संत वामनभाऊ महाराजांची आरती

संत वामनभाऊ महाराजांची आरती

संत वामनभाऊ महाराजांची आरती !!

जयदेव जयदेव जय वामनभाऊ ।
महिमा तुमचा आम्ही भक्तजन गाऊ ॥ धृ. ॥
माता राहीबाई भाग्याची खाण ।
पिता तोलाजी हा पुण्यवान ||
पुत्र जन्माला रत्नासमान ।
तयासी शोभे नाव वामन ॥ १ ॥

बालब्रम्हचारी ख्याती ही तुमची ।
जन्मता आस विठ्ठल भक्तींची ।।
कृपा अखंड बंकट स्वामींची।
उपासना योगी गहिनीनाथांची ॥ २ ॥

स्त्रियांसी मानिले मातेसमान ।
अज्ञ समाजासी केले सज्ञान ॥
परमार्थी वेचिले तन-मन-धन ।
अंगी तेज झळके अग्नीसमान ॥ ३ ॥

उग्रभासे परी अंतरी माया ।
नाही भेदभाव कृपेची छाया ।।
मानिती सर्व लागती पाया।
भाऊंचा अवतार जन ताराया ॥४॥

दामोदर नाथांची सेवा महान ।
परंपरेने लाभली जान ।।
यादव बाबांनी अंतरमन जाणून ।
संस्थांनी स्थापिले भाऊवामन ॥५॥

भगवानदासांची अल्पशी मती ।
भाऊंचा महिमा वर्णावा किती ।।
दर्शने पतित पावन होती।
असे आमुचे बाबा वेराग्यमूर्ती ॥६॥

जयदेव जयदेव जय वामनभाऊ महिमा तुमचा आम्ही भक्तजन गाऊ………

संत वामनभाऊंची महाराजांची आरती समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *