संत गोरा कुंभार आरती

संत गोरा कुंभार संगीत

संत गोरा कुंभार संगीत १ ते ६


केशवाचे भेटी लागलेसे पिसे
विसरलो कैसे देहभान ॥
झाली झडपणी संचरले मनी
आदिरूप रूप गे माई ॥
ना लिंपेची कर्मि ना लिंपेची धर्मी
ना लिंपे जडधर्मी मुक्त पाप
म्हणे गोराकुंभार सहजी जिवभुवन
सुखरूप अद्वैत झाले बापा

हे पण वाचा: संत गोरा कुंभार अभंग


अवघे गरजे पंढरपूर
चालला नामाचा गजर ॥
टाळघोष कानी येती
घ्यानी विठ्ठलाची मूर्ति
पांडुरंगी नाहले चंद्रभागा नीर ॥
इडापिडा टळुनि जाती
देहाला या लाभे मुक्ति
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर ॥
देव दिसे ठाई ठाई
भक्तलीन भक्तपाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर ॥


निर्गुणाचा संग धरिला जो आवडी
तेणे केले देशोधडी आपणियाशी ॥
अनेकत्व नेले एकले सांडिले निरंजनी
एकत्व पाहता अवघे लटिके
जे पाहे तितुके मायबापा ॥
म्हणे गोराकुंभार सखया पांडुरंगा
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय ॥


ब्रह्ममूर्ति मूर्तिमंत येईल माहेरा
होईल सोहळा आनंदाचा ॥
गाव नाही उरला ठाव नाही उरला
निर्गुणी नांदला देह साचा


पाहू द्या रे मज विठोबाचे मुख
लागलीसे भूक डोळा माझ्या ॥
कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी
अंगवी बरवी उटी गोपालाच्या
जाई जुई पुष्पे गुंफुनिया माळा
घालू घननीळा आवडिने ॥
नामा म्हणे विठो पंढरिच्या राया
डोळीया पारण होत असे ॥


पूर्वदिशा उजळली उष:काल आला
उठाउठ राउळी । राजसा भक्तवृंद जमला ॥
पक्षी कूजन करिती माधवा
चालले भाविक स्नानाला ॥ राजसा ॥
गोधन सारे दूर चालले रामप्रह झाला
उठा उठा राऊळी राजसा भक्तवृंद जमला ॥
उघडा डोळे अहो श्रीपती जाहली शुभदायी वेळा ॥ राजसा ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत गोरा कुंभार संगीत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *