संत भानुदास

संत भानुदास गाथा

संत भानुदास गाथा खालील प्रमाणे.

वाचण्यासाठी खालील अभंग गाथेवर क्लिक करा.


संत भानुदास अभंग –
अद्वैत


संत भानुदास अभंग –
श्रीविठ्ठलमाहात्म्य


संत भानुदास अभंग –
पंढरीमाहात्म्य


संत भानुदास अभंग –
नाममहिमा


संत भानुदास अभंग –
रामनाममहिमा


संत भानुदास अभंग –
मुमुक्षूसबोध


संत भानुदास अभंग –
करूणा


संत भानुदास अभंग –
बालक्रिडा


संत भानुदास अभंग –
गौळण


संत भानुदास अभंग –
फुगडी


संत भानुदास अभंग –
काला


संत भानुदास अभंग –
मांभळभट


संत भानुदास अभंग –
पंढरीनाथांचीभेट


संत भानुदास हे एकनाथाचे पणजोबा की ज्यानी विजयनगरला नेलेली पान्डुरगाची मुर्ति पुन्हा पन्ढरीत आणली आणि पुनर्स्थापित केली. ते दामाजींचे समकालीन होत. इ. स. १४४५ ते १५१३ हा त्यांचा काळ. त्यांनी इ. स. १४६८ ते १४७५ या काळातील दुर्गादेवीचा दुष्काळ पाहिला होता. ‘ आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ’ असे त्यांनी म्हटले आहे. यावरून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती त्यांच्या कुळात परंपरेने चालत आलेली होती.

ज्ञानेश्वरांच्या काळानंतर महाराष्ट्रावर आलेले भयानक परकीय आक्रमण धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत हानीकारक होते. राजसत्तेच्या आश्रयाने होत राहिलेल्या या धार्मिक आक्रमणामुळे हिंदू लोकांत स्वधर्माचरणाची निष्ठा ढळू लागली होती. उत्तरेकडून येणार्‍या परधर्मीयांबरोबर हजारो सूफी उत्तर – दक्षिण भारतात राजाश्रयाने धर्म प्रचाराचे कार्य करीत होते.

इ. स. १३०० मध्ये निजामुद्दीन अवलिया सातशे सूफींचा तांडा घेऊन दक्षिणेत आला; हे लोंढे सतत येत राहिले. हजारो हिंदू आपणहून किंवा बलात्कारे बाटून मुसलमान झाले. देवळे – मठ उद्ध्वस्त होऊन त्या जागी पीर, दरगे, मशिदी उभ्या राहू लागल्या. हिंदू सरदारांना याचे काहीच वाटत नव्हते, कारण त्यांना आपापल्या जहागिरींचा विस्तार करायचा होता, म्हणून ते बादशहांच्या अंकित राहिले. पुणे, पुरंदर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कंधार, मंगरूळ, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणचे पीरांचे दर्गे सूफींचे आहेत. पैठण हे जसे महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र, पण या काळात सूफींनी पैठणातील गणेशाचे, एकवीरा देवीचे व महालक्ष्मीचे मंदिर उद्ध्वस्त करून त्याठिकाणी दर्गे उभे केले. ही गोष्ट इतिहासात नोंदली गेली आहे. संत भानुदास यांनी बालपणीच सर्व अध्ययन पूर्ण केले.

ईश्वराच्या भेटीसाठी त्यांनी अनेक दिवस ध्यानधारणा केली, सूर्य नारायणाची उपासना केली.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

संत भानुदास गाथा संत भानुदास

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *