संत नागरी अभंग

संत नागरी अभंग

संत नागरी अभंग

अभंग – १ 

रामयाची कन्या गोरटी गोवळी।
बापे बोळविली सासुरिया ।
सवे दिधली दासी घरीची आंदणी ।।
बाळ सांगातिणी आवडती ।।१।।
दिव्य त्याचे दुःख नाठवे त्या चित्ती ।
उदंड विश्रांती रामनामे ॥धृ॥
आता सासुरवासी आनंदचि मनी ।
मांडिती अंगणी हाचि खेळ ।
तुळशी वृंदावने चौक रंगमाला ।
संभ्रम सोहळा देव पूजा ||२||
करुनि मृत्तिकेची पांडुरंगमूर्ती ।।
तियेसी खेळती भावबळे ।
इति रसरंग पूजा पुनस्कार।
करिती उपचार आवडीचे ॥३॥
करुनी प्रदक्षिणा लोटांगण येती ।
देव एकी देती आळिंगणे ।
विठ्ठल विठ्ठल म्हणवुनि नामे वाती ताली ।
वंदिती पायधुळी येरवेरीचे ||४||
कान धरूनि पुढे नाचती आनंदे ।
संती पदबंधे सरळवरळ ।
नयनाचेनि नयन देखिले रुपडे ।
क्षण घाडी न पडे विसरू त्याचा ||५||
आपुले निरंगे खेळती परवडी ।
जे जीवी आवडी बैसलीसे ।
भक्तीचा गौरव भजनाचे वैभव ।
जो होता अनुभव केला मने ||६||
भक्ति शिरोमणी त्या बालयोगिणी ।
जन्मांतरीच्या दोन्ही योगभ्रष्टा ।
नेणति नी मने प्रेमे एकविधे ।
नागरी स्वानंदे ओसंडली ||७||


अभंग – २ 

ऐसीया खेळतां दिवसदिवसी, तंव आली एकादशी ।
आनंद मानसी बहुत दोषी।।
माहेरीचे सुख आठऊनि जीवी ।
प्रीती नीच नवी पाहावया ॥१॥
कामधाम मनी नाही आठवण ।
अखंड हे ध्यान कीर्तनाचे ।।धृ।।
पाहता पर्वणु अजिचा हरिदिनु ।
सर्वमुख सण वैष्णवाचा ।।
आजी डोळया पाहणे होईल सोहळा ।
भेटतो जे वेळा संतसखे।।२।।
तान्हे बाछ जेवी चित्ती धेनुलागी ।
तैस्या तथा दोषी उतावीळा ।।
वाटुनि पाहाता उत्कंठित मनी ।।
गेली विसरोनी तानभूक ॥ ३॥
क्षणाक्षणि वास पाहाती करुनी ।
परी न देखती नयनी पूजाविधी ।।
प्राण व्याकुळ माझा होय कासावीस ।।
दिसती उदास दाही दिशा ||४||
केले मनोरथ नव्हती परिपूर्ण ।
तळमळीत मन चिंतातूर ।।
म्हणतसे नागरी आता काय करु ।
जीवा न धरे धीरु जाऊ पाहे॥५॥


अभंग – ३

आजि सुखसमारंभ न देखे याचा ।
घरी जीवा जड भारी वाटे मज ।।
दिंडी मखरे चौक रंगमाळा ।
न देणे सोहळा हरिकथेचा ॥१॥
तेणे माझा प्राण होये कासावीस ।
कां केले उदास पंढरीराया।।धृ।।
न देणे उजवणी मंडपाचिये परी ।
तोरणे साजिरी शोभिवंते ।
जाई जुई चापे मोगरे सेवंती ।
गुंफिता न दिसती तुळसीमाळा ।।२।।
न देखे स्वस्तिके सुरेखे गोमटी।
रत्नदीप ताटी कुरवंडिया ।।
मोरपिसा वेठी हिरे ढाळिती परवडी ।
न देखे देवती कृष्ण वरी ।।३।।
सुकाचे मोइरे जिवलग सांगाती ।
हरिनामे गर्जती हरीचे दास ।।
टाळ घोळ मांदल हालिया श्रूती ।
वाचता न दिसती आजि जेथे ॥ ४॥
कोण तयावीण आमुली पुरवील ।
माझ्या भेटवील पांडुरंगा।।
प्राण जातो वेगी करा वो धावणी ।।
देह टाकी धरणी हृदय पिटी ||५||
विठ्ठल विठ्ठल म्हणऊनी मोकलिली थाये।
दाही दिशा पाहे वाट त्याची ।
ऐसे अवस्थेचेनि भरे दाटली गहिवरे ।
म्हणे भेटी दे रे पंढरीराया ।।६।।
तुझी निजदासी नेई चरणांपासी ।
नागरी परदेसी वाट पाहे ॥७॥


अभंग – ४

तेव तिये घरीची सासुरी दुरळे पे ऐसी ।
म्हणती जाली ईसी भूतबाधा ।।
नेघे अन् उदक व्याकुळ मानसी।
स्फुंदत उकसाबुकसी प्रेमाछंदे ।। १ ।।
परकुळीचे इणे देखिले दैवत ।
तेणे हिचे चित्त भुलविलें ॥धृ॥
तव ते दुर्जनी बांधली चरणीं ।
म्हणती हे पळोनी जाईल झणे ।
नेऊनी भीतरी कोंडिली मंदिरी।।
कवाडे बाहेरी अडकुनिया ।।२।।
येरी अवस्थाव्याकूळ जाहालीसे मनी ।
करी चितवाणी देखावया ।
हरिकथेची सये लागलीया जीवा ।
गेली देहभावा विसरोनी ।। ३ ।।
परा परयंती मध्यमा वैखरी ।
गिळुनी वाचा य्यारी तन्मय जाली ।।
सावळे रूपडे देखे हत्कमळी।
निजभावे वोवाळी प्राणनाथा ||४||
आर्त गौरव बोले आवडीचे कळवळे ।
निवविलें कृपाळें पांडुरंगे ।
अनाथ नागरी मनेसी येकटी ।
सांगे सुखगोस्टी अंतरंग ॥५॥


अभंग – ५ 

माझयांचा ठाव नरसी ब्राह्मणी ।
आठवत मनी रात्रीं दिवस ।।
देखावया जीव तळमळीतो माझा |
विठोबाची पूजा हरिकीर्तनी ।।१।।
कोण जिवलग पुरवील माझी आस ।
प्राण कासावीस होतो माझा।।धृ।।
विठोबा धणी कां न ये अझुणी ।
मज सोडऊनी न्यावयासी ।
कृपेच्या सागरें कां मज टाकिलें ।
काये मी चुकलें सेवाविधी ॥२॥
त्याचें श्रीमुख निर्मळ नयन कमळदळ ।
अनाथकृपाळ म्हणवीतसे।
आजि कैसा धीर धरवलासे तया ।
निजकोवसया नारायेणा ॥३॥
मुगुट विराजित मोरपिसा वेठी ।
कुंडले गो (म) टी श्रवणपुटी ।।
वोरसला भेटी के ये (ई) ल धावत।
देखेन नाचत संतांमाजीं ||४||
पदक हृदयावरी वैजयंती माळा ।
सुकुमार सरळा बाहु त्याचे ।
जडित दशांगुळे साजिरी वीरकंकणे ।
तो केव्हा अभयदान देईल मज ॥ ५॥
सोनेसळा सेला कासे मालगांठी ।
चर्चियेली उटी चंदनाची ।।
रुणझुणीत वाकी ब्रीदांना तोडर ।
त्रिभवनासुंदर देखेन केव्हा।।६।।
कस्तुरीमळीवट रेखिला सुरेख ।
ब्रह्मांडनायक सुखसिंधु ।।
लावण्यपुतळा तो माझा कैवारी ।
पाहेन घणीवरी केव्हा नयनी ।।७।।
या रूपाची सवे लागलीसे नयना ।
जीवीचे गुज कोणा सांगो माझे ।।
आंतीचा कळवळा अवस्तेची तळमळ ।
जाणे तो कृपाळ विठो माझा ||८||
ऐसी उत्कंठित जीवी मनाचेनि मने देहसुख ।
नेणे आठऊ नाही।।
विठ्ठल विठ्ठल म्हणउनी सोकारिते धावा ।
देई चरणसेवा नागरीसी ।। ९॥


अभंग – ६

ऐसी विज्ञाता मनी माध्यान लोटली ।
घूमी जे दाटली निद्रा नयेनी ।।
सवेच जागृती सांभाळी परतोनी ।
तब उभी कीर्तनी माहाद्वारी॥१॥
केले मनोरथ पुरविले गोपाळें ।
या दीनदयाळे पांडुरंगे।।धृ।।
तेणे सुखे दृष्टी न परतेचि पाही ।
कोंदली हदई प्रेमपुरे ।।
विसरोनि देहभाव लोटांगणे घाली ।।
निजमायें दीवाळी देवा भक्तां।।२।।
तेथे हरिकथाश्रवणें श्रवण माझे घाले ।
डोळे पे निघाले पाहातां रूपा ।
नामामृतपान रसने समाधान।
प्राण तुळसीसुमकरंदे ।।३।।
तपताप विसरली मावळली अहंता ।
संतांच्या लोळता चरणरजी ।
आपुल्या ठाई सहजसुख पाली ।
इंद्रिये निधिली सवासने।।४।।
सहित चित्त बुडालें आनंदी ।
लागली समाधी योगेवीण।
स्वप्न ना जागृती नाही देहस्थिती ।
नाथिली शुषुप्ती तुर्या अवस्छा ||५||
तेथे संकल्प विकल्प भोग्य आणि भोगणें ।
घ्यावे द्यावे मने कवणाचेनि ।
बाहेरभीतरी नाही आठवण ।
सुर्खे त्रिभुवन वोसंडले॥६॥
स्वभक्तपुण्यरासी चिन निर्विकल्प ।
जो स्वरूपसंकल्प स्वभक्तांचा ।
सकलनायक दिनांचा कैवारी आर्पिली नागरी प्रेमसुख ।।


अभंग – ७ 

हर्षे आला प्रात:काळ उजळल्या दशदिशा।
ऐका परमपुरुष उपवड ।
झाली कुरवंडिया लिंबलोण ।
झाले संतजन ब्रह्मरसे ॥। १॥
आदि मध्ये अंतु नाही त्या आनंदा ।
बोध जेथे सदा रामरामी।।धृ।।
रामाच्या अन्य भक्तिरस प्रेमाचा बोरस ।
स्थाने चौरस पांडुरंगे ।
रामाच्या अनुभवे प्रेम तुंबळले ।
हृदयी बिंबले कृष्णरूप।।२।।
रामसंतराने चालिले तेथूनि ।
तव देखिली कीर्तने मागे उभी।
चित्रीची पुतळी दिसे पै तेजाळी ।
अंतरी जनमाळी सुरवाडला ||३||
देखोनिया रामा कोपला मानसी ।
करी धरुनि तिसी ब्राह्माटिले।
ओकली गोवळी सासुरवासिणी ।
आलीसी टाकुनि वारगळे ।।४।।
काये तुज पिडणी सांग झाले तेथे।
स्वाछे कुंदते हृदय तुझे।
शांतिचेनी पडिभरे दाटलिसे कंठी ।
शब्द न रिघे मिठी पडली वाचे ।।५॥
सकळही संतजन पाहाती विचारुनी ।
हे तव उन्मनी भोगीतसे ।
नेणे दुःखबाधा देहभाव नाटवी ।
विगुंतले केशवी चित्त इथे ||६||
ते निजव कळले का नामदेवा ।
लाधली हे देवा वैकुंठीचा ।
मग रामयाते म्हणे लाग इच्छा पाया।
जाहाला भाग्योदयो आजि तुझा ।।


अभंग – ८

एके चरणी नामा दुजे चरणी रामा।
लोटले सोमा न स्वस्त ।।
येरी ते अवधारी आली देहावरी।
पावलो सांवरी भयभीत ||१||
सिंणले माझे मन ज्या सुखाकारणे ।
में आजि पारणे जाहाले देवें ।।धृ।।
माझिये जीवीचे सांगो जडभारी ।
रामया अवधारी मायेचापा ।
विठोबाची सवे लागलीया मना ।
फुटला त्यावीण प्राण माझा ||२||
दिवस बारावरी होते त्याचे घरी ।
सांगती तें करी म्हणीये त्याचे ।
परी अखंड माझा चित्ती वसे पंढरीनाथ ।
कीर्तनाचे आर्त संतसंगे ॥३॥
हरिकथेचा सोहळा नाही त्याचा गांवी ।
खंती माझा जीवी वाटे थोरी।।
अनि उदक गोड न वटे मज काही ।
जीवन माझे नाही कृष्णकथा ||४||
मग आपुले आवडी करून दोघी जणी ।।
खेळो अनुदिनी हाचि खेळ ।।
विठोबाची मूर्ती करूनि पाहो दृष्टी ।
मर्ने देऊनी मिठी सुख वाटे ॥५॥
तंबवरी आस धरिली होती म्या मानसी ।
जंब ये येकादसी माय माझी ।।
मी म्हणे सोहळे होती या मनाचे ।
आर्त कीर्तनाचे पुरेल माझें ॥६॥
परी हे सुखवार्ता नाही त्या देवहंता ।
तेणे मज चिंता वाटे थोरी ।।
ते कस्ट दारुण सांगो मी कोणासी ।
मग मनें विठोबासी शरण आले ॥७॥
त्या कृपेच्या सागों का विदान केलें ।
हें मज न कळे मायेबापा ।।
आतं पुरविले इतुकेधि भी जाने ।
परी देखिलें सुख मने बोलता न ये॥८॥
म्हणउनी गहिवरें दाटली मानसी ।
फुंदे उकसाबुकसी उमज नाही।।
निवांत नागरी गिळुनी ठेली वाचा।
लोटला सुखाचा माहापूर ।।९।

(संत नागरी अभंग – सासवड येथील संत सोपानदेव संस्थानचे श्री. चिंतामणी गोसावी यांच्या संग्रहातील डॉ. रा. नि. ढेरे यांनी संपादित केलेले अभंग)


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *