संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग – तीर्थावळी

संत जनाबाई अभंग – तीर्थावळी

३३२
जावोनी राउळा जोडूनियां हात बोले ज्ञानेश्वर विठोबासी।।१॥
करावीं हीं तीर्थे आवड अंतरीं। घ्यावें बरोबरी नामदेवा। २॥
ऐकतांचि ऐसें म्हणे पांडुरंग न धाडितां राग येईल तुज ॥३॥
तयाविण मज घडी जरी जाय। युगा ऐसी होय ज्ञानेश्वरा ||४||
जनी म्हणे मग नामया पाचारी कृपालुवा हरि मायबाप ॥५॥॥

३३३
जाय बरोबरी नामया तूं जाय न चले उपाय कांहीं येथें ॥१॥
करूं काय मज पडिलें सांकडें । उल्लंघेना भीड मज याची ॥२॥
नामा म्हणे ऐका स्वामी नारायणा। एक विज्ञापना परिसावी ||३||
कटावरी कर नाहीं ज्या देवाचे न घे मी तयाचें दरुशन ||४||
मारितांचि हाक यावें त्वां झडकरी। बरें म्हणे हरि नामयासी ||५||
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान चांगया। जनी म्हणे तया सांगतसे ॥६॥

हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग

३३४
तुम्ही सकळिक संत आहांत सज्ञान हैं माझें अज्ञान फार आहे॥१॥
याजबरोबर चालावी हो वाटे। मोडतील कांटे सांभाळावें ||२||
हळूहळू जावें करूं नका घाई चालायाची नाहीं संवय त्यासी ॥३॥
लागतांचि भूक न धरी हा निर्धार घ्यावा समाचार क्षणक्षणां ॥४॥
जनी म्हणे ऐसें बोलिला घननीळ । नेत्रींनी जातसे ||५||

३३५
वियोग नाम्याचा न साहे गोपाळा । न जाय राउळा पांडुरंग ॥१॥
पद्माळ्यांत तेव्हां राहे विश्वंभर । कले समाचार रुक्मिणीसी।।२।।
चलायें मंदिरी स्वामी पुरुषोत्तमा येईल मे नामा माझा जेव्हां ॥
तयाविण मज दाही दिशा ओस। न लगे चित्तास गोड कांहीं ||४||
जनी म्हणे ऐसी आवड नाम्याची । म्हणोनियां त्याची झाले दासी॥५॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *