संत प्रेमाबाईंची पदे

संत प्रेमाबाईंची पदे

संत प्रेमाबाईंची पदे

पद क्रमांक – १
गडे हो कृष्णगडी आपुला ।
यमुनाडोहीं बुडाला।।धृ.॥
काळिया डसेल जरि हरिला ।
हाइल विषबाधा त्याला ।
हाका मारिल आपुल्याला ।
तुम्ही तरि स्वस्थपणे बसलां।
आतां कोण काढिल रे त्याला ।
यमुना डोही बुडाला ||१||
गाई त्याविणें हंबरती।
वासरें स्तनपान न करिती।
यापरी गोप सर्व रडती ।
मुखानें कृष्ण कृष्ण म्हणती ।
आतां काय भेटेल आपल्याला ।
य न डोही बुडाला ||२||
यशोदा पुसेल जरि हरिला ।
सांगों काय तरी तिजला ।
नंद म्हणेल त्वां नेला ।
हलधर मारिल तो मजला ।
आतां काय जावें गोकुळाला ।
यमुनाडोहीं बुडाला ||३||
दहिं दुध लोणी म्यां हरिलें ।
हरिला ताक बळें दिधलें ।
घेइना म्हणोनि करिं धरिलें ।
वृक्षीं बळकट बांधिलें ।
म्हणोनी तो मजवरि रुसला।
यमुनाडोहीं बुडाला ॥४॥
पेंदा द्धांवुनियां आला ।
बळकट वृक्षाला डसला ।
त्याचे पाठीवर बसला ।
ओझे झाले बहु त्याला ।
म्हणुनियां पळत पळत आला ।
भेटला प्रेमाबाईला ॥५॥


पद क्रमांक – २ 
गडे हो कृष्ण गडी आपुला ।
राजा मथुरेचा झाला।।धृ.।।
टाकुनि काळा कांवळा ।
कासे पीतांबर कसिला ।
टाकी मयोरंपिच्छांला ।
जडित मुकूट घातला ।
आता काय ओळखिल आपल्याला ।
राजा मथुरेचा झाला ||१||
ठाकुनि गुंजांची दाटी ।
घातला कौस्तुभ श्रीकंठीं ।
टाकुन मुरली वेताटी ।
करिं घे आयुधे गोमटीं ।
आतां काय बागुलभय त्याला ।
राजा मथुरेचा झाला ||२||
गोधनें चारूं विसरला ।
आतां तो नृपांमधे शिरला ।
नारीनें उरीं धरुनि चुरला ।
आतां तो कुब्जेनें वरिला ।
देतसे निजपद प्रेमेला ।
राजा मथुरेचा झाला ॥३॥


पद क्रमांक – ३ 
गड्यांनों आपुल्या कृष्णाला ।
अकुर नेतो मथुरेला ।।धृ.।।
दोघे रथावरी बसती ।
यशोदा नंद गोप रडती ।
अनुरासी सर्व नमिती ।
त्याच्या दया नये चित्तीं ।
म्हणवुनि जाउं मारुं त्याला ।
अकुर नेतो मथुरेला ॥१॥
गोपी फारचि तळमळती ।
कराने वक्ष भाळ पिटिति ।
हरिला जाई नको म्हणती ।
अश्रूने सर्वांग भिजती ।
पुढे तो गेला यमुनेला ।
अकुर नेतो मथुरेला ||२||
ऐकुनि सर्व गोप भ्याले ।
धानि हरिजवळी आले।
मूर्च्छित रथाजवळि पडले।
हरिनें हृदयीं कवळीले ।
देव मग फारच गहिवरला ।
अकुर नेतो मथुरेला ॥३॥
तुजविण आम्हां नाहिं कोणी ।
म्हणुनि सर्व जाउं मरुनी।
परि ये चिंता एक मनीं ।
काँस तुज नेइल वा धरुनी ।
तेथें कुणी नाही वा तुजला ।
अकुर नेतो मथुरेला ॥४॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *