संत कान्हो पाठक आरती

संत कान्हो पाठक आरती – १

आरती कान्हुपाठका ।
जगद्गुरु जगद्व्यापका ।
भावे तुज ओवाळीन ।
स्वामी आनंद दायका ।।
आरती कान्हुपाठका ।।धृ।।

कलीमध्ये जड प्राणी ।
त्याच्या उद्वारा लागोनी ।
भागीरथी आणली हो ।
नीज शिखे पिळोनी ॥१॥

तुझा अगाध महिमा ।
केली अमावस्येची पौर्णिमा ।
काशीमध्ये जन पाहती ।
झाली बोलायची सीमा ||२||

केंदूर हे ग्राम तुझे स्थान ।
तेथे येती भक्तजन ।
अगाध तुझे चरण ।
बंदी दास मधुसूदन ।।


संत कान्हो पाठक आरती – २

जयदेवा कान्हुराजा ।
तीव्र वैराग्य रूपा ।
देखती संत मंडळी ।
वेध लागला तुझा ॥धृ ॥

नसे त्याग कलीयुगी ।
तो दाखविण्यासाठी ।
आलासी मानव रूपे ।
केंदूर ग्रामीच्या भूमी ॥१॥

प्रगट होई भागीरथी ।
केली पावन भूमी ।
कुष्ठातूनी मुक्त करी ।
अनुभव आला जयदेवा ||२||

तूज काका म्हणे ज्ञानदेव ।
तीन स्थळी स्थापिले बाण ।
सिद्धी होई तुझी दासी ।
सर्व देव तुज पाशी ||३||

करुनिया पौर्णिमसी ।
दावियेली काशीवासी ।
नामस्मरणे दिननिशी ।
वारिसी मुक्त भावा ||४||

राजा विनवि-तसे तुला ।
भक्ति वैराग्य देई मला ।
अहंभावादि घेऊनि जाया ।
पूर्ण शांती मज देई ||५||


संत कान्हो पाठक आरती – ३

जयदेव जयदेव जय कान्हूराजा ।
आरती ओवाळू तुज कीर्ति-ध्वजा ॥धृ॥

ईश अंश हा विश्वव्यापक ।
दिसे नजरेस सारे भ्रामक ।
नाम रूपाने गमे कौतुक ।
सत्य रूप तू सत्य जाणता ।।१।।

सत्पात्र कुळी जन्म तो झाला ।
शुद्ध प्रेमात प्रतिपाळ केला ।
कस लाविण्या विघ्नांचा मेळा ।
तेणे बाणली विरक्ती चित्ता ||२||

साक्षात शंकर प्रसन्न झाले ।
सद्गुरु कृपे अनुग्रही केले ।
माया पाश ते तुटोनी गेले ।
जन्म कृतार्थ अनुभव येता ॥३॥


हे पण वाचा: संत कान्हो पाठक यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *