संत तुकाविप्र

संत तुकाविप्र आरती गणपतीची

संत तुकाविप्र आरती गणपतीची – बोरबन येथील

आरती धुंडीराजा | लक्ष लावीन तया ॥
सर्वेश सर्वसाक्षी | निजसुख दातया ॥
आरती धुडीराजा ||१||

प्रसन्न गजमुखा । होय स्वामी विनायका ॥
कीर्तन रंग देई । जेणे होय हरीकथा ॥
आरती धुडीराजा || २ ||

कीर्तन प्रेमरग | नित्यनेम सत्संग ॥
आनद वृत्ती सदा | प्रेमे देई अभंग ||
आरती धुडीराजा ||३||

अभग एकदता। सिध्दी बुद्धीचे काता ॥
प्रमाण आरती हे। होय प्रसन्न आता ॥
आरती धुडीराजा ||४||

स्वामीया भालचंद्रा । तुकाविप्र हाती धरा ||
गर्जाया नाम हारी | भक्ती भावे उभा करा ||
आरती धुडीराजा ||५||

संत तुकाविप्र आरती गणपतीची समाप्त


हे पण वाचा: संत तुकाविप्र संपूर्ण माहिती


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: marathiworld

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *