संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग – विठ्ठल भेटपर

संत जनाबाई अभंग – विठ्ठल भेटपर

 

६९
तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥
काय करूं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥२॥
जन्मा येऊनियां दुःख नाहीं पाहिले श्रीमुख॥३॥
लले पुरविसी आमुचे म्हणे जनी ब्रीद साचें ॥४॥

 

७०
वाट पाहतें मी डोळां । कां गा न येसी विठ्ठला॥१॥
तूं वो माझी निज जननी। मज कां टाकियलें बनीं ॥२॥
धीर किती धरूं आतां। कब घालीं पंढरिनाथा ॥३॥
मला आवड भेटीची धनी घेईन पायांची ॥४॥
सर्व जिवांचे स्वामिणी म्हणे जनी मायबहिणी ॥५॥

हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग

 ७१
येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई॥१॥
 भीमाआणिचंद्रभागातुझेचरणीच्यागंगा॥२॥
 इतुक्यांसहितत्यांचापायेंमाझेरंगणीनाचायें॥३॥
 माझा रंग तुझिया गुण म्हणे नामयाची जनी ॥४॥

 

७२
आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥
येई बेई पांडुरंगे। भेटी देई मजसंगें ॥२॥
मी बाबुडतें भवजळीं । सांग बरवी ब्रीदावळी ॥३॥
राग न धरावा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 

७३
विठोबारायाच्याअगालेकवळाजाऊनीकळवळासांगामाझा॥१॥
विठोबारायाच्या अंगा मुख्य प्राणा भेटवी निधाना आपुलिया ॥२॥
अंगेक्षेत्रमावेसखेपंढरीयेमोकलितेपाचजीवजातो॥३॥
विश्वाचियेमातेंसुखाचेंअमृतसकापंढरीनाथविनवीतरी॥४॥
तूं मायबहिणी देवाचे रुक्मिणी । धरोनियां जनी घालीं पायीं ॥५॥
७४
कां गे निष्ठुर झालीसी। मुक्या बाळातें सांडिसी॥१॥
तुज वांचोनियां माये। जीव माझा जावो पाहे॥२॥
मीवत्समाझीमाय । नयेआतांकरूंकाय॥३॥
प्राण धरियेला कंठीं। जर्नी म्हणे देई भेटी ॥४॥

 

७५
माझिये जननी हरिणी । गुंतलीस कवणे वनीं॥
मुकें तुझें मी पाडस चुकलें माये पाहे त्यास ॥२॥
चुकली माझिये हरिणी । फिरतसे रानोरानीं ॥३॥
आतां भेटवा जननी। विनवितसे दासी जनी ॥४॥
७६
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतित उद्धरिले ॥१॥
धन्यनामदेवधन्यपंढरिनाथ । तयानेअनाथउद्धरिले॥२॥
धन्यज्ञानेश्वरधन्यत्याचाभावत्याचेपायदेवआम्हांभेटी॥३॥
नामयाची जनी पालट पै झाला भेटावया आला पांडुरंग॥४॥

 

७७
चिंतनी चित्ताला। लावी मनाच्या मनाला ॥१॥
उन्मनीच्या मुखा आंत पांडुरंग भेटी देत ॥२॥
कवटाळुनी भेटी पोटीं जनी म्हणे सांगूं गोष्टी ॥३॥
७८
देहाचा पालट विठोबाचे भेटीं जळ लवणा गांठी पडोन ठेली ॥१॥
धन्यमायबापनामदेवमाझातेपंढरिराजादाखविलें॥२॥
दिवस भाव बिलाचे पाय चित्त साथींचे ठायीं मावळले ॥३॥
नामयाचे जनी आनंद में झाला भेटावया आला पांडुरंग ॥४॥

 

७९
पुंडलिके नवल केलें । गोपिगोपाळ आणिलें ॥१॥
हेंचि देई हृषीकेशी । तुझें नाम अहर्निशीं ॥२॥
नलगे आणिक प्रकार। मुख हरी निरंतर ॥३॥
रूपन्याहाळिनडोळां । पुढेनाचेनवेळोवेळां॥४॥
सर्वांठायीं तुज पाहे । ऐसें देऊनि कर्री साहा ॥५॥
धांवा करितां रात्र झाली । दासी जनीसी भेट दिली ॥६॥
८०
झाडलोट करी जनी केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसाभक्तिसीभूलला । नीचकामेकरूंलागला॥३॥
जनी म्हणे विठोबाला काय उतराई होऊं तुला ॥४॥
८१
पूर्वी काय तप नेणें में हो केलें निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥
येऊनियां देव दळू लागे अंगे। रखुमाईचा संग दूर केला ॥२॥
तैसाथि में संगें येऊनि बाहेरी वेचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥
ओझेंझालेंम्हणूनिपाठीपीतांबरीघेऊनियांघरीआणितसे॥४॥
ऐसें जेथ काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥

 

८२
एकटी तूं गाणं गाती दुजा शब्द उमरे पाशी।।१॥
कोण गे तुझ्याबरोबरी गाणे गाती निरंतरीं ॥२॥
पांडुरंगमाझापितारखुमाईझालीमाता॥३॥
ऐशियाच्याघरीआलेंजनीम्हणेधन्यझालें॥४॥
८३
जनी डोईनें गांजली विठाबाई धावित्रली॥१॥
देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥२॥
केशविचरुनी मोकळे केले जनी म्हणे निर्मळ झालें ॥३॥
८४
जनी बैसली न्हायाला पाणी नाहीं विसणाला ॥१॥
घागर घेऊनि पाण्या गेली मार्गे मागें धांव घाली ॥२॥
घागरघेऊनियांहातीं । पाणीरांजणांतओती॥३॥
ऐसा येरझारा केल्या रांजण घागरी भरिया॥४॥
पाणी पुरे पांडुरंगा दासी जनीच्या अंतरंगा॥५॥

 

८५
एके दिवशीं न्हावयास पाणी नव्हतें विसणास ॥१॥
देव धांवोनियां आले। शीतळ उदक घे घे बोले ॥२॥
आपुल्या हातें विसणी घाली जनीच्या डोयीं पाणी ॥३॥
माझ्या डोईच्या केसांस न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥
तेणें मुरडी केसांस । कां म्हणे उगीच बैस ॥५॥
आपुल्या हातें वेणी घाली । जनी म्हणे माय झाली ॥६॥

 

८६
तुळशीचे बनीं। जनी उकलीत वेणी ॥१॥
हातीं घेऊनियां लोणी डोई चोळी चक्रपाणी॥२॥
माझे जनीला नाहीं कोणी म्हणूनी देव पाली पाणी।।३॥
जनी सांगे सर्व लोकां न्हाऊं पाली माझा सखा ॥४॥
८७
साळी सडायास काढी । पुढे जाउनी उखळ झाडी ।।१।।
कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ।।२।।
सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥
पायीं पैंजण हातीं कड़ीं। कोंडा पांखडुनि काढी।।४।।
हाता आला असे फोड। जनी म्हणे मुसळ सोड ॥५॥

 

८८
ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी ।।१।।
उणेंपडोंनेदीत्याचेंवारेंसोसीआघाताचें||२||
तयावीणक्षणभरी । कदाआपणनव्हेदुरी||३||
आंगा आपुले ओडोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

 

८९
पक्षी जाय दिगंतरा बाळकांसी आणी चारा ।।१।।
घार हिंडते आकाशीं झांप घाली पिल्लांपासी ॥२॥
माता गुंतली कामासी। चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥
वानर हिंडे झाडावरी। पिली बांधुनी उदरीं ॥४॥
तैसी आम्हांसी विठ्ठल माये। जनी वेळोवेळां पाहे॥५॥
९०
भक्त जें जें कर्म करिती। तें तू होसी कृपामूर्ती ।।१।।
हैं तो नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ||२||
वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं । ३॥
धूतां लाज नाहीं तुला दासी जनी म्हणे भला ॥४
९१
देव भावाचा लंपट सोडुनी आला हो वैकुंठ ।।१।।
पुंडलिकापुढे उभा सम चरणांवरी शोभा ॥२॥
हात चक्र पायीं वांकी। मुख भक्ताचें अवलोकीं ।। ३॥
उभा बैसे न सर्वथा । पाहे कोठे भक्तकथा ||४||
सर्वसुखाचा सागर । जनी म्हणे शारंगधर ||५||

 

९२
दुःशासन द्रौपदीसी घेउनी आला तो समेसी।।१।।
दुर्योधन आज्ञा करी ना करावी सुंदरी।। २।।
आतां उपाय कृष्णा काय। धांवें माझे विठ्ठल माय।।३।।
निरी ओढितां दुर्जन झालें आणिक निर्माण॥४॥
ऐसी असंख्य फेडिलीं देवीं तितुर्की पुरविलीं ॥५॥
तथा संतां राखिलें कैसे जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥
९३
ब्राह्मणार्थेपोरमागेदूधरहेफार||१||
माता म्हणे बालकासी दूध मार्गे देवापाशीं ॥२॥
क्षीराब्धीची वाटी । म्हणे जनी लावी ओंठी ॥३॥
९४
पंढरीच्या राया। माझी विनवणी पायां।।१।।
काय वर्णू हरिच्या गोष्टी अनंत ब्रह्मांडें याचे पोटीं ॥२॥
सेनान्हावीयाचेघरींअखंडरावेविठ्ठलहरी||३||
राम चिंती ध्यानीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

 

९५
मिलणीची फळें कैशीं चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥
भावें तिचीं अंगिकारी सर्वाहुनी कृपा करी ||२॥
गुज वान्नरांसी पुसावें। राक्षसातें हो जिंकावें ॥३॥
वान्नर अवधे भुभुःकार बोलताती रामासमोर ॥४॥
आज्ञाकरावीआम्हांसी। रावणआणितोंतुम्हांपासीं||५||
तुझ्या नामाच्या प्रतायें। हनुमंत गेला जी संतापें ॥६॥
सीताशुद्धि करुनी आला दासी जनीस आनंद झाला ||७||

 

९६
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ।।१।।
त्याचा झाला म्हणीयारा। राहे घरी घरी धारा||२||
देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ||३||

 

९७
चोखामेळा संत भला तेणें देव भुलवीला।।१।।
भक्ति आहे ज्याची मोठी त्याला पावतो संकटीं ॥२।।
चोख्यामेळ्याचीकरणी । तेणेंदेवकेलाऋणी||३||
लागा विठ्ठलचरणीं । म्हणे नामयाची जनी ॥३॥

 

९८
माळियाचा लेक झाला। सेखीं कुम्यांलागीं गेला ॥ १ ॥
चांभाऱ्यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥
तुरका घरीं विणी म्हणे नामयाची जनी ॥३॥
९९
माझा लोभ नाहीं देवा तुझी करीं ना मी सेवा ॥ १॥
नाहीं अंगीं धोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥ २ ॥
रागा घेऊनि काय करिसी । तुझें बळ आम्हांपासीं ।।३।।
नाहीं सामर्थ्य तुज हरी जनी म्हणे धरिला चोरीं ॥४॥

 

१००
द्रौपदीकारणपाठीराखानारायण||१||
गोरा कुंभाराच्या संगें चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥
कविराच्याबैसोनिपाठींशेलेविणतांसांगेगोष्टी||३||
चोख्यामेळ्यासाठीढोरेंओडीजगजेठी||४||
जनीसंगें दळू लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ||५||

 

१०१
देव भक्तांचा अंकित कामे त्याचीं सदा करित ।। १ ।।
त्याचें पडों नेदी उणे होय रक्षिता आपण ॥२॥
जनी म्हणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥
१०२
वाळेभोळे ठकविशी। तें तंव न चाले आम्हांपाशीं ॥१॥
गर्व धरिसी नामाचा सोहं सोहं गजेंवाचा ।।२।।
आशा तृष्णा तुम्हांपाशीं नाहीं म्हणे जनी दासी।।३।।

 

१०३
जेवीं जेवीं वा मुरारी । तुज वाडिली शिदोरी ॥१॥
कनकाचे ताटीं। रत्नजडित ठेविली वाटी ॥२॥
आमुचें ब्रह्म सारंगपाणी हिंडतसे रानोरानीं ।।३।।
गोपाळांचे मेळीं । हरि खेळे चेंडूफळी ॥४॥
तुळसीचे वनीं उभी राहे दासी जनी ||५||
१०४
जनी म्हणे पांडुरंगा माझ्या जीवींच्या जीवलगा। विनवितें सांगा। महिमा साधुसंतांचा ॥१॥
कैसी वसविली पंढरी। काय महिमा भीमातीरीं । पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥
कैसा आला हा गोविंद। कैसा झाला वेणुनाद । येउनी नारद । कां राहिला ॥३॥
कृपा करा नारायणा सांगा अंतरींच्या खुणा येऊं दे करुणा दासी जनी विनवितसे ॥४॥

 

१०५
दुर्योधना मारी | पांडवासी रक्षी हरी ।।१।।
पांडव वनवासी जाये। तयापाठीं देव आहे ।।२।।
उर्णे नपडे यांचे काम पुरवी हो मनाये ॥३॥
जनी म्हणे विदुराच्या कन्या भक्षी हो प्रीतीच्या॥१४॥
१०६
स्कंधी ऋषि तो वाहिला बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
भक्ता आधीन होसी त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥
त्याचे गर्भवास सोसी । कष्टी होता अंबऋषी ॥३॥
सर्व दु:खासी साहिलें । जनी म्हणे बरवें केलें ॥४॥
१०७
भक्तीसाठी याति नाहीं नाहीं तयासी ते सोई।।१।।
रोहिदास तो चांभार त्याचा करी कारभार ॥२॥
जो कां भक्त यातिहीन देव करी त्याचा मान ॥३॥
त्यासी भक्ताचा आधार वाट पाहे निरंतर ॥४॥
जनी म्हणे भक्तासाठी विठो सदा गोण्या लोटी॥५॥

 

१०८
चोखामेळा अनामिक भक्तराज तोचि एक ॥१॥
परब्रह्म त्याचे घरीं न सांगतां काम करी ॥२॥
रोहिदास तो चांभार पाहे मोमिन कबीर ||३||
नेमी जनी नीच दासी। रंगी वेढी नागर पिशी ॥४॥
१०९
देव तारक तारक। देव दुष्टांसी मारक ।। १ ।।
गीतेमध्यें आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
शत्रुलागी आधी मारी। भक्तसंकटीं रक्षी हरी ॥३॥
जनी म्हणे कृपा करी भाव पाहोन अंतरीं।॥४॥
११०
पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी ।।१।।
तैंच सखा नामयाचा एके ठायीं जेवायाचा ||२||
त्याच्या उच्छिष्टाचा ग्रास। जनी हात उचली त्यास ॥३॥

 

१११
भूत झालें ऋषि पोटीं लावियेलें मृगापाठीं ।। १ ।।
विश्वामित्रा घाला घाली पोटीं शकुंतला आली ॥२॥
भगांकित केला इंद्र भूतानें झडपिला ||३॥
तेंचि झालें है भारत । म्हणे जनी केली मात ॥४॥
११२
दोहींकडे दोही जाया मध्ये गोरोबाची शय्या ।।१।।
गोरा निद्रिस्त असतां कपट करिती त्याच्या कांता ॥२॥
गोरोबाचे दोन्ही हात आपुल्या हृदयावरी ठेवित ।।३॥
जागा झाला गोरा भक्त। जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥
११३
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ।।१।।
पांचाळीसी वस्त्रे देत | पुरवितो जगन्नाथ॥२॥
जनी म्हणे भाग्यवंत। तिच्या भावाचा अंकित ॥ ३॥

 

११४
बाप श्रोतियाचा राजा। कैसी उभारिली ध्वजा ।।१।।
एक झाला परिक्षिती। ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥ .
भागवत रससुखें । द्रौपदी वाढी सावकाशें ।।३।।
ज्याची ऐकतां गर्जना कंप काळाचिया मना ।।४।।
सात दिवस वृष्टि झाली। जनी म्हणे मात केली ॥५॥

 

११५
मांडियेला डाव । कौरवांनीं दुष्ट भाव ।।१।।
टाकियेला फांसा। पांडव गेले वनवासा।।२।।
वना गेलेपांडवबळी। दिनकरें दिवली थाळी।।३॥
पांडवांचीकृष्णाबाई। जनीम्हणेमाझीआई||४||
११६
कोणे एके दिवशीं विठो गेला जनीपाशीं । ।१॥
हळूचमागतोखायासीकायदेऊंवामीतुसी||२||
हाती धरून नेला आंत यादी पंचामृत भात ॥३॥
प्रेमसुखाचा डेकर दिला जनी म्हणे विठो घाला ॥४॥
११७
एके दिवशीं वाडियांत देव आले अवचित ।।१।।
अवघींपायांसलागलीदेवेंत्यांवरीकृपाकेली||२||
बाहेरकामासीगुंतवेंदेवेंमजलाविचारिलें||३||
बाहेरआहेसवोबोलतीदेवमजलाहाटकिती||४||
हात धुऊनि जवळ गेल्ये कोण गे जनी हसून बोले ॥५॥

 

११८
दळण्याच्या मिषें। विठ्ठल सावकाशें ।।१।।
देहबुद्धीचें वैरण द्वैत खडा रे निसून ।।२।।
एकलीच गातां। दुजा साद उमटतां ।।३।।
कोण तुझे बरोबरी। साद देतो निरंतरीं।।४।।
खूण कळली नामदेवा । विठ्ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥

 

११९
मग हांसोनि सकळी पाहूं देव कैसा बळी।।१।।
आलेनामदेवाघरीप्रेमेंभुललासेहरी||२||
घालीजातियावैरण। गायआवडीचेंगाणें||३||
पुढें देखे ज्ञानेश्वरा देव झालासे घाबरा ॥४॥
जनी म्हणे पंढरिनाथा जाय राउळासी आतां ॥५॥

 

१२०
निवृत्ति पुसत कोठे होते पंढरिनाथ ॥१॥
खूणकळलीहषीकेशीसांगों [नकोनिवृत्तीसी||२||
उत्तरदिलेंज्ञानदेवें । नवलकेवढेसांगावें||३||
शिव बंदी पायवणी नये योगियांचे ध्यानीं ॥४॥
द्वारी उभे ब्रह्मादिक गुण गाती सकळिक॥५॥
जनीस दी देव तिचा देखोनियां भाव।।६।।

 

१२१
काकड आरती। करावया कमळापती ।।१।।
भक्तमिळालेसकळरितेंदेखिलेंदेऊळ||२||
ज्ञानेश्वर बोले आतां देव कोठे गेले ॥३॥
ठावे जाहलें अंतरी देव जी जनी घरी २४॥
१२२
य जाय राउळासी नको येऊं आम्हापाशीं ॥१॥
जाऊं आम्ही बरोबर झाला तिचा हो चाकर||२||
तिजसंगेकामकरीऐसेजागादेवहरी||३||
यहं हातीं धुणें केलें जनी म्हणे ॥४

 

१२३
आतां पुरे हा संसार। कोठें फेडूं उपकार ।।१।।
सांडूनियां थोरपण करी दळण कांडण ॥ २॥
नारिरूप होउनीहरीमाझेंन्हाणेधुणेंकरी||३||
रानाजायेवेंचीशेणीशेंखीवाहेघरीपाणी||४||
ठाव मार्गे पायापाशीं । म्हणे नामयाची दासी॥५॥

 

१२४
धुणे घेऊनि कांखेसी जनी गेली उपवासी ॥१॥
मार्गे विठ्ठल धांवला म्हणे कां टाकिलें मला ।। २ ।।
कां गा धांवोनि आलासी जाय जाय राउळासी ॥३॥
चहूं हातें धुणें केलें जनी म्हणे बरें झालें ॥४॥
१२५
जनी जाय शेणासाठीं उभा आहे तिच्यापाठी ।।१।।
पितांबराची कांस खोची मार्गे चाले जनावाई॥२॥
गोऱ्या वेचूनि बांधिली मोट जनी म्हणे द्यावी गांठ।।३।।
मोट उचलून डोईवर घेई मार्गे चाले जनाबाई ||४||

 

१२६
राना गेली शेणीसाठी लागे विठोपाठीं ।।१।।
पितांबरऔधेखाँबीपायींशोभापारखावी||२||
रिती बांधितांचि मोट जनी म्हणे द्यावी भेट||३॥

 

१२७
जनीचिया बोलें करी नित्य काम। वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥
जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं तयाचे चरणीं ओढवी माथा।।२।।
महेशादि देव तेहि तथा ध्याती । जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥

 

१२८
आई मेली बाप मेला मज सांभाळी विठ्ठला ।।१।।
हरी रे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ||२||
 विठ्ठल म्हणे रुक्मिणी माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥
हातींघेउनीतेलफणीकेंसविंचरूनघालीवेणी||४||
वेणी घालुन दिधली गांठ। जनी म्हणे चोळ वा पाठ॥५॥
जनी म्हणे बा गोपाळा। करी दुबळीचा सोहळा ||६

 

१२९
एक प्रहर रात्र झाली। फेरी विठ्ठलाची आली ॥१॥
 नामा म्हणे जनी पाहे द्वारी उभा कोण आहे ।।२।।
प्रभा घरांत दाटली एक सराद सुटली ।। ३।।
एकमेकां आलिंगन नामा म्हणे जनी धन्य ||४||

 

१३०
जनी जाय पाणीवासी मागें धांवे इषीकेशी ।।१।।
पाय भिजों नेदी हात माथां घागरी वहात ॥२॥
पाणीरांजणांतभरीसडासारवणकरी||३||
धुणे धुऊनियां आणी म्हणे नामयाची जनी ॥४॥

 

१३१
शेट्या झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं।।१।।
बुद्धिसांगेराजाईसीतुम्हीनछळावेंनाम्यासी|| २ ||
अवघ्यावित्तासीवेंचावें। सरल्यामजपाशींमागावें||३||
विठ्ठलशेट नाम माझें नामयाला सांगावें ॥४॥
आतां उचित दासी। ऐसें बोले राजाईसी ।।५॥
ऐसें बोलोनियां गेला । जनी म्हणे नामा आला ॥६॥

 

१३२
नामदेवाचे घरीं चौदाजण स्मरती हरी ॥१॥
चौधे पुत्र चौधी सुना। नित्य स्मरती नारायणा ॥२॥
आणिक मायबापपाहींनामदेवराजाबाई||३||
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी पंधरावी ती दासी जनी ॥४॥
१३३
माझा नामा मज देई जीव देईन तुझे पायीं ॥१॥
पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया चाळा केलें ॥२॥
तें गा न चले मजपाशीं दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुझ्यासंगें जे जे गेले ते त्वां जितेंचि मारिले ||४||
विठ्ठल म्हणे गोणाबाई नामा तुझा घेवोनियां जाई||५||
हातीं धरोनियां आली दासी जनी आनंदली ॥६॥

 

१३४
धरा सतराचा हो मेळा कारखाना झाला गोळा वाजविती आपुल्या कळा। प्रेमबळा आनंदें ।।१।।
झडतोनामाचाचौघडाब्रह्मीब्रह्मरूपीचाहुडासंतऐकतातीकोडांप्रेमबळाआनंदे||२||
नामां दामा दोनी कालू। नामा विठा दमामे पैलू चौघी सुना चारी हेलू । कडकडां बोल उमटती ॥३॥
गोंदा म्हादा करणी करी । नादें दुमदुमली पंढरी। आऊबाई तुतारी मंजुळ उमटती स्वरी ।।४।।
गोणाबाईनोबतपल्ला । नादअंबरींकोंदलाराजाईझांजमंजुळबोला। मंजुळस्वरउमटला||५||
जनाबाई घड्याळ मोगरी । घटका भरतां टोला मारी काळ व्यर्थचि गेला तरी गजर आनंदें करी ॥६॥

 

१३५: विठोबा चला मंदिरांत गस्त हिंडती बाजारांत १॥
रांगोळी घातली गुलालाची रोज म्यां केली पुष्पांची ।।२।।
समया जळती अर्थ रात्री गळ्यामध्ये माळ मोत्यांची ॥३॥
नामदेवाला सांपडलें माणिक घेतलें जनीनें हातांत ।।४।।
घेउनी गेली राउळांत गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥

 

१३६
लोलो लागला अंबेचा विठाबाई आनंदीचा || १॥
आदि ठाणें पंढरपूर | नांदे कान्हाई सुंदर ॥२॥ा
गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देई मला ॥ ३॥
शुद्ध देखोनियां भाव। पोर्टी आले नामदेव ॥ ४॥
दामाशेटी हरुबला दासी जनीस आनंद झाला ||५||
१३७
नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ।।१।।
आंगडेंटोपडेंपेहरण। शेलामुंडासाघेऊन|| २ ||
माझ्याजीवीच्याजीवनानामठेवीनारायणा||३||
जनी म्हणे पांडुरंगा। नांव काय ठेऊं सांगा।।४।।

 

१३८
हार्टीजायचितांतडी । नामाहोतापैलथडी||१||
म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
जनी धांवत चालली मार्गे विठ्ठल माउली ॥३॥

 

१३९
पुंडलिकाशी नामा उभा कीर्तनासी।।१।।
येऊनियांपांडुरंस्वर्येटाळघरीअंगें||२||
गाऊं लागेबरोबरी । नाहींबोलायाचीउरी||३||
स्वर देवाचा उमटला दासी जनीनें ओळखिला ॥४॥

 

१४०
ऐसी कीर्तनाची गोडी वैकुंठीहुनी पाली उडी।।१।।
आपण वैकुंठीच नसे। भक्तापासी जाण वसे ||२||
जनी म्हणे कृपानिधी भक्तभावाची मांदी सोधी ॥३॥

 

१४१
राधाआणिमुरारीक्रीडाकुंजवनींकरी||१||
राधाइतइतआलीनिजमुनत||२||
सुमनाचेसेजेवरीराधाआणितोमुरारी||३||
आवडीनें विडे देत दासी जनी उभी तेथ ॥४॥
१४२
विठ्ठलाचा छंद । वाचें गोविंद गोविंद ॥१॥
हाचि बोला हो सिद्धांत देव सांगे हो धादांत ॥२॥
जनी म्हणे सांगेन आतां । कृपें ऐका पंढरिनाथा ।।३।।
१४३
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें। साध्य परिसिलें तुम्हीं संतीं ॥१॥
अहो ज्ञानदेवा असावें तुम्हां ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥
माझी मज आण सांगतें प्रमाण। सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥
जनीचेहोबोलस्वानंदाचेडोल। स्वामिमुखबोलदुणावती||४||
शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई। अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥
हांसोनि ज्ञानदेवें पिटियेलीं टाळी जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥
१४४
जिल्हा लागली नामस्मरणी रित्या मायें भरी गोणी।।१।।
नित्यनेमाथीलाखोली। गुणआज्ञेनेभीपाळी||२||
म भरवसा नामाचा गजर नाम्याच्या दासीचा ॥३॥
विटेवरी ब्रह्म दिसे जनी त्याला पाहातसे ॥४॥
१४५
सोंगा सांगा जाय। नवल जाऊनी हांसताहे ।।१।।
हासोनियां बड़वी टिरी कोण नाटवी हे परी॥२॥
हा नाठवी आपणा म्हणे जनी भुलले जाणा ॥३॥

 

१४६
देहभाव सर्व जाय। तेव्हां विदेही सुख होय ॥१॥
तथा निर्दे जे पहुडले भव-जागृति नाहीं आले ॥२॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥३॥
त्या एकी एक होतां दासी जनी कैंचि आतां ॥४॥
१४०
एके रात्रींचे समयीं देव आले लवलाहीं ॥१॥
सुखजेपहुडलेजनीसवेंगुजबोले||२||
गुज बोलता बोलतां । निद्रा आली अवचिता ॥३॥
उठा उठा चक्रपाणी उजाडलें म्हणे जनी ।।४।।
१४८
पदक माळा सकलादे। तेथें टाकिली गोविंदें ।।१।।
देव तांतडी निघाले। वाकळ घेउनी पळाले ॥२॥
भक्त येती महाद्वारीं। चोर पडले देव्हारीं ।।३।।
नवल झालें पंढरपुरी देव राबे दासी घरीं ॥४॥
त्रिभुवनांत मात गेली । दासी जनी प्रगटली ॥५॥

 

१४९
पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें ।।१।।
अगेशिंपियाचेजनीनेलेंपदकदेआणुनी||२||
देवासमोर तुझे घर तुझें येणें निरंतर ॥२॥
म्यां नेलें नाहीं जाण सख्या विठोबाची आण ।।४।।
धोतर झाडूनि पाहती। पडलें पदक घेऊनि जाती ।।५॥
जनीवरी आली चोरी। ब्राह्मण करिती मारामारी॥६॥
धांविनले चाळीस गडी जनीवरी पडली उडी ।।७।।
दंडीं लाविल्या काढण्या । विठोबा धांवरे धांवण्या ॥८॥
चंद्रभागे रोविला शूळ जनाबाईस आलें मूळ ॥१॥
हात टाळी वाजविती । मुखीं विठ्ठल बोलती ।। १० ।।
 विलंब लागला ते वेळीं । म्हणती जनिला द्यारे सुळीं ।।११।।
ऐसा येळकोट केला। जनी म्हणे विठो मेला।।१२।।
तं मुळाचें झालें पाणी धन्य म्हणे दासी जनी ।।१३।।

 

१५०
प्रेमभायें तुम्ही नाचा रामरंगे रंगों वाचा ।।१।।
हैचि मार्गो देवाजीला आवडी शांती खरें बोला।।२।।
जैसी माय तान्ह्यातें खेळउनी चुंबी त्यातें ॥३॥
तेंवितुम्हीसंतजनासवींधरावीभावना||४||
हरि कोठावळा झाला म्हणे जनी भक्तीं केला ॥५॥

 

१५१
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजीं सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥
भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥
 पुंडलिकेंधनजोडिलेंअसतां । प्राथोंनियांदेतांनघेतीहे||३||
मगगड़ीहोचाहेदेवचियेथोनीजवळीहोतीजनीफावलेतिथे|४||
१५२
ऋषि म्हणती धर्मदेवा । आमचा आशीर्वाद घ्यावा ॥१॥
पांडवपालक गोविंद तिहीं लोकीं गाजे ब्रिद।।२।।
भक्तिमाकेलावश्यहरिसांभाजीतयास||३||
रात्रंदिवस तुम्हांपासीं दुजा ताल नाहीं त्यासी ||४||
देव द्रौपदीतें सांभाळी । उभा पाठीसी वनमाळी ॥५॥
वनीं सांभाळी पांडवांसी । सुदर्शन त्याजपाशीं ॥६॥
हरिभक्ति जाहला ऋणी म्हणे नामयाची जनी ॥७॥

 

१५३
वेदांती है बोलिले सिद्धांत हे नेमियेले ॥१॥
लागा लागा भक्तिवाटा धरा हेंचि नेमनिष्ठा ||२||
देववाकर्मसांडींनकरीअधर्म||३||
तोचि एक होय ज्ञानी देवनिष्ठ म्हणे जनी ॥४॥

 

१५४
जनीचेंबोलणेंवाचीनित्यकोणीतयाचेआंगणींतिष्ठतसे||१||
जनीचियापदांअखंडितगाये। तयाचेमीपायेबंदींमाथां||२||
जनीचेंआवडेजयासीवचन । तयासीनारायणकृपाकरी||३||
पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा । ऐसा वर द्यावा जनीसाठीं ॥४॥
_____________________________________________________________________________

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *