संत तुकाविप्र

संत तुकाविप्र अभंग

संत तुकाविप्र अभंग दीवाळीचे


दीवाळीचे सणी थेर । मुर्ख नर पाहाती
श्रेष्ठ साधन करावे । भक्ती भावे या सणी
थेर पहाणे थोरीव । गाठी पाप म्हणोनि
पाप घडेल जे घडी । साची जोडी तेधवा
संतापुढे जमीदारी । परोपरी दावीती
तुकाविप्र म्हणे मूढ । साचे द्वाड ते नरसण दिवाळीचा गोड । तो उघड कीर्तने
हरीनाम कथा जेणे । शोभा सणे दिवाळी
धन्ये त्याचे कूळ धन्ये । जे कीर्तनी रंगले
वेद श्रुतीचीया मते । कली सत्य कीर्तन
जेथ घदेल हा रंग । पांडुरंग ते ठाई
तुकाविप्र म्हणे सणी । य रंगणी असावेअसो कसा कोणी आता | आम्हा कथा हरीची
तारु प्रमाण वेदांती | आम्हा चित्ती तो प्रेमा
हरी गुण कथा सार | आम्हा थोर कलीत
गती दुसरी ना मीळे | तुर्त काले कलीत
तुकाविप्र म्हणे ऐसी | दिवाळीसी घटीकाशुद्ध कार्तिक पाडवा । सण देवादिकाचा
तया सणी वाळवंटी । भक्त भेटी देवाची
कृष्ण वेण्या वाळवंट । हे अविट सर्वस्वे
तेथे विनंती सर्वेशा । भक्त आशा पुरवी
देई सदविद्या सुमती । क्षमा शांती भावार्थ
भीड चाड इतराची । नको साची सहसा
तुकाविप्र म्हणे दया । देवराया करावीसोनियाचा दीन आजी हा घडला । सणी साधू आला संत घरा
श्रोता कीर्तनासी दीवाळीचे सणी । आला वोवाळणी साधावया
इडा पिडा गेली जालो बळीयादे । ब्रीदावळी गाढे अनुभवे
तुकाविप्र म्हणे सर्वांगे उजळे । कीर्तन कल्लोळे जाला आजी

संत तुकाविप्र अभंग समाप्त


हे पण वाचा: संत तुकाविप्र संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: marathiworld

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *