संत लाडाई अभंग

संत लाडाई अभंग

संत लाडाई अभंग

अभंग – १

पूर्वसंबंधें मज दिधलें बापानें शेखी काय जाणें कैसें जालें ॥१॥
प्रमुतीलागी मज आणिलें कल्याणा। अंतरला राणा पंढरीचा ॥२॥
मुकुंदें मजशी थोर केला गोवा । लोटियलें भवनदीमाजी ॥३॥
ऐकिला वृत्तांत सर्व जालें गुम माझेंचि संचित खोटें कैसें ॥४॥
द्वादशबहात्तरी कृष्ण त्रयोदशी आषाढ हे मास देवद्वारीं ||५||
सर्वांनी हा देह अर्पिला विठ्ठलीं मज कां ठेविलें पापिणीसी ॥६॥
लाडाई म्हणे देह अपन विठ्ठला । म्हणोनी आदरिला प्राणायाम ॥ ७ ॥


अभंग –

अनाथाचा नाथ, दिनाचा दयाळ म्हणवोनी सांभाळ करी माझा ।।१।।
तुजा ऐसा देवा नाही त्रिभुवनी । म्हणवोनी चरणी विनटले ।।२।।
बापा विठ्ठलराया करी कृपादान सांभाळी वचन आपुले ते ।। ३।।
लाडाईम्हणे देवा भेट देई वेगी । ब्रीद तुझे जगी दीननाथा ॥ ४ ॥

(संत नामदेवांच्या गावेतील संत आऊबाई, संत लिंबाई व संत लाडाई यांच्या नाममुद्रा असलेले अभंग)


अभंग – ३

जोडोनिया पाणि करी विनवणी धांय चक्रपाणी पांडुरंगा।।१।।
कोणा निरविले हे नाही कळले येई गे विठ्ठले मायबहिणी ||२||
ऐकोनियां धांवा धांवला अनंत शंख चक्रांकित उभा पुढे।।३।।
उचलोनि मुकुंदा चाली योग सांभाळीला तुझा थी॥४॥
देव म्हणे तुझ्या पुर्वजांसी भाका दिवाली ऐक सांगतो मी ॥५॥
तुमची वंशावळी पोशीन मी सत्य। म्हणोनि कुर्वाळी पाद्य करा ॥६॥
येरी चरणावरी) ठेविला माथा | कृपाळू अनंता सांभाळावे । ॥७॥
ध्यानी धरोनिया मूर्ती सबाह्या अंतरी आता याउपरी न देखे कांही ॥८॥
लाडाई म्हणे देवा घेई हृदयात देव मग गुप्त केली तेथे ||९||

(अप्रकाशित)


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *