संत सावतामाळी महाराज

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग 2

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग 2

कां गां रुसलासी कृपाळूं बा हरी । तुजविण दुसरी भक्ती नेणे ॥ १ ॥
दीन रंक पापी हीन माझी मती । सांभाळा श्रीपती अनाथनाथा ॥ २ ॥
आशा मोह माया लागलीसे पाठीं । काळ क्रोध दृष्टी पाहतसे ॥ ३ ॥
सावता म्हणे देवा नका ठेऊं येथें । उचलोनी अनंते नेई वेगीं ॥ ४ ॥

 

मथितार्थ : या अभंगात सावता महाराज संसारातील माया, मोह आपल्याला जखडून ठेवतात, त्यामुळे परमेश्वर भेट होत नाही. सावता महाराजांना विठ्ठल भक्तीतून परमेश्वर भेटीची आस लागल्याचे अशाप्रकारे दिसते त्यांनी अभंगातून विठ्ठल भक्तीची ओढ व्यक्त केली आहे.
-सावता महाराज विठ्ठलाला म्हणतात,हे देवा तू भक्तावर दया करणारा दयाळू आहेस असे असताना तू माझ्यावर रुसलास की काय ! माझ्यावर रागावला काय ? हे देवा मी तुझाच भक्त आहे त्यामुळे तुझी भक्ती करतो.तुझ्याशिवाय मी कोणाचीही भक्ती करीत नाही.मी गरीब ,हीनदीन,पापी आहे.हे देवा तूच माझा संभाळ कर कारण मी प्रापंचिक असल्याने प्रपंचातील आशा मोह मायाममता माझ्या पाठीमागे लागल्या आहेत .काळसुद्धा माझ्याकडे रागाने पाहतो आहे .त्यामुळे मरण येत आहे असे वाटते म्हणून मला येथे म्हणजे अशा ठिकाणी हे देवा ठेवू नको.यातून माझी मोकळीक कर.मुक्तता कर.

 

श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण


वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 

संत  सावतामाळी अँप डाउनलोड रा.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *