संत सोपानदेव अभंग

संत सोपानदेव अभंग

संत सोपानदेव अभंग – पंढरीमाहात्म्य व नामपर

संत सोपानदेव अभंग – १

उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।
वैकुंठीची वाटपंढरी जाणा ॥१॥
दृष्टीभरी पाहे दैवत ।
पूर्ण मनोरथ विठठलदेवे ।।२।।
हाची मार्ग सोपा जनासी उघड |
विषयाचे जाड टाकी परते ॥३॥
सोपान म्हणे गुफसी सर्वथा।
मग नव्हे उत्तथा भक्तिपंथे ॥४॥


संत सोपानदेव अभंग – २

चलारे वैष्णवलो जाऊ पंडरीयेसी ।
प्रेमामृत खुण मागो त्या विलासी ॥१॥
चालिले गोपाळ वाहताती वाकुल्या ।
भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळीया ॥२॥
दिंड्या गरूडटके मृदंगाचे नाद ।
गाताती विठ्ठलनाम करिताती आल्हाद ।।३।।
प्रावले पंढरी भीमा देखीयेली दृष्टी ।
वैष्णवांवा गजरू आनंदे हेलावली सृष्टी ॥४॥
गजरू गोपाळांचा श्रवणी पाडेयेला ।
शंखचक्र करी विठ्ठल सामोरा आला ॥५॥
कासवदृष्टी न्याहाळीतु रंगी नाचतु पै उगला ।
सोपान म्हणे आम्ही वाळवंटी केला काला ॥६॥


संत सोपानदेव अभंग – ३

आणीक ऐके गा दुता ।
जेथे रामनाम कथा तेथे करद्वय जोडूनी हनुमंता ।
सदासन्मुख असिजे ।।१।।
रामनामी चाले घोष ।
तो धन्य देशु धन्य दिवसु ।
प्रेम कळा महा उल्हासु ।
जगन्निवासु विनवितुसे ।।२।।
दिंड्या पताका मृदंग ।
टाळ घोळ नामे सुरंग ।
तेथे आपण पांडुरंग ।
भक्तसंगे नाचत ॥३॥
तथा भक्ता तिष्टती मुक्ती ।
पुरुषार्थ तरी नामे कीर्ति ।
रामनामी तया तृप्ती ।
ऐसे त्रिजगती यमु सांगत ।।४।।
ज्या नामे शंकर निमाला।
गणिका अजामेळ पद पावला।
अहिल्येचा शाप दग्ध माला ।
तोची पान्हा दिवला पांडुरंगे ॥५॥
चित्रगुप्त म्हणती यमा ।
काय करावे गा धर्मा।
लोक रातले रामनामा ।
पुरुषोत्तमा विठ्ठलदेवा ॥६॥
कलिकालासी दाटुगे नाम ।
रुखे घरीले मला प्रेम ।
त्रिभुवनी विस्तारीले सप्रेम ।
रामनाम उच्चारी यम तोही तरला जाणा ।७।।
ऐसे नाम अगाध बीज ।
उच्यारी तो होय चतुर्भुज सोपान म्हणे है गुज ।
उमाशंकर देवाचे ॥८॥


संत सोपानदेव अभंग – ४

सर्वकाल ध्यान हरिरुप ज्याचे ।
तथा सर्व रुप साचे जवळी असे ॥
हरि हरि जाला प्रपंच अबोला ।
हरिसुख निवाला तोचि धन्य ।।१।।
हरि हरि जाला प्रपंच अबोला ।
हरिसुख निवाला तोची धन्य।।२।।
हरि हेचि मन संपन्न अखंड ।
नित्यता ब्रह्मांड त्याचे देही ।।३।।
सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु ।
हरि रूपी रतु जीव शिव ॥४॥


संत सोपानदेव अभंग – ५

मनाचे मवाळ हरिरुप चितिती ।
रामकृष्ण मूर्ति नित्य कथा ।।१।।
रामकृष्ण ध्यान सदा पै सर्वधा ।
न पवेल आपदा नाना योनी ॥२॥
हरि ध्यान जप मुक्त पै अनंत ।
जीव शिवी रत सर्वकाळ ॥३॥
सोपान प्रेमा आनंद हरीचा ।
तुटला मोहाचा मोहपाश ॥४॥


संत सोपानदेव अभंग – ६

आवडीचे मागे प्रवृत्तीचे नेघे ।
नाममार्गे वळगे निषे रया ।।१।।
नाम परब्रह्म नाम परब्रह्म ।
नित्य रामनाम जपीतुसे ॥२॥
अंतरीच्या सुखे बाहिरिलिया ।
वैखे पर्रह्म सुखे जपतुसे ॥३॥
सोपान निवांत रामनाम मुखात ।
नेणे दुजी मात हरिविण ।।४।।


संत सोपानदेव अभंग – ७

सबाझ कोंदले निरवात उगले ।
रामरसे रंगले अरे जना ।।१।।
हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण ।
दिननिशी प्रश्न मुखे करा ॥२॥
तरा पै संसार रामनामे निरंतर ।
अखंड जिव्हार रामरसा ॥३॥
सोपान जपत रामनामी रतु ।
नित्यता स्मरतु रामकृष्ण ॥४॥


संत सोपानदेव अभंग – ८

अव्यक्ताच्या घरी प्रकृति कामारी ।
निषधे माजि घरी दडोनिया ॥१॥
तैसे नका करू प्रगट सर्वेश्वरू ।
हरिनाम उच्चास जपा वाचे ।।२।।
विज्ञानी पै ज्ञान आटलेसे संपूर्ण ।
उभयता चैतन्य तैसा हरि ॥३॥
सोपान निवांत रामनामी रत ।
संसार उचित रामनामे ।।४।।


संत सोपानदेव अभंग – ९

मोकषालागी धन वेचावे नलगे ।
रामकृष्ण वोळगे जपीतुसे ।। १।।
रामकृष्ण मुखे तया अनंत सुखे ।
तो जाय विशेषे बैकुठभुवनी ॥२॥
वेगाचेनि वेगे जपा लागवेगे ।
प्रपंथ वाजगे हरिनामे ॥३॥
सोपान संचित रामनामामृत ।
नित्यता सेवित हरिकथा ॥४॥


संत सोपानदेव अभंग – १०

ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी ।
तरला पै वेगी वेदु बोले ।।१।।
हरि हाचि आत्मा तत्व पै सोहपे ।
लरितील पापे लरिनामे ॥२।।
वैकुठीचे सुख नलगे पै चित्ती ।
हरि हेचि मुर्ति विद्ठल ध्यावो ।।३॥
याचेनि स्मरणे कैवल्य साचार ।
सोपान विचार हरि जपे॥४॥


संत सोपानदेव अभंग – ११

हरिनाम जपे सहस्त्रवरि सोपे ।
जातीलरे पापे अनंतकोटी ।। १।।
हरिविण नाम नाहीपारे सार ।
दुसरा विधार करू नको ॥२॥
हरि ध्यान चोख पवित्र परिकर ।
नित्यता शकर हरिष्यानी।।३॥
शा सोपान म्हणे हरि जप करारे सर्वथा ।
न पावाल व्यथा भवजनी ॥४॥


१२

कृष्णाचिया पंथे चालिलो दातारा ।
तब मार्ग येसरा तुजमाजी ।।१।।
आदि ब्रह्ममूर्ति तूचि विष्णु स्थिती ।
तुज कैवल्यपती मोल नाही ।।२॥
अमोल्य जे वस्तु पुंडलिक देवा ।
जगाचा विसावा जनकु माझा ॥३॥
सोपान म्हणे साफडे तुजचि सर्व कोडे ।
विनवितु मी बाडे वरणापाशी ॥४॥


१३

राम कृष्ण मूर्ति या पुजीतसे भावे ।
सर्व तुवा व्हावे केशीराजा ॥१॥
रामकृष्ण म्हणे नित्य काळसदा ।
नेणे दुजा बंदा तुजविण ॥२॥
माहेर आठवे करिता कामना ।
तुझ्या चरणी वासना जडोनि ठेली ॥३॥
सोपान म्हणे सरते तुजचि आवडते ।
माझया मनोरथे तूची आशा ॥४॥


१४

भी नेणे ती भक्ति नेणे त्या मुक्ति ।
तुझ्या नामपंथी मार्गु मना ॥१॥
हेचि मज चाड न करि मी आशा ।
तुज हषीकेशा चितितुसे ।।२।
तूची माझे धन जोडी हे निजाची ।
जननी तू आमुची जीवलगे ।।३।।
सोपान म्हणे तुजविण न कळे ।
तुजमानी सोडळे मने केले ॥४॥


१५

सर्वपटी रुप समसारिखे आहे ।
म्हणोनिया ते सोय आम्हा भक्ता ।।१।।
निर्गुणी सगुण गुणामाजी गुण ।
जन तू संपूर्ण दिससी आम्हा ॥२॥
तेचि रुप रूपस दाविसी प्रकाश ।
पंढरीनिवास होऊनी ठासी ॥३॥
सोपान सलगी न बोलता उगा ।
तुजविण वाउगा ठाव नाही ॥४॥


१६

सागरीचे सोय जगा निवारीत ।
मागुते भरीत पूर्णपणे ।। १॥
तैसे आम्ही दास तुज माजी उदास ।
तू आमुचा निवास सर्व देवा ॥२॥
तुजमाजी विरो सुखदुः विसरो ।
तुझ्यानामे तरो येची जन्मी ।।३।।
सोपान निकट बोलोनी सरल ।
तुष्टला गोपाळ अभय देत ॥४॥


१७

हरिसुखवेषे नाचतो सर्वदा ।
गोविंद परमानंदा हरिबोधे ॥१॥
रामकृष्ण नामी या नामी आनंदु ।
नित्पनित्य गोविंद आम्हाधरी ॥२॥
निगुण नेणे सगुणाचार ।
सगुण विचार सर्वकाळ ॥३॥
सोपान पावप अवघेचि हरिरुप ।
हरिविण स्वरुप ने चित्ती॥४॥


१८

गोपाळ अच्युत हा नाममहिमा ।
नित्यता पूर्णिमा आम्हा देही ॥१॥
रामकृष्ण नाम हा जप परम ।
ऐसा नित्य नेम सारू रया ॥२॥
वासना वोढाळ नेषो पै बरळ ।
नित्यता अढळ गोपाळ सेवू ॥३।।
सोपान सार जपतुसे नाम ।
दिननिशी नेम हृदयात ॥४॥


१९

गोविंद मायव हा जपु आमुचा ।
नाही प्रपंचाचा आम्हा लेशु ॥१॥
गोविंद स्मरणे नित्यता पारणे ।
हरिनाम पटणे मोभमुक्ति ।। २।॥
नलगती तीर्थे एक गोविंद पुरे ।
वेगी कृष्ण धुरे बोलगो सदा ॥३॥
सोपान सांगत गोविंद स्मरणे ।
नित्यता ध्याने गोविंद ऐसे॥४॥


२०

विठ्ठल पै सार हा जपु आमुचा ।
आणि त्या शिवाचा नित्यनेमु ।।१।।
गोविंद श्रीहरि हेचि तो उच्चारी ।
शिव वराचरी आत्माराम ।।२।।
नामेविण नेणे दुनियाची मातु ।
गोविंद स्मरतु शिवराणा ॥३॥
सोपान धारणा गोविंद पाठाची ।
कोटि पै कुळाची कुळवडी ।।४।।


२१

हरिविण दुजे न देखे चित्त माझे ।
म्हणोनि सहजे विचरतु १॥
सर्व हरि हरि तो माझा कैवारी ।
दुजी भरोबरी नेघो आम्ही ॥२॥
राम हा सकळ सर्व आम्हा आहे ।
दुजे ते न साहे परब्रह्मी ॥३॥
सोपान सलगी विनवितो तुम्ता ।
सर्व हा परमात्मा आम्ता दिसे ।।४।।


२२

हरिविण दुजे नावडे पै दैवत ।
जी समर्थ बोले सृष्टि ।।१।।
हरिराम गोविंद नित्य हाचि छंद ।
हृदया आनंद प्रेमबोधु ॥२॥
हरि हेचि दैवत समर्थ पै आमूचे ।
बोलणे वेदांचे बोलती मुनी ॥३॥
सोपान आलगटु नामपाठ वावे ।
नित्य विठ्ठलाचे चरण सवयी ॥४॥


२३

नाही नाही भान न दिसे प्रपंच ।
रोहिणी आहाव मृगजळ ।। १।।
तुटलासे साटा वासना चोखाळ ।
दिननिशी फळ राम झाला ॥२॥
रामेविण दुजे नाही पै हो बिजे ।
बोलतु सहजे वेदु जाणा ॥३॥
निरवृत्ति खुणा विज्ञान देवा हरि ।
सोपान झडकरी झोबियेला ॥४॥


२४

तुझा तुचि थोर तुज नाही पार ।
आमुचा आचार विद्वलदेव ।। १।।
आपी सधर सर्व हा श्रीधर ।
सर्व कुळाचार पांडुरंग ॥२॥
न दिसे दुसरे निर्धारिता खरे ।
श्रीगुरूविचारे कळले आम्हा ॥३॥
सोपान म्हणे रखुमादेवीवर ।
तूचि आमुचे पर कुछवटी ॥ ४ ॥


२५

मी माझी कल्पना पळाली वासना ।
जनी जनार्दना सेवितुसे ॥१॥
तू तव संपन्न आमुवे हो थन ।
सांगितली खूण निवृत्तीदेवी ॥२॥
तुजमाजी प्रेम गेले सप्रेमे ।
जप व्रत नेम हारपले ॥३॥
सोपान सगळा न दिसे इही डोळा ।
तूची बा गोपाळा आत्माराम ॥४॥


२६

आत्मरुप सुख आत्मपणे चोख ।
निर्गुणीचे चोख सगुणी जाले ।।१।।
रुप अरुप रूयामाजी सर्व ।
रूपी भावाभाव नाटवती ।॥२।।
बुडाले सगुण नाही मी तू पण ।
अंतराची खूण मावळली ॥३॥
सोपान गुरू ते ते ब्रह्म पुरते ।
पुसोनी आरूते ठाकियेले ॥४॥


२७

पहाते न नटे मन तिये वाटे ।
बोलणेची खुटे बोलणेपणे ॥१॥
परतल्या श्रुती पडियेले मौन ।
शास्त्र ते संपन्न नेणे तया ॥२॥
गेला तो आचार आवघाची विचार ।
परे परता पर परब्रह्म ॥३।।
शा सोपान दयाळ गुरूनामे बळ ।
आपण निखळ आपरूपे ॥४॥


२८

दिन व्योम तारा ग्रहगण शेखी ।
एक हपीकेशी सर्व आम्हा ।।१।।
ब्रह्मेविण नाही रिता ठावो पाही ।
निवृत्तीच्या ठायी बुडी देत ।॥२॥
सर्व हे निखळ आत्माराम सर्व ।
नाही देहभाव विकल्यता ।।३।।
सोपान निकट गुरूनामपेठे ।
नित्यता वैकुंठ जवळी असे ॥४॥


२९

आम्ही नेणो माया नेणो ते काया ।
ब्रह्म लवलाह्या आम्हामाजी ।।१।।
मी तू गेले ब्रह्मी मन गेले पूर्णी ।
वासना ते जनी ब्रह्म जाली ॥२॥
जीवशिवभाव आपणची देव ।
केला अनुभव गुरूमुखे ।।३॥
सोपान ब्रह्म वर्ततसे सम ।
प्रपंचाचा अम नाही नाही ॥४॥


३०

दुजेपणी ठाव द्वैत हे फेडिले ।
अद्वैत बिंबले तेजोमय ।। १ ॥
तेजाकार दिशा बिंबी बिंब एक ।
निवृत्तीने चोख दाखविले ॥२॥
निमाली वासना बुडाली भावना ।
गेली ते कल्पना ठाव नाही ॥३॥
सोपान नैश्वर परब्रह्म साचार ।
सेवितु अपार नाम घोटे ॥४॥


३१ – उपदेशपर

हरि असे देही हाचि भावो खरा ।
वाया तू सैरा धावू नको ॥१॥
धावता अवचटे पडसील व्यसनी ।
संसारपसणी योनिमाळे ॥२॥
हरिचेनि ध्यान निरंतर करी ।
बाह्य अभ्यंतरी एकु राम ॥३॥
सोपान म्हणे राम नादे सर्वा घटी ।
विधी जगजेठी क्षरलासे ॥४।।


३२

हरि नांदे देही ऐसा भावो आहे।
परतोनि पाहे अरे जना॥१॥
परतलिया दृष्टि चैतन्याची दृष्टि ।
नामेव वैकुंठी पावे जना ॥२॥
हा बोध श्रीरंगे अर्जुना उपदेशु ।
सर्व हृषीकेशु सर्वा रूपी ॥३॥
सोपान धारणा हरि नांदे सर्वत्र ।
त्याचेचि चरित्र करलेसे ।॥४ ॥


३३

हरिविण भावो न धरावा पोटी ।
सर्वभावे सृष्टि एकातत्त्वे ॥१॥
तत्त्वता श्रीहरि सर्वाघटी आहे ।
उभारोनि बाहे वेद बोले ।॥२॥
हरिविण नाही जीवशिव पाही ।
शिवाच्या हो देही आत्मा हरि ॥३॥
सोपान म्हणे हरिविण नाही तत्व ।
हरि हाचि सर्वत्र सर्वी वसे ॥४॥


३४

शरीर निर्मळ वासना टवाळ ।
का रे तु वरळ भक्तिविण ।।१।।
सर्व ब्रह्म हरि नेणसि सोवळे ।
एकाचि गोपाळे जन वन ॥२॥
आप पृथ्वी तेज वायो व्योम ।
पंचभूती सम वर्ततसे ॥३॥
सोपान म्हणे गुरूचा उपदेश शुद्ध ।
तरीच वासना प्रबुद्ध तया नरा ॥४॥


३५

मन आधी मुंडी वासनेते खंडी ।
विद्ठल ब्रह्मांडी एक आहे ॥ १॥
मन हे सोवळे सदा शौच करी ।
तुज निरंतरी हरि पावे ॥२॥
विवेक वैराग्य ज्ञानाचे सौभाग्य ।
सोवळा आरोग्य हरि देख ॥३।।
सोपान नेणे सलगीचा सोवळा ।
त्याने वेळोवेळा स्मरे हरि ॥४॥


३६

पृथ्वी सोवळी आकाश सोवळे ।
मन हे बोवळे अमक्ताचे ॥ १॥
ब्रह्म है सोवळे न देखो वोवळे ।
असो खेळेमेळे इये जनी ॥२॥
ब्रह्मांड पंढरी सोवळी हे खरी ।
तारिसी निर्धारी एका नामे ॥३॥
सोपान अखंड सोवळा प्रचंड ।
न बोलो वितंड हरिविण ।।४।


३७ – ज्ञानपर

राम सर्वोत्तम या नामे निखळ ।
जन हे सफळ दिसताहे ।।१।।
भिन्न नाही दुजे सर्व आत्मराज ।
नाचताती भेज योगीराज ।।२।।
माता पिता देव गृह दारा जन ।
सर्व जनार्दन सर्वा रूपी ॥३॥
सोपान खेचर ब्रह्म माजिवडे ।
ब्रह्मांडा एवढे आत्माराम ॥४॥


३८

काढले कुटाळ वासना बळ ।
सर्व हा गोपाळ भरियेला ॥१॥
गेला पै परते शरीर हे रिते ।
नाशिवंत भुते दुरी केली ॥२॥
स्थावर जंगम स्थावरिला राम ।
सर्व शाम निःसंदेह ॥३॥
सोपान विनटे परब्रह्म घोटे ।
प्रपंच सपाट निर्वटियेला ।।४।।


३९

हरि असे देही सर्वकाळ संपन्न ।
म्हणोनि चिंतन निरंतर ॥१॥
हरिविण नाही हरविण नाही ।
दिशा द्रुम पाही विंबलासे ।॥२॥॥
हरिविण देवो नाही अन्य भावो ।
हरि असे सर्व देहभावी ।।३।॥
सोपान सांगत हरि सर्वत्र वसे ।
भाग्यवंता दिसे सर्व काळ ॥४॥


४०

पाहाणे परिसणे नामरूपी गेले ।
निराकारी ठेले एकतत्वेसी ॥१॥
एकतत्वेसी हरि एक रूप माझा ।
भिन्न भाव दुजा नाही नाही ।।२।।
संग परिकर सापडला आम्हा ।
सर्व आत्माराम पूर्णपणे ॥३॥
सोपान देव्हडे मन माजिवडे ।
ब्रह्मांड येवढे गिनियेले ॥४॥


४१

ना रुप ठसा निरालंब जाला ।
सगुणी उदेला तेजाकार ॥१॥
तेजरुप तेजी आरुप काजी ।
जीव शिव भोजी नांदताती ॥२॥
राहाते पाहाते जिवाचे पोखीते ।
आपणची उखीते दिसे एक ॥३॥
सोपानी नलगे प्रपंची वियोग ।
ब्रह्मार्पण भोग नुरे तोही ॥४॥


४२

नाद रसी लीन ब्रह्म सामावले ।
त्यामाजि सानुले ब्रह्म चोख ।।१।।
मन हे निकट ब्रह्मारूपे चोख ।
ब्रह्मी ब्रह्म लेख एकपणे ॥२॥
साशकित गावी जाला परिमाण ।
घट मटा दिन हारपला ॥३॥
सोपान सोपारे निरालंब निर्धरि ।
नंदाचे गोजिरे माजि खेळे ॥४॥


४३

नाद ब्रह्म मुसे नादरुप वसे ।
तैसा जनी दिसे आत्मपणे ।।१।।
बाहेर साबडा आम्हा दिसे घड़ा ।
मातियेचा वेढा जीवनालागी ।।२।।
तैसे हे शरीर आत्मपणे नीट ।
मन हे निकट बोखाळपणे ।।३।।
सोपान साजिरे ब्रह्म ते गोजिरे ।
जीवन साकार ब्रह्म हेतु ॥४॥


४४

शांति दया क्षमा तेथील उपाया ।
निर्गुणी ते माया आपरूप ॥१॥
ज्योतीरुप छाया सर्व हे निर्गुण ।
आत्मारामी भिन्न नाही नाही ।॥२।।
मौन्य परे मिठी पश्चंतीसी नुठी ।
मध्यमेच्या बेटी खुंटे तारू ।।३।।
सोपान वैखरी देहामाजी भारी ।
पुर्ण तो श्रीहरी बिंबी बिंब ॥४॥


४५

वैकुठ आगळे न करू वेगळे ।
मन ब्रह्मेळे एक ठेले ।॥१॥
उपमे वैकुंठ ब्रह्म हे तत्त्वबीज ।
सूचना अखंड सर्वाभूती ॥२॥
उदयोस्तु परिमाण ब्रह्म ।
चंद्र सूर्य नेम हरपले ॥३॥
सोपान तो क्षत्री जन हेची क्षेत्र ।
तेथे तो विचित्र हारपला ॥४॥


४६

ज्ञानदेवी आन नाही ते भिन्न ।
प्रपंचाचे भरण तेथे नाही ॥१॥
स्वरूपाची खूण होऊनी सफळ ।
भोगी सर्वकाळ चित्सत्ता ॥२॥
आत्मापरमात्मा भेदाभेद द्वंद्ध ।
एकतत्त्व अभेद जनी वनी ॥३॥
सोपान दीप दिपी ते जीवन ।
तयामाजी जीवन एक झाले ॥४॥


४७

निष्काम निश्चळ निश्चित स्वरुप ।
तेथे निर्विकल्प मन गेले ॥१।।
ध्येय गेले ध्यान ध्याता माजी पूर्ण ।
आपण सनातन होऊनी ठेला ॥२॥
निर्गुण निरालंब निर्विकार फळ ।
आपणची सकळ होऊनी ठेला ॥३॥
सोपान जिव्हाळे मनाचे ते आळे ।
परब्रह्मा सावळे तयामाजी ॥४।।


४८

आपरुप हरी आपणची देव ।
आपणची भाव सर्व जाला ।।१।।
सर्व हरी हरी ब्रह्म अभ्यंतरी ।
एक चराचरी आत्माराम ।।२।।
सर्व काळ सम नाही तेहो विषम ।
आयणची राम सर्व ज्योती ।।३।।
सोपान तिष्ठत रामनामी लीन ।
मन तेथे मौन्य एकपणे ॥४॥


४९

हरिविण नाही वेदांदिका मती ।
श्रुती त्या संपत्ती जया रूपी ॥१॥
हरी हाची सर्व उपनिषद भाव ।
रोहिणीची माव जनी दिसे ।।२।।
सर्वघटी राम जीवशिव सम ।
सर्वरूपे ब्रह्म भरले सदा ॥३॥
सोपान निकट परब्रह्म सेवी ।
सर्व हा गोसावी विड्ठलराज ।।४।।


हे पण वाचा: संत  सोपानदेव यांची  संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *