संत जगनाडे

संत जगनाडे आरती

संत जगनाडे आरती विडिओ सहित 

ॐ जय संताजी नाथा। स्वामी जय संताजी नाथा ।

उजळूनी भक्ती दिपक। करू आरती आता ॥

ॐ जय संताजी नाथा ॥धृ॥

करून निगृण भक्ती । ब्रह्मपद मिळविले। स्वामी ब्रम्हपद मिळविले।

सांभाळूनि गाथेसी । संकटी रक्षियेले ॐ जय संताजी नाथा ॥1॥

आग्नी दिव्य दानदा आले। त्रास सहन केला । स्वामी त्रास सहन केला ॥

त्यातुन पार पाडनी। अनमोल ठेवा दिला ॥

ॐ जय संताजी नाथा ॥2॥

अंतसमयी समाधीस । श्री तुकोबा आले । स्वामी श्री तुकोबा आले ॥

तीन मुठी, मुठमाती देऊनी। समाधीस पुर्ण केले ॥

ॐ जय संताजी नाथा ॥3॥

आश्रय तुमचा लाभो । लक्षावधी भक्ता । स्वामी लक्षावधी भक्ता ॥

रात्रंदिन तुम्ही नाथा ॥ भक्तांच्या चित्ता ॥

ॐ जय संताजी नाथा ।।4।।

मधुकरास तव चरणी त्व पदरी घ्याव । स्वामी त्व पदरी घ्यावे ॥

लेकू तुचे नाथा। मोक्षपदी न्यावे. स्वामी मोक्षपदी न्यावे ॥

ॐ जय संताजी नाथा ॥5॥

जय संताजी नाथा । स्वामी जय संताजी नाथा ॥

उजळुनी भक्त दिपक । करू आरती आता॥

ॐ जय संताजी नाथा ॥धृ…….॥

आरती संताजी चरणी ठेवितो माथा।

संत तुकारामाची तुने तारीली गाथा ॥धृ.॥

जनम जनम ची पदरी होती भक्ती विठोबाजी, रे संतु भक्ती विठोबाची ।

या जन्माला साथ मिळाली संत तुकोबाची।

विठोबापंत धन्य जाहला तुझा जन्मदाता।

आरती संताजी चरणी ॥1॥

चाकण ग्रामे जन्म घेतला, तुझाच अधिकार,

रे संतु तुझाच अधिकार ।

स्वरूप आपुले पाहून होती जनता भवपार ।

तुझ्या भक्तीने तुच झाला, नाथाचा नाथा।

आरती संताजी चरणी ॥2॥

संत तुकारामच्या मेळ्यात मुख्य टाळकरी, रे संतु मुख्य टाकळकरी।

तुकारामाची गाथा तुने बुध्दीने केली।

कंठाशी रे प्राण येती तुला आठविता।

आरती संताजी चरणी ॥3॥

आध्यात्मिक मार्गाने जगा दाविले सुख, रे संतु दाविले सुख ।

तीन मुठी मातीने तुझे लोपविले मुख ।

अफाट किर्ती केली तुने वैकुंठी जाता।

आरती संताजी चरणी ॥4॥

मार्गशिर्ष वद्य तेरसला तुझी पुण्यतिथी, रे संतु तुझी पुण्यतिथी।

संतु या प्रेमळ नावाने तुला अळविती ।

अंतरभावे भक्ती करती तुझे ज्ञान गाता आरती संताजी चरणी ॥5॥



तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

संत जगनाडे आरती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *