अकाराच्या माथा नकार बैसला – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -30
अकाराच्या माथा नकार बैसला । लकार भारला मिथ्या पाही ।।
ऐसा तो उमज नाही या मानवा । उगाच वणवा लागे देही ।।
विषयी गुंतला नाही केले ध्यान । पातकी दुर्जन अविचारी ॥
सावता म्हणे भजन करावे देवाचे । योग-याग तयाचे कष्ट बहू
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज भक्ति मार्गाचे महत्त्व भाविकांना सांगतात. परमेश्वर प्राप्त करण्याचे जे मार्ग आहेत, यामध्ये योगमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग यामध्ये योगमार्ग अतिशय खडतर असा आहे. योग मार्गात शरीराला यातना द्याव्या लागतात. इंद्रियाचे उपभोग घेणारे लोक त्याविषयी सुखातच रममाण होतात. त्यांच्या तुलनेने भक्ति मार्ग अतिशय सोपा व सर्वांना करता येण्यासारखा आहे. माणसाने देवाचे नामस्मरण करावे. भजन
पूजन करावे. जे देवाचे नामस्मरण न करता विषय सुखाच्या मागे लागतात, अशांना महाराज अविचारी, अविवेकी म्हणतात. भगवंताला
भक्त प्रिय आहे. त्याहूनही त्याची भक्ति अधिक प्रिय आहे. त्यामुळेच भक्ताचे अंतकरण धरूनच भगवंत राहतो. भगवंत हा भक्ति प्रेमात बांधलेला असतो. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात “तुका म्हणे भक्ति सुखाचा बांधीला | आणिक विठ्ठला धर्म नाही” अशा प्रकारचा भक्ति योग सावता महाराज या अभंगातून आपणाला सांगतात.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.