लक्ष्मी

लक्ष्मी

ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य, आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णुची पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. हिंदू धर्मात विष्णु व भागवत पुराणानुसार समुद्रमंथन कथानुसार, देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेल्या अन्य रत्‍नांबरोबर सागरातून उत्पन्न झाली.लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगिनी देवी यांची कन्या. ज्या ज्या वेळी विष्णू भूतलावर अवतार घेतो, त्या त्या वेळी त्याची पत्नी लक्ष्मीसुद्धा विष्णूची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेते. देवी लक्ष्मी श्रीनारायण(विष्णु)सहित रामावतारात ती सीता बनली , कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात पद्मावती होती; कल्की पुराणानुसार, कलियुगात कल्की विष्णूचा भविष्यात येणारा अवतार आहे, त्यावेळी लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर घेणार आहे.


लक्ष्मी – कल्कि पुराण

अर्थ् – कल्की पुराणानुसार, ती माझी प्रिया लक्ष्मी सिंहल नावाच्या बेटात जन्म घेईल. सिंहल या बेटाचा राजा बृहद्रथ आणि त्यांची पत्नि राणी कौमुदीडी यांची कमळासमान डोळे असणारी कन्यादेवी लक्ष्मी आहे. तिला माझी पत्नी पद्मा नावाने ओळखतील.

भागवत पुराणानुसार, कामदेव हा श्रीविष्णु आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे. श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे. ;वैष्णव सिद्धान्तानुसार कामदेवाचे श्रीकृष्णाचे अध्यात्मिक रूप मानतात.

लक्ष्मीला “श्री” म्हणजे “समृद्धी” “आनंद”, “वैभव” असे म्हटले जाते; लक्ष्मीला माधवी, रमा, कमला, श्री अशी अनेक नावे आहेत. श्रीलक्ष्मी म्हणजे धनधान्य समृद्धीची देवता. तिच्या परिवारामध्ये अदिति-निर्ऋति. पृथिवी, शची, राका, सिनीवाली, कुहू, सरमा यांचा समावेश होतो.

पश्चिम बंगाल, ओरिसा आणि आसाममध्ये लक्ष्मी देवी बरोबर वाहन घुबड (उल्लीक) याचीही पूजा होते.


लक्ष्मी – जन्म आणि विवाह कथा

लक्ष्मी

पौराणिक समुद्रमंथन कथानुसार, लक्ष्मी ही समुद्रदेव आणि तिरंगीनी देवी यांची कन्या. समुद्र मंथनातून विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या आहे.ती कमलासनावर विराजमान, चतुर्भुज,तेजस्विनी,सुन्दर होती.

देव आणि दानव मोहित होऊन तिच्याजवळ गेले; पण लक्ष्मीने त्यांचाकडे लक्ष न देता, योग्य वर म्हणून पती विष्णूला निवडले . लक्ष्मीने विष्णूचा गळ्यात कमळाचे फुलांचा हार घातले. अशा प्रकारे विवाह झाला.

चतुर्युग चारयुगापैकी एक युग म्हणजे सत्य युग(सतयुग). सतयुगातील विष्णुचे दिव्य निवासस्थान विष्णुलोक वैकुंठामध्ये लक्ष्मीदेवी नारायण(विष्णु) यांचा सोबत असते त्या रूपाला ‘लक्ष्मीनारायण’ असे म्हणतात. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथनातून निघालेले अन्य रत्‍नाबरोबर सागरातून तिची उत्पत्ती झाली.


लक्ष्मी – चौदा रत्नाचे श्लोक

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमा ।

गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।

रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥


लक्ष्मी – इतिहास

लक्ष्मी

ऐतिहासिक काळात भारतामध्ये कलेचा आविष्कार घडला तो मौर्य-शुङग काळात लक्ष्मीची रुपे कोरली गेली; बौद्ध शिल्पात अभिषेक लक्ष्मी दिसून येते.आणि मुख्यत्वे सांची भारहूत येथील बौद्ध कलेतून, यक्ष-यक्षींच्या भीमकाय पाषाणप्रतिमातून आणि पक्क्या मातीच्या बाहुल्यांसारख्या प्रतिमांतून. प्रत्यक्ष श्री/लक्ष्मीच्या बाबतीत म्हणावयाचे झाल्यास भारहूतच्या स्तूपावरील यक्ष-यक्षींच्या प्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक ठरेल. स्तूपाभोवतीच्या दगडी कठडय़ावर जवळजवळ पुरुषाकारामध्ये उंच उठावात या पाषाण प्रतिमा आढळतात.

त्यात विशेषकरून सिरिमा, चंदा यखी आणि कुपिरो (कुबेर) यखो अशा ओळख करून देणाऱ्या अभिलेखांसह आढळणाऱ्या यक्षप्रतिमांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. सिरिमा म्हणजे श्री व कुपिर म्हणजे कुबेर यक्ष यांच्या प्रतिमांचा बौद्ध स्तूपावरील अंतर्भाव झाला यावरून या देवता सामान्यजनांच्या मानसात घर करून होत्या हे स्पष्ट आहे. इंद्र, ब्रह्मा इत्यादी देवतांचासुद्धा बौद्ध देवकुलामध्ये अंतर्भाव होता यावरून हे स्पष्ट होते की सांप्रदायिक भेदामुळे जनमानसात लोकप्रिय असलेल्या देवतांच्या पूजाविष्कारात खंड पडलेला नव्हता.

अगोदर उल्लेखिल्याप्रमाणे ‘श्री ही वैदिक देवता’ म्हणून मानण्यास काहीच हरकत नाही. तसेच निदान निरुक्तकार यास्कांच्या काळात कुबेर हा एक ऐतिहासिक मानव देवत्वाला गेल्याचा उल्लेख येतो. मनुष्य प्राकृतिक देवाचे उदाहरण म्हणून त्याचा उल्लेख आहे आणि त्या अर्थाने उत्तर वैदिक काळात त्याचा देवकुलात अंतर्भाव झालेला होता. चन्द्रा लक्ष्मी म्हणून श्रीसूक्तात उल्लेखिलेले श्रीचे स्वरूप चन्द्रा यखी म्हणूनही पुजिले जात असे.

परंतु श्री/लक्ष्मी विषयीची बौद्ध उपासकांच्या मनात असलेली प्रतिमा अगदी वेगळय़ा रूपात शिल्पकलेत प्रकट झालेली सांची येथे पाहावयास मिळते.

ते दोन-तीन उदाहरणांतून प्रकट झाले आहे. एक म्हणजे अभिषेक लक्ष्मी. दोन हातांत दोन कमळाचे फुल घेऊन उभ्या असलेल्या लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखविले आहे, तर दुसऱ्या एका शिल्पात कमळावर लक्ष्मी उभी असून तिच्या दोन्ही हातांत कमळाचे फुल आहेत असे कोरीवकाम दिसून येते.

पद्मेस्थिता आणि पद्मिनी या तिच्या दोन्ही बिरुदांत अभिप्रेत असलेला अर्थ कलाकाराने त्या रूपात प्रकट केलेला दिसतो, तर हस्तिनाद-प्रबोधिनी या बिरुदाशी पहिल्या चित्रणाचा संबंध दिसतो. काही कलामर्मज्ञांच्या मते हत्ती हे मेघाचे व पर्यायाने पर्जन्याचे प्रतीक असून लक्ष्मीने हातात धरलेली कमळे व ती कमळावर उभी आहे. कमळ ही सर्व सर्जनाची प्रतीके आहेत असे मानले जाते. अशाच प्रकारच्या पण कमलासीन अभिषेकलक्ष्मीचे एक ठळक चित्रण पितळखोरे (इ.स.पू. पहिले शतक) येथील विहाराकडे जाणाऱ्या सोपानाच्या शीर्षांवर आहे.

पितळखोरे लेणे येथे ही लक्ष्मीचे शिल्प आढळते. कुषाण आणि गुप्तकाळात लक्ष्मीचे ठसे असलेली नाणी दिसून येतात.आणखी एक वेगळय़ा प्रकारचे श्रीचे चित्रण सांची येथील तोरणावर आहे. येथे ती कमलासीन असून तिचे हात कमळमुद्रेत वक्षासमोर धरले आहेत. भरतनाटय़ातील परंपरेप्रमाणे या मुद्रेचा अर्थ पूजा असल्याने लक्ष्मी भगवान बुद्धाला वंदन करते आहे असाच घेतला पाहिजे. श्री/लक्ष्मी ज्याप्रमाणे बौद्ध धर्मात स्वीकारली गेली तशी ती जैन धर्मातही आढळते. यावरून स्पष्ट होते.


लक्ष्मी

Azilises चे नाणेवर गज लक्ष्मी कमळावर उभी असल्याचे दर्शवते १ शतक इ.स.पू.

जैन, बौद्ध,शिल्पात अभिषेक किंवा गजलक्ष्मी दिसून येते.

दोन हातांत दोन कमळे घेऊन उभी व बसलेली असलेल्या

लक्ष्मीवर दोन बाजूला उभे असलेले हत्ती कुंभातून अभिषेक करीत असल्याचे दाखवातात.

अष्टलक्ष्मी कोविल – आठ लक्ष्मींचे मंदिर, चेन्नई, तामिळनाडू,

सण-उत्सव

दिवाळी लक्ष्मीपूजन

दिवाळी मध्ये आश्विन अमावास्येला प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीपूजन करतात.

या दिवशी लोक लक्ष्मीनारायण, कुबेर, गणेशाची तसेच धनलक्ष्मी

प्राप्तीसाठी श्रीयंत्र वा श्रीचक्र, शंख याची स्थापना करून पूजा करतात.

दीपोत्सव भारतात आणि जगभरात साजरा होतो. या सणाच्या दिवशी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावतात.

उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदील) लावतात. घराबाहेर विविधरंगी रांगोळी काढतात.

स्वस्तिक, गोपद्म, कमळ, शंख, चक्र, पूर्णचन्द्राचीचे कला (पौर्णिमा), लक्ष्मीची पावले ही लक्ष्मीची प्रतीके आहेत.

ही मंगलचिन्हे दिवाळीमध्ये रांगोळी विविध रंगानी सजवतात.

लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना करतात.

त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात.

धणे, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

दिवाळीत घरोघरी फराळ बनवतात व शेजाऱ्या घरी पोचता करतात.


कोजागरी पौर्णिमा

शरद पौर्णिमा किंवा कोजागरी पौर्णिमा ही आश्विन पौर्णिमा म्हणून सण साजरी केली जाते. ही शरद ऋतूतीलआश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे ही पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये असते.

कोजागरी पौर्णिमेला ,शरद ऋतूतील आश्‍विन महिन्यामध्ये ‘आश्‍विनी पौर्णिमा’ असे म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री (संस्कृतमध्ये) ‘को जागर्ति‘ (म्हणजे ‘कोण जागत आहे’) असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते. उपवास,पूजन व जागरण या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात.म्हणून या दिवसाला ‘कोजागरीपौर्णिमा’ म्हणतात.


तुळशी विवाह

तुळशीवनस्पतींचे लक्ष्मी स्वरूप मानले जाते.  म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतींचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्री कृष्णयांच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीमध्ये करण्याची पूजोत्सव प्रथा आहे.भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांना तुळशीशी लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

wikipedia.org

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *