संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग – निश्चयपर

संत जनाबाई अभंग – निश्चयपर

२०५
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ||२||
नित्य हाचि कारभार। मुखीं हरि निरंतर ||३||
मायबाप बंधुबहिणी । तूं वा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

२०६
चला पंढरीसी जाऊं। रखुमादेवीवर पाहूं ।। १॥
स्नान करूं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥
डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा॥3॥
ऐसा निश्चय करुनी म्हणे नामयाची जनी ॥४॥

२०७
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी ||१||
आला विषयाचा कंटाळा जाऊं भेटू त्या गोपाळा ||२||
आवडीनें जगजेठी गळां घालुनियां मिठी॥३॥
आवडीनें गुज कानीं म्हणे नामयाची जनी |४||

२०८
तुझा लोभ नाहीं देवा तुझी करिना मी सेवा ||१||
नाहीं अंग थोरपण । मिथ्या नरिसी गुमान ॥२॥ ॥
राया येउनी काय करिशी तुझे बळ आम्हांपाशीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥

२०९
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे वैकुंठीं ।।१।।
सर्वभावें गाईन नाम। सखा तूंचि आत्माराम ||२|
नित्य पाय वंदिन माथा । तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥
रूप न्याहाळीन दृष्टी सर्व सुखें सांगेन गोष्टी ॥ ४ ॥
दीनानाथा चक्रपाणी दासी जनी लावी ध्यानीं॥५॥

२९०
आतां भीत नाहीं देवा आदि अंत तुझा ढाया ॥१॥
झाले नामाचेनि बळकट तेथे कुपवाट |२॥
ज्ञान वैराग्य विवेक बळें तें तंब आम्हांसवें खेळे ॥३॥
दयां क्षमा आम्हांपुढे जनी म्हणे झाले येडे ||४||

२११
माझें चित्त तुझे पायीं ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥
मुखीं उच्चार नामाचा काया मनें जीवें वाचा ॥२॥
धरणें तें ऐसें धरूं जनी म्हणे विठ्ठल स्मरूं ॥३॥

२१२
आम्ही पातकांच्या राशी आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥
मना येईल तें तूं करीं आतां तारी अथवा मारीं।।२।।
जनी म्हणे सृष्टीवरी एक अससी तूं वा हरी ॥३॥

२१३
मना लागो हाचि धंदा रामकृष्ण हरि गोविंदा ।। १ ।।
जिव्हे करूं नित्य नेम सदा विठोबाचें नाम ||२॥
नामामध्यें नामसार। जप करी निरंतर ||३||
म्हणे जनी नाम घेणें नाममंत्र शंकर होणें ||४||

२१४
स्मरण तें हेंचि करूं। वाचें रामराम स्मरूं ॥१॥
आणिक न करूं तें काम वाचें धरूं हाचि नेम ॥२॥
सुकृताचें फळ । जनी म्हणे हें केवळ ||३||

२१५
मनामार्गे मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥
मग आम्हां काय उणे दया करी नारायण ॥२॥
जनी म्हणे ऐसें मन करूं देवा हो आधिन ।।३।।

२१६
सत्त्वरजतमें असे हैं बांधिलें। शरीर दृढ झाले अहंकारें ।।१।।
सांडीं अहंकार धरीं दृढभाव हृदयीं पंढरिराय धरोनियां ।।२।।
नामयाची जनी भक्तीसी मुलली ते चरणी राहिली विठोबाचे।।३।।

२१७
नित्या सारूं हरीकथा । तेथें काळ काय आतां ।। १ ।।
वनवासी कां धाडिलें । कृपाळे वा हो विठ्ठलें || २ ||
आशा मनशा तृषा तिन्ही ह्या तो ठेविल्या बांधोनि ।।३।।
काम क्रोध विषय झाले। हें ताँ मोहोनि राहिलें ।।४।।
अवलोकृति कृपा दृष्टि। जनी म्हणे देई भेटी ॥५॥

२९८
करूं हरीचें कीर्तन गाऊं निर्मळ ते गुण ।।१।।
सदा धरू संतसंग मुखी म्हणूं पांडुरंग ॥२॥
करूं जनावरी कृपा रामराम म्हणवू लोकां ॥ ३॥
जनी म्हणे कीर्ति करूं नाम बळकट धरूं ॥४॥

२१९
आनंदाचे डोहीं। जो कां समुळ झाला नाहीं।।१।।
कीर्तनें जन्मला हरीभक्तीनें शिंपिला॥२॥
आळवितसे अंतवरी वाचा नाम लाहो करीं ||३||
समूळ झाला नाहीं। देहें जनी विठ्ठल पायीं ॥४॥

२२०
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥
नलगे बैकुंठ न वांछू कैलास । सर्वस्वाची आस विठोपायीं ॥२॥
नलगे संतति धन आणि मान। एक करणें ध्यान विठोबाचें ॥३॥
सत्य कीं मायीक आमुचे बोलणें तुमची तुम्हां आण सांगा ही ||४||
जीवभाव आम्ही सांई वाळूनि म्हणे दासी जनी नामयाची ॥५॥

२२१
आतां येतों स्वामी कृपा असो द्यावी तुम्ही ॥१॥
बहु दिवस सांभाळ केला पुन्हां जन्म नाहीं दिला ॥२॥
थोर सुकृताच्या राशी तुमचे पाय मजपाशीं ॥३॥
ऐसा नामदेव बोले। ऐकोनी दासी जनी डोले ||४||

२२२
मी तो समर्थांची दासी मिठी घालीन पायापासीं ।।१।।
हाचि माझा दृढभाव करीन नामाचा उत्सव ॥२॥
आम्हां दासीस हैं काम मुखीं विठ्ठल हरिनाम ॥ ३॥
सर्व सुख पायीं लोळे जनीसंगें विठ्ठल बोले ॥४॥

२२३
नामयाचे ठेवणें जनीस लाधलें। धन सांपडलें विटेवरी ।।१।।
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश | धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥
कामधाम माझे विठोबाचे पाय दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥
माझ्या वडिलांचें दैवत तो हा पंढरिनाथ । तेणें माझा अर्थ पुरविला ॥४॥
संसारीचे सुख नेघे माझे चित्तीं । तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ||५||
नामयाचे जनी आनंद झाला हृदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥

२२४
धन्य ज्याचे चरणीं गंगाओध झाला मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥
धुंडितां ते पाय शिणला तो ब्रह्मा। बोल ठेवीं कर्मा आपुलीया ॥ २॥
शुक सनकादिक फिरती हरिजन नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥
ते चरण आम्हांसी गवसले अनावासी धन्य झाली दासी जनी म्हणे ||४||

२२५
डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी ॥ १॥
हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ।।२।।
पंढरिच्या पेठें मांडियेलें पाल। मनगटावर तेल घाला तुम्ही ||३||
जनी म्हणे देवा, मी झालें वेसवा रिघालें केशवा घर तुझें ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *