा आला घराप्रती ।।१।।
तेणें धरियेलें व्रता। अन्न न घ्यावें सर्वथा ||२||
ऐसा जाणोनियां नेम अनुभवी पुरुषोत्तम ||३||
आषाढी एकादशी। विप्रवेयें इषीकेशी ||४||
आला नामयाचे सदनीं । नाम गाय दासी जनी ॥५॥

२९१
नमुनी ब्राह्मण म्हणे मज यायें अन्न ।।१।।
नामा म्हणे एकादशी इच्छित यायें फराळासी ॥२॥
अन्नावांचोनी आतां मज नकोरे सर्वथा ।।३।।
हातापायांची बेगडी विप्रं घातली मुरकुंडी ||४||
जीव सोडी चक्रपाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥

२९२
जनसमुदाय मिळाला धिक्कारिती नामयाला ।। १ ।।
विप्र बोलावुनी वेगें। प्रेत नेलें चंद्रभागे ॥२॥
मोठें रचुनी सरण। मध्यें निजविला ब्राह्मण ।। ३।।
शय्यागमनीं पहुडला म्हणे अग्नि द्या आम्हांला ||४||
अग्नि दिला जयाप्रती । देव विमानीं पाहती ||५||
विस्मित झाला चक्रपाणी प्रगट होय म्हणे जनी ॥ ६ ॥

२९३
अनी लागतां अंगासी घाबरला हृषीकेशी ।।१।।
निजरूपें प्रगटला चरणीं मस्तक ठेविला ॥२॥
सोनसळा वैजयंती। कोटि सूर्य ते लोपती ।।३।।
नामा म्हणे विठोबाला भला अंत रे पाहिला ॥४॥
हातीं धरुनी नामवासी। पाठ थोपटी हृषीकेशी ।।५॥
गेला राउळीं चक्रपाणी। भावें वंदी दासी जनी ॥६॥

२९४
ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित।।ध्रु।।
हिरण्यकश्यपकुळीं नामा प्रल्हाद । पद्मीणी नाम माझें श्रेष्ठ दासीचें पद।।१।।
दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त मंथरा नाम माझें भरतें मारिली लाथ ।।२।।
द्वापारी कृष्णसेवा उद्धव जन्मला कुबज्या नाम माझें देवें उद्धार केला ॥३॥
कलींत नामदेव विठ्ठलचिंतनीं । त्याचीच सेवेलागीं दासीं जन्मली जनी ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *