गजानन महाराजांची आरती

गजानन महाराजांची आरती

गजानन महाराजांची आरती


जय जय सच्चित्स्वरूप स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ।। धृ ।।

निर्गुण ब्रह्म नातन अव्यय अविनाशी स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।।

तें तूं खरोखर निःसंशय अससी । लीलामात्रें धरिलें मानव देहासी ॥ १ ॥

होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा करुनी गणि गण गणात बोते या भजना ।।

धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना जिकडे पहावे तिडे तूं दिससी नयना ॥ २॥

लीला अनंत केल्या बकटसदनास। पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस ।।

क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस । केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।। ३ ।।

व्याधि वारुन केले कैकां संपन्न करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन ।।

भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण । स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ।। ४ ।।


गजानन महाराजांची आरती समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published.