संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग – कृष्णजन्म बालक्रीडा व कला

संत जनाबाई अभंग – कृष्णजन्म  बालक्रीडा व कला

२५९
गौळण म्हणे गौळणीला पुत्र जाहला यशोदेला ।।१।।
एक धांवे एकीपुढें । तार्टी वा सुंठवडे ।।२।।
सुइणीची गलबल झाली दासी जनी हेल घाली ॥३॥

२६०
मग म्हणे नंदाजीला पुत्रमुख पाहूं चला।।१।।
स्नान घालून त्यासी वस्त्रे दिली ब्राह्मणांसीं ॥२॥
परब्रह्म तें पाहुनी । ब्रह्मीं मिळे दासी जनी ।।३।।

हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग

२६१
आलिया ब्राह्मणासी दान द्रव्य दिधलें अपार जाण ॥१॥
गाईम्हसीची खिल्लारें । ब्राह्मणा दिली अपारें ।।२।।
कामधेनूची उभनी कल्पवृक्षाची दाटणी।।३।।
ऐसा आनंदसोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

२६२
वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥
संगतसे हा अंगणी माथा जावळाची वेणी॥२॥
पाय पैंजण आणि वाळे हातीं नवनीताचे गोळे ॥३॥
धन्य यशोदा ते माय दासी जनी बंदी पाय ॥४॥

२६३
ब्रह्मा वंदी ज्याचे पाय त्याची यशोदा ते माय ।।१।।
सामराज्याचा जो दानी मागे यशोदेसी लोणी ॥२॥
क्षीरसागर ज्याचे चरणीं । त्याला पायावरतें न्हाणी ||३||
देव ब्रह्मांड पालकीं त्याची टाळू हातें मारी ||४||
शुक सनकादिक योगी जनी म्हणे लागी ||५||

२६४
अहो गोकुळींच्या देवा आदि अंत तुम्हां ठावा ।।१।।
न लगे पुसावें हो कोणां आदि अंत हो सुजाणा ।।२।।
जनी म्हणे वो गोकुळ किती खासी उहावळी ॥३॥

२६५
असो थोरथोरांची मात । तूंचि मिळालासी गोपाळांत ।।१।।
त्यांच्या शिदोऱ्या सोडिसी ग्रासोग्रास उच्छिष्ट खासी ॥ २॥
न म्हणे सोंवळें आंवळें। प्रत्यक्षचि तें आंवळें ||३||
स्वानंदाचे डोहीं हात धुतले सर्वांही निश्चित ||४||
हातीं काठ्या पायीं जोडे। दासी जनी वाट झाडे ||५||

२६६
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटीं । माझा ज्ञानराज गोपाळाशी लाहा वाटी ॥१॥
नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरला । प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचूं लागला ||३||
नाचतां नाचतां देवाला गळला पितांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ||४||
साधु या संतांनी देवाला धरिला मनगटीं काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥
ऐसा कीर्तन महिमा सर्वामाजीं वरिष्ठ जड मूढ भाविका सोपी केली पायवाट ||६||
नामयाची जनी लोळे संतांच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देई गे बिठाई ||७||


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *