भागवत आरती

भागवत आरती

भागवत आरती

जयदेव जयदेव श्रीमद्भागवता । श्रवणें मननें पठणें भक्ती ये हाता ।। धृ ॥

वेदाचें हें सार पाहे रसभरित ।दशलक्षण हें आहे लक्षीत ॥ जय ॥ १ ॥

द्वादश स्कंधामध्यें हरीची लीळा ।तिनशें पस्तिस अध्ये गाती गोपाळा ।। जय ।। २ ।।

 अठरा सहस्र श्लो गाती ऐकती । ज्यासी हरीभक्ती त्यासी तत्प्राप्ती ।। जय ।। ३ ।।

गायत्रीचें मंत्ररूप हें पाहें ।परीक्षिति- शुकसंवाद आहे ।। जय ।। ४ ।।

भागवतरूपी देवा तूंचि अहेसी । करूं ही आरति एका-जनार्दनासी ।। जय ॥ ५ ॥


भागवत आरती समाप्त .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *