संत परिसा भागवत

संत परिसा भागवत हे संत नामदेवांचे प्रथम शिष्य म्हणून परिसा भागवतांना वारकरी संप्रदायामध्ये मान दिला जातो. पंढरपुरात नामदेवांच्या जवळ राहणाच्या परिसा भागवातांनी श्रीरुक्मिणी देवीचे मोठे अनुष्ठान केल्यामुळे, आराधना केल्याने श्रीरुक्मिणीदेवी त्यांना प्रसन्न झाली होती. प्रसन्न होऊन देवीने कोणताही वर माग, असे सांगितले. “माझे चित्त तुझ्याभजनी निरंतर रत असावे व माझा संसार सुखाने चालावा.” रुक्मिणी देवीकडे परीसाने वर मागून घेतला.

अशी प्रचलित कथा नामदेव-परिसा यांच्या संवादातून आली आहे. यासाठी देवीने त्यांना परीस दिला, परिसा भागवतांनी परीस आपली पत्नी ‘कमलजा’ हिच्याकडे काळजीपूर्वक दिला. तेव्हापासून परिसा भागवतास अहंकार झाला. परंतु पुढे संत नामदेवांच्या संयमी शांत स्वभावामुळे, परिसांचा अहंकार गळून पडला, व ते नामदेवाचे भक्त बनले.

संत नामदेवांच्या सहवासात राहून भजन कीर्तन करीत राहिले. परिसा भागवत हे उच्च मानल्या गेलेल्या ब्राह्मण समाजातील, तर नामदेव हे शिंपी. एका ब्राह्मणाने एका शिंप्याकडून शिष्यत्व पत्करावे, याचे आश्वर्य तत्कालीन समाजाला वाटणे साहजिकच होते. समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था चौकटबद्ध स्वरूपात होती; कर्मठ वृत्ती ग्रंथप्रामाण्य मोठ्या स्वरूपात होते. अर्थात परिसाला निजबोध झाला होता. एका अलौकिक अनुभवाने त्यांनी संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारले. परिसा म्हणतात,

“तू शिंपी न माना। आम्ही उत्तम याती। वाया अहंमती पडलो देखा॥”

उच्च जातीमध्ये जन्मल्याने अहंकार वाढला, हे परिसाने कबूल केले. यातच । परिसा भागवताची विनम्र वृत्ती लक्षात येते.

संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारण्यास नामदेवांचे परमतसहिण्णुतेने भारावलेले व्यक्तिमत्त्व कारणीभूत ठरते. नामदेवांसारख्या प्रभावी व प्रतिभास व्यक्तिमत्त्वाच्या व संगतीत, सोबतीत असणाऱ्या परिसा भागवताने नामदेवांचे अनुयायित्व सहज स्वीकारले. ज्ञानेदव-नामदेवांच्या लोकविलक्षण स्वभावाचा व वागण्याचा प्रभाव पडला. त्यांच्या समकालीन संतांच्या मनावर समतेतून वैचारिक प्रगल्भतेचा खूप मोठा परिणाम झालेला दिसतो.

नामदेवकालीन अनेक संतांना तसे स्वतंत्र अस्तित्व दिसत नाही. त्यांच्या आचार विचारांवर, सामाजिक जीवन जगण्यावर नामदेवांचे सखोल संस्कार झालेले दिसतात, ज्ञानदेव-नामदेवांच्या सहवासात, सान्निध्यात त्यांचे जीवनादर्श स्वीकारण्यात, अनेक बहुजन समाजातील संत स्वतःचे अंतर्बाह्य जीवन घडविण्यात अतिशय आनंदाने संगत, सोबत करीत होते.

संत परिसा भागवतांचे पूर्वायुष्य अतिशय प्रखर अहंकारात गेले; पण नामदेवांच्या सहज संवादात आल्यानंतर मनाची पवित्रता, विचाराची नम्रता आचरणात आली. समतेचा सहजभाव, भक्तीच्या माध्यमातून जन्माला आला आणि वाळवंटी नामदेव कीर्तनासाठी हाती टाळ घेऊन रामकृष्णहरी म्हणण्यासाठी उभे राहिले.


समकालीन संत व परिसा भागवत

श्रीज्ञानदेव-नामदेव यांच्या काळातच परिसा भागवतांचे आयुष्य वारकरी संप्रदायात प्रवाहित झाले. त्यांच्या जीवनाच्या उत्तरायुष्यात त्यांना संत नामदेवांचा सहवास लाभला. समकालीन कोणत्याही संतांनी परिसा भागवतांचा आपल्या अभंगात उल्लेख केलेला सापडत नाही; परंतु नामदेवांच्या सोबत चार प्रदीर्घ अभंगात संत नामदेव-परिसा भागवत यांचे संवाद दिलेले आहेत. परिसा भागवतांचा गर्वपरिहार, परिसा भागवतांनी केलेली नामदेवस्तुती, एकूण श्री संत ज्ञानदेव, चांगदेव याशिवाय इतर संतांच्या संदर्भात परिसा भागवतांनी अभंग

रचनेतून नामनिर्देश केला. श्रीज्ञानदेव, चांगदेव व नामदेव यांच्या संदर्भात अपरंपार आदराची भावना परिसांनी व्यक्त केली आहे.

“ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव।

भक्ती चांगदेव पुढारले॥

या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती। यांची काही भांती न घरावी।।

परिसा म्हणे जैसी सरिता सागरी। ते ते श्रीहरी मिळोनि गेले॥”

ज्ञानात, चिंतनात आणि भक्तीत श्रेष्ठ असणाऱ्या तीनही संतांना ईश्वराची एकच रूपे आहेत, अशी भक्तिमय श्रेष्ठ भावना संत परिसा भागवतांनी समकालीन संतांच्या संदर्भात विनम्रपणे व्यक्त केली. वारकरी संप्रदायाचे योग-मार्गातील. भान आणि ध्यान यांचे अद्वैत तत्त्व परिसांनी ज्ञानदेव, नामदेव व चांगदेव या तीनही संतांच्या संदर्भात सांगितले आहे. तीनही संतांचे दर्शन त्यांनी अंतर्मनाने घेतले.

अलंकापुरीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या वेळी परिसा भागवत समकालीन संतांच्या मांदियाळीत उपस्थित होते. संत नामदेवांच्या अभंगात (अ० 20 १०९८, १०९९) समाधीसोहळ्याच्या प्रसंगी कोणकोण संत उपस्थित होते. याचा उल्लेख आहे. नामदेवांची मुले, चांगा वटेश्वर, विसोबा खेचर, सांवता माळी, गोरा कुंभार इत्यादी संत होते. या सर्वांसमवेत ‘नामा तळमळी मत्सा ऐसे।’ अशी नामदेवांची अवस्था संजीवन समाधीच्या वेळी झाली होती. नामदेवांचा पहिला शिष्य परिसांबद्दल समाधी प्रसंगी नामदेव म्हणतात.

“परिसा भागवताने केला नमस्कार। सारे लहान थोर जमा झाले॥”

या वेळी संतांचा मोठा समुदाय अतिशय व्याकूळ अवस्थेमध्ये समाधीप्रसंगी उपस्थित होता. यामध्ये नामदेव शिष्य परिसाही उपस्थित होते. याचा संदर्भ नामदेव वरीलप्रमाणे देतात.


जीवनकाल

मध्ययुगीन काळातील दस्तऐवजामध्ये किंवा इतिहासामध्ये संत परिसा भागवत यांचा जन्म व निर्वाणकाळाचा उल्लेख कोठेही सापडत नाही. ते पंढरपूर येथील असल्याने त्यांचे जन्म ठिकाण पंढरपूरच असावे. त्यांचा ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला होता. तत्कालीन समाजाच्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे ते ब्राह्मण कुटुंबासारख्या उच्चवर्णात जन्माला आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला समाजात प्रतिष्ठा असावी. वेद, उपनिषदांचा व इतरही धर्मग्रंथांचा त्यांचा सखोल अभ्यास असावा. कारण तत्कालीन समाजाला ते अभ्यासपूर्ण भागवत कथा सांगत होते. त्याची विद्वत्ता व ब्राह्मण्य त्यांच्या एका चमत्कार कथेवरून स्पष्ट होते.

परिसा अन्वयार्थ- पंढरपूरच्या श्रीरुक्मिणी देवीचे परिसा भागवत हे। निःसीम उपासक होते. या उपासनेतून देवी त्यांना प्रसन्न झाली. देवीने त्यांना वर । दिला. काय हवे ते भक्ताला मागावयास सांगितले, सुखाने संसार चालावा म्हणून देवीकडे ‘परीस’ मागितला.

“परिस गेऊन लोहासी लावुनि।

सुवर्ण ते करी। सुखेश संसार रहातसे॥”

हे पंढरीच्या सर्व समाजाला माहीत होते. परिसा भागवत एक विद्वत्ता असणारा ब्राह्मण असल्याने ते पंढरीवासीयांना ‘भागवत’ सांगत होते. कदाचित परिमा म्हणजे ‘ऐका या शब्दावरून ‘भागवत ऐका असे म्हणत. म्हणून त्यांना पंढरीतील सर्व जण ‘परिसा भागवत’ संबोधू लागले किंवा काही विद्वान संशोधकांच्या मते श्रीरुक्मिणी देवीने त्यांना ‘परीस’ दिल्यामुळे भागवत सांगणाऱ्या ब्राह्मणाचे नाव परिसा भागवत’, असे प्रचलित झाले असावे.


संत परिसा भागवत चमत्कार कथा

अनेक संतांच्या साहित्यात विविध चमत्कार कथा घडलेल्या आहेत. संत ते चमत्कार कसे घडले हे सांगतात. चमत्कार संतांनी केलेले नाहीत. विठ्ठलभक्तीच्या किंवा संकटात भक्त असतानाच्या माध्यमातून त्या कथा घडलेल्या आहेत. आजच्या विज्ञान युगात भौतिकतेच्या कसोटीवर या कथा घासल्या तर त्या असत्य वाटतात; पण त्या घडलेल्या आहेत. कदाचित ती प्रतीके रूपकात्मक असतील: परंतु अंतिम काव्य वाचल्यानंतर या गोष्टी सत्य आहेत, असे पटू लागते; परंतु घडलेल्या घटना, प्रसंग, शेवटी आभास वाटतात. काल्पनिक वाटतात.

या संदर्भात संत काव्य समालोचनकार गं० ब० ग्रामोपाध्ये म्हणतात, “मात्र एक गोष्ट खरी की, त्या प्रतिभावंत संत कवींच्या दूरदृष्टीमुळे ज्या गोष्टींना भोळ्या भाविकांकडून चमत्कार ही संज्ञा प्राप्त झाली, त्या भोळ्या भाविकांची मने नवीन रुजू घातलेल्या भागवत संप्रदायाकडे आकर्षिली गेली असावीत. सनातन हिंदू संस्कृतीवर येऊ पाहणाऱ्या वावटळीत तगून राहण्यासाठीच तर हा संप्रदाय निर्माण झाला होता.

“साहजिकच राजकीय जागृतीला असमर्थ, परंतु धार्मिक बाबतीत अगदीच हळुवार अशा तत्कालीन समाजाच्या झुंडीच्या झुंडी या वारकरी संप्रदायाकडेव ळल्या. मात्र याचे सारे श्रेय तत्कालीन संतकवींनाच दिले पाहिजे; परंतु त्याच्या चमत्काराकडे तत्कालीन भाविक प्रेक्षकांच्या नजरेने न पाहता खुद्द चमत्कार करणार्यांच्याच नजरेने पाहाणे हे आजच्या भौतिक युगात जास्त युक्त ठरले संतांच्या चमत्कार कथांच्या संदर्भात तत्कालीन समाजाला तसे वाटणे हे आनच्या बौकिक युगातील समाजाला ग्रामोपाध्यांनी सुचविले आहे.


संत परिसा भागवत –परिसाचा अहंकार

परिसा भागवत व संत नामदेव यांच्यामध्ये आलेल्या (अभंगरचना) संवादा मधून असे दिसते की, परिसा भागवतांचा अहंकार प्रचंड उफाळून आला. मंदिरामध्ये परिसा भागवत पुराण सांगत होते, त्यात लंकेचा उल्लेख आला, नामदेवांनी परिसाला लंका कशी आहे, असे विचारले, परिसाने शास्त्रात पाहून सांगतो असे म्हणले. परिसाने श्रीरुक्मिणीचे ध्यान केले; देवी समोर येताच नामदेव माझा अपमान करतो, परिसाने लंका पाहण्याची इच्छा व्यक्त केली. श्रीमृक्मिणी देवीने आपल्या सामान परिसास लंका दाखविली. लंकेत फिरताना विभीषणाच्या सदनी परिसा आला. त्याला मनापासून आनंद झाला. परिसाला प्रत्यक्ष नामदेव सदनासमोर कीर्तन करताना दिसले.

सांगा कैसी आहे लंकेची रचना। कोण-कोणत्या स्थानी राहताती।

बाबा तेचि सांगा मजलागी खूण। बोलत प्रमाण नामा त्यासी।

दोघांचा संवाद होता महाद्वारी। विस्मय अंतरी करिती संत।

परसोबा सांगत रुक्मिणी। हातावरी दाविली नगरी बिभिषणाची।

पाहूनिया लंका आनंदला मनी। पाहतो तो नामा उभा कीर्तनासी।

गुणगान असे देवाजिचे।”

हे पण वाचा: संत राका कुंभार संपूर्ण माहिती

(संत नामदेवकृत परिसा भागवत चरित्र)

संत नामदेव कीर्तनात विठ्ठलाचा महिमा सांगत होते. ‘शरण जे गेले माझ्या पंढरीनाथा। नाही भयचित्ता त्यासी काही।’ विठ्ठलस्वरूप सगळीकडे भरून उरलेला आहे. त्याला प्रत्येकाने शरण गेले पाहिजे. येथेच परिसा भागवतांच्या अहंकारासंबंधी ‘का रे अहंकार धरिलासी’ असे नामदेव विचारू लागले.

संत नामदेव किती श्रेष्ठ व विनम्र संत आहेत, याचा प्रत्यय परिसा भागवतांना आला, परिसांना त्यांच्या सामर्थ्याची प्रचीती आली. खातरी पटली. परिसा- रुक्मिणीदवी संवाद, श्रीलंका दर्शन, नामदेव कीर्तन, परिसा-नामदेव संवाद यांचे वर्णन परिसा भागवतांच्या अभंगांमध्ये पाहावयास मिळते. (श्रीसकलसंतगाथा, संतचरित्रे नामदेव)

संत नामदेव शिंपी समाजाचे होते, परिसा ब्राह्मण, त्यामुळे नामदेवांना ते सतत नीच पातळीचे संबोधित असत. तुझे पूर्वज माझ्या चरणाशी असत, तू विठ्ठलभक्त असलास तरी नीचतम आहेस, हा विद्वत्तेचा आणि ब्राह्मणतेचा अहंकार परिसा सोडत नसे. संत नामदेव अतिशय सहिष्णू वृत्तीचे, ते म्हणू लागले, तुमचे चरणाचे महत्त्व खूप आहे. नामदेव परिसा भागवतास म्हणत असे, ‘परोबास म्हणे नामा। चरणतीर्थ द्यावे आम्हा।’ इतकेच नव्हे तर माझे शुद्धिकरण करण्यासाठी मी तुमच्याजवळ थांबतो. मी इकडे कशासाठी हिंडत राहू, मी पवित्र, पावन तुमच्या चरणस्पशनि होणार आहे.

“ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, समस्त। हे तव तुमच्या पाया पडत॥ तया दंडवत घडत। दोष जाती तयांचे॥”

परिसाजवळ असणारा गर्व मीपणा घालविण्यासाठी नामदेव अतिशय विनम्रपणे परसोबांशी संवाद करीत असत. संत परिसा भागवताचा गर्व, अहंकार त्यांच्याकडे असलेले अवलक्षण नाहीसे करण्यासाठी त्यांची पत्नी कमलसा यांनीही प्रयत्न केले आहेत. संत नामदेव हे विठ्ठलभक्त आहेत, धर्माचे तंतोतंत पालन करणारे आहेत. कमलसा पतीला म्हणायची,

“तुम्हासी जरी चाड हरिसी।

तरी मत्सर करू नका नामदेवासी ॥

तो आलिया घरासी। हरि तुम्हासी भेटेल॥”

इतका आत्मविश्वास विठ्ठलरूप संत नामदेवांबद्दल संत परिसा भागवतांच्या पत्नीला होता. नामदेवांना जरी आपल्याकडे घेऊनि आलात तर प्रत्यक्ष विठ्ठल तुम्हाला भेटेल, इतकी नितांत भक्ती कमलसेची होती. संत नामदेवांबद्दलची भक्ती, त्यांचे मोठेपण सांगितले. औंढ्या नागनाथ मंदिराच्या बाहेर महादेवाच्या महाद्वारात कीर्तन सुरू केले, लोकांनी विरोध केला, नामदेव दुसऱ्या बाजूस गेले, ‘देऊळ तयाकडे फिरले। भले नवल नामयाचे ।’ ही कथा परिसांच्या पत्नीने सांगताना, “तुमच्याजवळचा अहंकार जेव्हा नाहीसा होईल, तेव्हा, ‘गर्व सांडाजी ओजा। तरी पंढरीराज भेटेल।’ तेव्हा तुम्हास प्रत्यक्ष पांडुरंग भेटेल;” पण तरीही संत नामदेवांबद्दल जातिभेदाचा परिसांनी अमंगळपणा सोडला नाही. पत्नी कमलसा सतत विठ्ठलाचे नामस्मरण करताना पतीला गर्व सोडण्याचे आवाहन करीत असे,

“तुम्हासी गर्व जरी नसता। तरी घरी भेटता परमात्मा ॥

तुम्ही ब्राह्मण पवित्र धन्य। मुखी वेद हरीचे नाम॥

वरी गर्व अवलक्षण। सकळही धर्म लोपले॥”

इतके स्पष्टपणे पतीजवळ असणाऱ्या अहंकाराचा लोप होण्यासाठी त्याची पत्नी परब्रह्म विठ्ठलाचे स्वरूप उलगडून सांगते. संत साहित्यात कोणत्याही पत्नीने आपल्या पतीला अशा प्रकारचे विदठ्रलभक्तीचे निरूपण केलेले पाहावयास मिळत नाही.


संत परिसा भागवत-परिसा व्यक्तिमत्त्व

परिसा भागवतांचे व्यक्तिमत्त्व है विविधांगी होते. त्यांच्या संपूर्ण जीवनात, सामाजिक स्तराचा उच्च भाव होता. ग्रंथप्रामाण्याचा मोठा संस्कार असावा. ब्राह्मण । कुटुबात जन्म झाल्यामुळे, वेदविद्या पठण करता करता अभ्यासपूर्ण रामायण महाभारताचे, भागवताचे निरूपण करण्याचे पवित्र कार्य ते करीत होते. या । भूवैकुंठात पंढरपूर हे एक पवित्र तीर्थक्षेत्र व श्रीविठ्ठलदैवत समचरणी उभे असलेल्या ठिकाणी भागवत कथासार सांगत. शिवाय श्रीरुक्मिणीची सदोदित भक्ती करीत. परिसा विद्वान पंडित असले तरी कुटुंब संसार व्यवस्थित चालावा म्हणून रुक्मिणीच्या उपासनेतून परीस मागितला. ‘लोहासी लावूनि सुवर्ण तो करी। सखे हा संसार राहतसे॥’ देवीची कृपा परिसा भागवतांवर अहर्निश होती. श्रीरुक्मिणीची पूजा करताना अखंड तिच्या भक्तीत एकरूप झालेले परिसा होते; पण ब्राह्मण असल्यामुळे समकालीन इतर जातीतल्या संत मंडळींना त्यांच्याजवळ आदराचे स्थान नव्हते.

संत नामदेवांसारख्या श्रेष्ठ विठ्ठलभक्तास, ज्येष्ठ संतांना परिसा किंमत देत नसे. त्यांच्या लेखी मी हुशार, बुद्धिमान, विद्वान व उच्च जातीत जन्मलो, श्रीरुक्मिणीदेवीची असणारी कृपा उपासना, सतत भागवत कथासार सांगितल्याने समाजात उच्च प्रतीचे स्थान मिळाले, असा त्यांचा समज होता.

परिसांची पत्नी कमलसा, संसारी, पवित्र, विठ्ठलभक्त, धर्माभिमानी, संत नामदेवांबद्दल असणारा असाधारण भक्तिमाव, सोज्वळ व पारदर्शी विचारांच्या होत्या. परिसांमधला अहंकार तिला सहज कळत होता. तो गळून पडावा यासाठी त्या परिसोबांशी सतत संवाद करीत असत. विठ्ठलाच्या महाद्वारात रामायण महाभारत सांगण्याचे कार्य परिसा करीत असत, नित्यनेमाने अनेक साधुसंत श्रवण करण्यासाठी तेथे येत, तेथे संत नामदेवही कीर्तन, भजन करून महाद्वारी कथा अवणास येत असत. पुराणांमधील बरेच अर्थ परिसा भागवतांना विचारीत असत. संत नामदेव खालच्या जातीचा. त्याला काय कळते, या भूमिकेतून परिसा नामदेवाकडे पाहात असावेत. कारण त्यांनी श्रीरुक्मिणीदेवीकडे नामदेवांच्याबद्दल तक्रार केली.

“दोघांचा संवाद होता महाद्वारी। विस्मय अंतरी करिती संत॥

परसोबा सांगत रुक्मिणी लागून। करितो अपमान नामा माझा॥”

परिसा भागवतांचा नामदेव अपमान करीत नसून, परिसा भागवतच नामदेवां बद्दल मत्सर करीत होते. विद्वत्ता सांगत होते आणि अहंकाराचे वलय सोडीत होते. परिसांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये मीच मोठा श्रेष्ठ विद्वान ब्राह्मण आहे, असा न होना, संत नामदेवांच्या सहवासात असताना परिसांच्या पत्नीने संत नामदेवांच्या पत्नी राजाईना परीस दाखवला, तो राजाईन नामदेवांना सांगितला हा परीस नामदेवांनी चंद्रभागेत फेकून दिला. याचे दुःख परिसांस खूप झाले. नामदेवांको न्या. परिसाची त्यांनी मागणी केली, नामदेवांनी पाण्यात बुडी मारून चंद्रमागेतुर ओंजळभर खड़े वरती काढले. त्या प्रत्येक खड्याला लोह लागताच सोने होई, चमत्कार संत परिसाने उघड्या डोळ्यांनी पाहिला.

संत परिसा भागवत सांसारिक पुरुष होता, एखादी गोष्ट मिळविण्यासाठी के चिवटही होता. या त्यांच्या कवित्वातून अखंडपणे अहंकार चिकटलेला होता, असे दिसते. ओंजळीतला प्रत्येक खडा हा परीस आहे, या बदलाने दृष्य पाहून त्याच्या जवळ असणारा अहंकारही गळून गेलेला दिसतो. यामुळे संत परिसा भागवत नामदेवांचा शिष्य बनला. ही परिसा भागवतांसाठी महत्त्वपूर्ण बाब बाहे. येथे परिसाला, ईश्वरी सत्याचा, भावभक्तीचा आत्मानुभव आला. निजबोधाची खूण मिळाली. नामदेव किती मोठा संत आहे, याचे माहात्म्य सांगू लागला. परिसाला ईश्वरी अनुभूतीचा केवळ प्रत्यय आला नाही, तर ‘तू शिंपी न माना आम्ही उत्तम याती। वाया अहंमती पडलो देख। या चरणाच्या प्रत्येक शब्दांमध्ये परिसाने आम्ही उच्च जातीतले आहोत, शूद्र जातीतला शिंपी. या विचाराने, मी अहंकारात बुडालो. ही परिसाची मानसिकता बदलली, अहंकार निखळून पडला. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घटक सहज लक्षात येतो.


संत परिसा भागवत-अभंगरचना व विषय

परिसा भागवत यांच्या नावावर श्रीसकलसंत गाथेत एकोणीस संख्या असलेली अभंगरचना आहेत, तसेच एक हिंदी आरती त्यांच्या नावावर असून या आरतीत नामदेवांविषयीचा कृतज्ञताभाव व्यक्त केला आहे. नामदेवकृत परिसावदल संत चरित्र आहे, हे परिसा भागवत यांच्या रचनांचे स्वरूप संवादात्मक आहे. हा संवाद परिसा व संत नामदेव यांच्यात झालेला आहे. त्यामधून अहंकाराने फुगलेले परिसा भागवत त्यानंतर नामदेव व अहंकारापासून दूर झालेले परिसा भागवत, असे चित्र पाहावयास मिळते.

संत परिसा भागवत हे नामदेवांचे पहिले शिष्य, तर दुसरे शिष्य संत चोखामेळा, एक ब्राह्मण तर दुसरे शूद्र महार समाजाचे होते. या दोघाही संतानी नामदेवांची स्तुती, नामदेवांचे माहात्म्य, गौरव आपल्या अभंगांमधून व्यक्त केला आहे. कारण नामदेवांनी आपल्या भक्तिकार्यात सर्व जाती पंथांच्या लोकांना आपल्या भक्तिपंथात सहभागी करून घेतले. त्यांना आपलेसे केले. नामदेव सर्वांना सारखी वागणूक देत होते. त्यामुळे हे दोघेही संत नामदेवांचे भक्त बनले. नामदेवांच्या सहवासात राहून परिसाभागवत है भजन कीर्तन करीत असत. नामदेवांचा प्रचंड प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि रचनांवर पडलेला आहे.

परिसा भागवत यांच्या रचना संख्येने कमी असल्या तरी संवादतत्त्वाच्या बाबतीत व काव्यगुणांच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या आहेत. परिसांच्या कवितेतून, परमेश्वरभक्ती, स्वयं अहंकार, सद्गुरू महिमा, नामदेव स्तुती असे विविध विषय आलेले आहेत.

परिसा भागवतांच्या मनामधील अहंकार ज्या वेळी पूर्ण गळून पडला, तेव्हा त्यांना इतर संतांच्या संगत सोबत राहावे, त्यांचा सहवास मिळावा, असे वाटू लागले. समकालीन संतांविषयी त्यांना नितांत आदर निर्माण झाला. हा आदर त्यांनी पुढील अभंगरचनेमधून व्यक्त केला आहे.

“निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर। मुक्ताई चांगदेव वटेश्वरू॥

निरंतर खेचर विसा। ब्रह्मी देखे आनंदाचा पूर ॥

अवधिया अवघा साक्षात्कार। त्याचे चरणीचा रजरेणु॥

हा नामदेव शिंपी। तयासी पाहता अनुभव सोपा॥

हे एकाचित मूर्ती पावले अशेखा। सकळाचरणी परिसा भागवत देखा॥”

परिसा भागवत यांनी वरील आपल्या रचनेतून निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या भावंडांचा अतिशय आदराने भक्तिभाव व्यक्त करून आनंदी भावना मांडली. चांगा वटेश्वर, विसोबा खेचर व नामदेव यांच्या पारमार्थिक कार्याची उंची व श्रेष्ठता व्यक्त करून त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे. सर्व समकालीन संतांविषयी गुरुभाव विनम्रपणे मांडलेला प्रत्ययास येतो. विठ्ठलभक्तीचा परमोच्च ज्यांनी गाठला अशा परमगुरूंविषयी संत परिसा भागवत परम आदर आपल्या अभंगांमधून मांडताना दिसतात.

पैल मेळा रे कवणाचा। नामा येतो केशवाचा ॥

ब्रिद दिसते अंबरी। गरुड टके यांच्या परी॥

या परिसा येतो लोटांगणी। नामा लागला त्याचे चरणी॥”

येथे नामदेवांची स्तुती करून गुरू नामदेवांनी माझ्या मनाला चिकटलेला अहंकार दूर करून मला जवळ घेतले. त्यामुळे माझे अवघे जीवन पालटले, असा नम्र अविष्कार करीत म्हणतात,

मागे होते ते अवघेचि विसरले। लोटांगणी आले नामयासी।

परिसा म्हणे नामया बरवे तुझे गाणे। जैसे का नाणे टाकसाळीचे॥”

परिसा भागवतांच्या मनामध्ये असलेला नामदेवांविषयीचा अलोट भक्तिमाव। त्यांचा गौरव वरील अभंगामध्ये परिसांनी व्यक्त केला आहे.


संत नामदेव परिसा काव्यात्मक संवाद

परिसा भागवतांची कविता अध्यात्म आणि भक्तिमाव सांगणारी आहे. नामदेवांविषयीचा भक्तिभाव अत्यंत आत्मीयतेने त्यांच्या अभंगांमधून व्यक्त होतो. त्यांच्या कवितेचे स्वरूप ‘नामदेव-परिसा संवादाचे आहे. त्यामुळे त्यांच्या अंतरीचा जिव्हाळा या स्व-स्वरूपाच्या अभंगातून प्रत्ययास येतो. संत सज्जनांविषयीज्ञा आदरभाव ते अत्यंत विनम्रपणे आपल्या काही रचनांमधून व्यक्त करतात. संत सहवासात ब्रह्मसुखाची प्राप्ती होऊन मनाची आनंदमय स्थिती होते. म्हणूनच ‘सकळचरणी परिसा भागवत देखा’ असे ते विनम्रपणे म्हणतात.

संत नामदेवांच्या सहवासात आल्याने आपले पूर्वायुष्य कसे बदले, आपल्यात कसा बदल झाला, हे ते अतिशय प्रांजळपणे सांगतात.

मागे होतो अवघेचि विसरलो। लोटांगणी आलो नामयाशी ॥”

प्रांजळपणा, विनम्रता, प्रासादिकता, माधुर्य अशा काही काव्यगुणांचा प्रत्यय त्यांच्या कवितेत येतो. परिसा भागवत यांच्या कवितेचा महत्त्वाचा विशेष म्हणजे संत नामदेवांविषयी त्यांच्या मनात असलेल्या जिव्हाळ्याच्या भक्तिभावाची व नितांत आदराची अभिव्यक्ती होय.

संत नामदेवांच्या भक्तिकार्याचा व अभंगवाणीचा प्रभाव एकूणच समकालीन संत परिवारावर पडलेला होता. त्यांच्या नामसंकीर्तनात आणि ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीत समाजाच्या निरनिराळ्या जातिजमार्तीचे वारकरी आपल्या स्नेहभरी भक्तिभावाने विठ्ठलसुखाचा नेत्रदीपक सोहळा अनुभवीत होते. विशेषतः जगमित्र नागा, जोगा परमानंद यांचाही समावेश या मांदियाळीत होता. ईश्वरचिंतन आणि संत सहवासात रमणाच्या असंख्य संतांचा सहभाग परिसा यांच्या समवेत होता.

संत परिसा भागवताने संत नामदेव पूर्व जन्मी कोणकोणत्या रूपात होते, याबद्दलचा प्रदीर्घ अभंग लिहिला आहेत. ही परिसांच्या मनामध्ये गुरूबद्दलची असणारी केवळ आदराची भावना नसून नामदेव हा केवळ नामदेव नसून देवस्वरूपी सर्वात्माच आहे. संत नामदेव कृतयुगात भक्त प्रल्हाद होते, प्रत्यक्ष खांबामध्ये नारायण होता. त्रेतायुगात अंगद होते. रामचंद्रांनी त्याला भेट दिली. द्वापार युगात नामदेव उद्धवाच्या रूपात होते. प्रत्यक्ष नारायण त्यांना भेटला आणि आज कलियुगात नामदेव संत झाला, प्रत्यक्ष परमात्मा श्रीविठ्ठल त्यांच्याजवळ आहे. चारही युगात वेगळा असा नामदेव जन्माला आलाच नाही. भक्त तोच आणि ईश्वरही तोच आहे. या प्रकारचा गौरव संत नामदेवांचा परिसा भागवत यांनी आपल्या अभंगामधून केला आहे.


संत परिसा भागवत- वाङ्मयीन वैशिष्ट्ये

संत परिसा भागवत नामदेवांचे शिष्योतम. त्यांची अभंगरचना जरी अल्प असली, तरी नामदेवांविषयीचे प्रेम हे भावोत्कट आहे. नामदेवांविषयी वाटणाऱ्या प्रेमाचे, भक्तीचे सहजसुंदर चेतोहारी शब्दांमध्ये वर्णन केले आहे.

परिसा म्हणे नाम्या मी तुज देखिले। प्रत्यक्ष विठ्ठल ऐसे जाण॥”

केवळ शब्दांमधून नामदेवांचे वर्णन केले नाही तर नामदेव हे प्रत्यक्ष विठ्ठलच आहेत, हे नामदेवांच्यात भक्तोत्कट दर्शन घेताना परिसा दिसतात. त्याच्या पुढे तर

“तूच तू विठ्ठल तूच तू विठ्ठल। हाचि सत्य बोल जाण आम्हा ॥”

ही शिष्यत्वाची परिसीमाच आहे. येथे वारकरी संप्रदायाचे अद्वैत भक्तीचे अधिष्ठान व्यक्त केले आहे. संत परिसा भागवतांच्या एकूण कवितेमध्ये प्रतिमा, प्रतीके व रूपकांचा सहजसुंदर वापर केला आहे. प्रतिमांमधून संत नामदेवांच्या सहवासात राहिलेल्या शिष्याला वारकरी संप्रदायाच्या भाव जीवनाचे शब्दचित्रातून सहज दर्शन घडते. काव्याच्या सहजसुलभ मांडणीचे दर्शन घडते. उदाहरणार्थ नामदेवांच्या शब्दांना दुधावरची साय म्हणले आहे. रसाळ अमृत, नामयाचे गीत, वैष्णवाचा थाट, पताकाचे भार, पुष्पांचा वर्षाव, विमानाची दाटी, यासारख्या शब्दप्रयोगांचा वापर परिसांच्या अभंगातून पाहावयास मिळतो. वरील बहुतेक शब्द नामदेवांविषयी वर्णन केलेल्या अभंगांमधीलच आहेत. इतका प्रभाव नामदेवांचा आपल्या शिष्यांवर झालेला होता. परिसाने आपल्या अभंगांना काही शब्दालंकार, विशेषणे वापरून वैचारिकदृष्ट्या कविता प्रवाहित केल्या आहेत. अलंकापुरी ज्ञानिया, वैष्णवी नामाचा घोष करी, इंद्रनील सोपान, डोळिया सुकाळ, कंठी वैजयंती, नयन पुंजाळती, संताची करणी, आनंदे भरता सागर, काकुळती शरण आले, यांसारख्या शब्दांनी अभंगांना सुंदर रूप अभिव्यक्ती आशयाने त्याची उंची वाढली आहे. संत परिसा विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात महाभारत, भागवत संत सजनांना भाविकांना ऐकवित असत. त्यामुळे त्यांच्या अभंगरचनेत प्रवाहीपणा, कथात्मकता आलेली दिसते. मुळात काही अभंगरचनेत पहिल्या तीन चरणात अंत्ययमक वापरून शेवटचे चरण मूळार्थावर प्रकाश टाकणारे दिसते. उदाहरणार्थ

“परसा म्हणे नामयासी। अरे नामदेवा परियेसी ।

तू तव दवडिल्या न जसी। मनी न लाजसी असुनी॥”

नामयासी, परियेसी, जसी यासारख्या शब्दांच्या वापराने, एकूण अभंगाच्या रचनेत प्रवाहित्व येते. एक भागवत सांगणारा महाराज श्रोत्यांना सहज समजेल, रुचेल अशा सोप्यातून सोपा अर्थ उलगडत सांगतो, त्या पद्धतीने साधे सुलभ । शब्दांचा वापर करून अर्थाची संदिग्धता न आणता, परमात्म्याचे स्वरूप उलगडताना गूढता, अनाकलनीयता रचनेत कोठेही दिसत नाही. संवादात्मकता हा रचनेतील मूळ गाभा, तो परिसाने रचनेत वापरला आहे.

“यावरी नामदेव काय बोलिल। आजि मनी संतोष फार झाला।

शब्द पूर्वजांचा ऐकिला। आनंदे भरला सागर।

परसोबास म्हणे नामा। चरण तीर्थ द्यावा आम्हा॥”

यासारख्या सहज सुंदर शब्दांमधून परस्परांच्या मनातील भावना पारदर्शकपणे संवादाच्या माध्यमातून सांगितलेल्या दिसतात. त्यामुळे नामदेव शिष्य परिसा भागवत यांचे सर्व अभंग वाचनीय झाले आहेत; परंतु परिसोबांच्या अनेक अभंगांमधून ठिकठिकाणी ‘विष्णुदास नामा’ असा नामदेवांच्या संदर्भात शब्द वापरला आहे. असा अभंग नामदेव शिष्य परिसांचा आहे का, अशी शंका येते.


समारोप

संत परिसा भागवतांचे विविध अभंग भावरसांनी जरी फार ओथंबलेले नसले, तरी नामदेवकालीन भक्तिसंप्रदायाचे भक्तिमय रूपात एकरूप झालेले दिसतात. परिसांच्या एकूण अभंगात काही प्रमाणात स्वयंस्फूर्त अशी प्रतिभा आहे. भक्तीच्या प्रांगणात कवित्वाला स्पर्श करणाऱ्या प्रतिभेची त्यांच्याजवळ उभारी आहे.

श्रीज्ञानदेव नामदेव यांच्या सहवासात टाळमृदंगांच्या निनादात जे काहा भक्तीचे स्वरूप आळविता येईल इतका प्रयत्न परिसा भागवतांनी केला आहे. त्या काळात मुळात वारकरी पंथासारख्या भक्तिसंप्रदायाची दिवसेंदिवस वाढ होत होती. जातपात, धर्मभेद मोडीत निघत होते. समता व विश्वबंधुतेचा सूर निघत होता. चंद्रभागेच्या वाळवंटात संत नामदेवांच्या भगव्या पताकांखाली विविध जाती । जमार्तींचे संत सज्जन एकत्र येऊन अद्वैताचे तत्त्वज्ञान कृतिशीलतेने जगत होते. तत्त्वज्ञानाची भाषा सर्वसामान्यांना समजेल चमत्कारपूर्ण कथांमधून, पौराणिक संदर्भातून जनसामान्यांना ऐकवित होते. परिसा भागवतांचे साधेसोपे अभंग मराठी संतकाव्यात चिरकाल चैतन्यमय राहतील यामध्ये शंका नाही.


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

संदर्भ: नामदेवरायांची लेखक: डॉ. शिवाजीराव निवृत्ती मोहिते आहे.

संत परिसा भागवत

संत परिसा भागवत

संत परिसा भागवत

संत परिसा भागवत

संत परिसा भागवत

संत परिसा भागवत

संत परिसा भागवत

संत परिसा भागवत