संत तुकाविप्र

संत तुकाविप्र विठ्ठलाचा पोवाडा

संत तुकाविप्र विठ्ठलाचा पोवाडा

ऐका श्रोते, भाविक भोळे, सांगेण अंतरखुणा
तुम्ही विठ्ठल रखुमाई म्हणा ||धृ||
याच विचारे तरला तुका वैकुंठासी गेला,

जड देह वरुता नेला, अनुभवरत्न अभंगा वदला,
तरण उपाय भला, जडजीव उद्धार केला, कीर्तन कीर्ती मंगळा,
तुकीता तुका आला, हरिभजनी देवच झाला ।
याज साठी आवडी गावें। अखंड देवाजीला ।भेंटावे सजन्नाला ।
पाहताची डोळा, साधू भोळा घालावे लोटागणा ||१||

नामयाची जनी, वदली नाम वाचे हरी,
तिचे देव काम करी, शेणपाणी धुणे धुतले झाडलोट करी,
केराची पार्टी भरीं, घेउनि शिरी टाकी दुरी,
भक्ताचा कैवारी, महाराज दिनोद्धारी,
ठेऊनि पाणी, न्हाऊ घातली भाग्याची सुंदरीं ।
तिचे केस हरी विचारी ।
म्हणउनी भावे, आवडी गावे, गोपीका रमणा ||२||

विठ्ठल भजनी कीर्ती जाहली, आळंदी ज्ञानेश्वरा,
त्याची भिंत चाले झराझरा, रेडयामुखी वेद घोकिले,
वदविले ओकारा, पावले जैजैकारा.
पैठणासी गेले जेव्हा शुद्धीच्या वेव्हारा |
अशा रीती बोधल्याची, पोवे भरी अंबारा, वैकुठी वाजे नगारा,
कीर्तन वेळा पाठी सावळा, वाजवी टाळविणा ||३||

चोखा मेळा, त्याचे ढोरे ओढी दयाळा, एकनाथ घरी
वाहिले पाणी या विठ्ठले, श्रीखड उगाळिले,
बारा वरुषे सेवा केली, पैठणी सोज्वळा, पितर जेवविले,
स्वर्गीचे आणुनी जेऊ घातिले, कीर्तिचा कल्लोळा
थकित ब्राह्मण जाले
अघटित करणी, सारग पाणी, कबीराचा तुणी ताणा ||४||

समारणामुळे, दामाजीचा विठो पाडीवार
देव जालासे चाकर, रसीद घेउनि बेदरा गेला,
कीर्ति केली थोर, या रुक्मीणीच्या वरे भक्तिकाजा,
साडूनि लाजा, विठो जाहालासे महार, हरिदेव कटीकर
दीन हे बधु ब्रीद पायी शोभले सुंदर, गोऱ्याचे उठविले पोर,
मीराचे विष पीऊनि, पियुष पाजी अमृत पान्हा ||५||

हरि चौपाठी, भव भक्ताची, कीर्ति जाहली कली
वेदांत श्रुति हाकली, तरले पापी नामस्मरणें,
पुराणें गर्जिन्नलीं, सा आठरा बेबादली, आत्मनंदे ब्रह्मानंद, अखंड नित्यावळी, हरिकथेची धुमाळी,
विप्र तुका, हरि नामस्मरणी वाणी रंगुनि गेली,
भजना हे रुची, कृपा गुरुची, अभंग पंढरी रमणा ||६||
ऐका श्रोते भाविक भोळे, सांगेन आंतर खुणा । तुम्ही विठ्ठल रखुमाई म्हणा….|


हे पण वाचा: संत तुकाविप्र संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: marathiworld

संत तुकाविप्र विठ्ठलाचा पोवाडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *