संत तुकाविप्र

संत तुकाविप्र हरीपाठ

श्री संत तुकाविप्र हरीपाठदेवा विठ्ठला हे प्रिती |
तुज नमन विनंती |
नित्य नेम नामावळी |
हरी विठ्ठल धुमाळी ।
ऐसा गजर आभग |
सर्व काळ संत संग |
तुकाविप्र म्हणे नेम |
सर्वा अंगी सत्य प्रेम |सांगितली ऐसी वाट |
नाम कथा वैकुंठ ।
जनी वनी कोठे वसा ।
हरी नाम लावा धोसा।
विप्र आज्ञा ऐसी आहे ।
न सोडावी भक्ती सोये ।
तुका चाले तया पंथे ।
विप्र आज्ञेच्या सामर्थ ।विप्रआज्ञेचा प्रसाद |
नाम किर्तनी प्रसिद्ध ।
ब्रम्हानंद सर्वकाळ |
हा किर्तन कल्लोळ |
नित्य संत समागम
भक्ती सर्वागासी प्रेम ।
तुकाविप्र सत्ता ऐसी |
नाम गावे दिवा निशी ।सेवा सदगुरुची सार ।
नामकथा निरंतर |
भाग्यवंता घडे ऐसे।
येरा वर्म कळे कैसे |
गुरुकृपा जयावरी ।
मुखी नाम त्याचे हरी ।
नामधार धन्य एक ।
सर्व तयापाशी सूख ।नित्य आमुचा हा नेम |
हरी नाम गर्जावे |
संत चरणी लौळावे |
भक्ती भावे सर्वदा ।
संत बसावै संगती |
क्षमा दया युक्त शांती ।
गुरु आज्ञेचे हे धडे |
सत्य चालती उघडे ।
तुकाविप्र म्हणे गडे ।
नित्य नाम हे रोकडे ।नाम गाती तया देव पालवतो ।
चला रे म्हणतौ वैकुंठासी ।
वाटा देईन मी आपुल्या सुखाचा ।
राणा पंढरीचा वदे ऐसा ।
तुकाविप्र म्हणे भाव भक्ती युक्त ।
नाम गावे सत्य सर्व काळ ।माझे गाती नाम ।
तया मागे पुढे ।
भय चिंता नाही।
ब्रम्ह उभे धेंडे।
आ ब्रम्हे मी ।
आवघे माझे मी ।
भक्तभोळे नामी ।
वीतरागी ।
विश्वरुपे मी ची।
सर्वांगे नटलो ।
विश्वात्मा जाहलो |
भक्त देही ।
तुकाविप्र म्हणे ।
विठ्ठल गर्जना ।
विठ्ठल समता।
आगी येते ।

संत तुकाविप्र हरीपाठ समाप्त

श्री संत तुकाविप्र रचीत हरीपाठ समाप्त


हे पण वाचा: संत तुकाविप्र संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: marathiworld

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *