सद्गुरु गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर

सद्गुरु गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर

 

अद्वैत धर्मप्रसारक नाथ संस्थान औसा …अध्यक्ष
श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर….सहअध्यक्ष

लोकसंग्रह हा संत जीवनाचा त्यांच्या कार्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे . भगवत् भक्ति व आत्मोद्धार करत असतानाच संतांनी त्यांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून लोक जागृती केली. उत्स्फूर्तपणे संतांच्या वाणीतून निर्माण झालेले वाड.मय अखिल विश्वातील जनसामान्यांना प्रेरणा देणारे आहे. सामाजिक ,राजकीय, धार्मिक अशा अनेकविध कठीण परिस्थितीमध्ये सापडलेल्या भारतीय जनसमुदायात संत वाङ्मयाने आत्मविश्वास निर्माण केला. भक्ती चळवळीत संतांनी विविध संप्रदायाच्या माध्यमातून भारतभूमीत नवचैतन्य निर्मितीचे कार्य केले. शेव व वैष्णव सांप्रदायाच्या उदात्त थोर तत्त्वज्ञानाला.. भक्तीपरंपरेला एकत्रितपणे पुढे नेणारे “अद्वैत धर्मप्रसारक पीठ” नाथ संस्थान औसा जिल्हा लातूर 250 वर्षांपासून सेवा कार्य करते आहे. नाथ संस्थानच्या माध्यमातून अवसेकर घराण्याची पाचवी पिढी आपली सेवा रुजू करते आहे .आदिनाथापासून सुरू झालेली ही भक्ती परंपरा असुन आदिनाथ-मच्छिंद्रनाथ- गोरक्षनाथ- गहिनीनाथ- निवृत्तीनाथ -ज्ञानेश्वर माऊली- देवनाथ महाराज -चुडामणी महाराज- गुरु गुंडा महाराज देगलूरकर- सद्गुरु वीरनाथ महाराज- सद्गुरु मल्लनाथ महाराज -सद्गुरु दासवीरनाथ महाराज- सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु- गुरुबाबा महाराज व सद्गुरु गहिनीनाथ महाराज अशी ही गुरु शिष्य परंपरा सुरू आहे. सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर घराण्याच्या पाचव्या पिढीच्या माध्यमातून सेवा करत आहेत.

अवसे करांची सहावी पिढी श्री श्रीरंग महाराज व श्री ज्ञानराज महाराज सेवेत रुजू होत आहेत. वाड.मय निर्मिती (अभंग ,ग्रंथ )सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्य पाच पिढ्यांपासून सुरू आहे. सद्गुरु गहिनीनाथ महाराज म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व. हसतमुख समाजाभिमुख वृत्ती लाभलेले सद्गुरु गहिनीनाथ महाराज अनेकांचा आधारवड आहेत. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आणि पूज्य लिलाबाई साहेब यांचे सद्गुरु गहिनीनाथ महाराज हे द्वितीय चिरंजीव. गहिनीनाथ महाराजांचा जन्म 25 नोव्हेंबर 1959 रोजी सोलापूर येथे झाला .त्यांचे शिक्षण उस्मानिया विश्वविद्यालय हैदराबाद येथे एम ए तत्वज्ञान विषयातून झाले.

सांप्रदायिक शिक्षण श्री ज्ञानेश्वर महाराज धुंडा महाराज देगलूरकर यांच्याकडून त्यांना प्राप्त झाले. वेद संहितेचे ज्ञान त्यांना काशीचे श्रीरामनाथ महाराज भारती ,पंढरपूरचे श्री गोपाळ शास्त्री गोरे, श्री वरदानंद भारती ,वेदाचार्य पंडित घनपाटी, श्री शिपला गिरीजी महाराज देगाव सोलापूर यांच्याकडून प्राप्त झाले. अवसेकर घराण्याची माघवारीची थोर अशी एक परंपरा आहे. अवसा ते पंढरपूर अशी पायीमाघवारी सद्गुरु दासवीरनाथ महाराज यांनी सुरू केली. सद्गुरु गहिनीनाथ महाराजांनी वयाच्या नव्या वर्षी इसवी सन 1968 रोजी पहिली पायी माघ वारी औसा ते पंढरपूर अशी केली अवसेकर घराण्याची विठ्ठल भक्ती प्रसारासाठी विठ्ठल भक्ती साठी जी कीर्तनाची सेवा चार पिढ्यांपासून सुरू आहे त्या कीर्तनाच्या सेवेला पाचव्या पिढीचे वंशज म्हणून सद्गुरु गहिनीनाथ महाराजांनी सुरुवात केली ती इसवी सन 1970 मध्ये. अलगूढ हे कर्नाटक राज्यातील एक छोटेसे गाव. जेथे अवसेकरांच्या नाथषष्ठी उत्सवाची एक परंपरा लाभलेली आहे या गावांमध्ये सद्गुरु गहिनीनाथ महाराजांनी पहिल्यांदा कीर्तन सेवा रुजू केली. इसवी सन 1974 पासून नाथ संस्थान औसा येथील जबाबदारी ते सांभाळू लागले.

अवसा ते पंढरपूर पायी माघवारीच्या दरम्यान माघ शुक्ल दशमी गुरुवार असा योग आला असता चंद्रभागेच्या वाळवंटात सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज अवसेकरांकडून गहिनीनाथ महाराज औसेकर यांना अनुग्रह म्हणजेच गुरु मंत्र प्राप्त झाला. सद्गुरूंकडून गुरु मंत्र प्राप्त झाल्यापासून संस्थांच्या सेवेसाठी अधिकाधिक तत्परतेने सद्गुरु गहिनीनाथ महाराजांकडून कार्य सुरू झाले . 23 जून 1986 ज्येष्ठ वद्य द्वितीया सोमवार रोजी अवसा येथे संपन्न झालेल्या भक्तिमय सोहळ्यामध्ये धुंडा महाराज देगलूरकर यांच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांनी सद्गुरु गहिनीनाथ महाराजांना इतर शिष्यांना अनुग्रह देण्याची परवानगी दिली.

नाथ संस्थानच्या माध्यमातून होणारे जे सांप्रदायिक कार्य आहे जसे नाथ संस्थान मध्ये होणारे विविध असे नऊ धार्मिक उत्सव, औसा ते पंढरपूर पायी माघवारी, नाथ संस्थानला सद्गुरु गुरुगुंडा महाराज देगलूरकर यांच्याकडून लाभलेले कृपाप्रसाधिक चक्रीभजन या सर्व कार्यांमध्ये सद्गुरु गहिनीनाथ महाराजांचा संपूर्णतः सहभाग असतो. याच सोबत नाथ सेवा मंडळ औसा तर्फे विविध असे सेवाभावी उपक्रम ते राबवित असतात. पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे ते 2001 पासून 2016 पर्यंत विश्वस्त म्हणून आणि 2016 पासून सध्या 2024 पर्यंत मंदिर समितीचे सहअध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत. कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना विठ्ठल भक्तीचा प्रसार करत असताना नितीमुल्यांची शिकवणही देत असतात. अत्यंत साधी राहणी, नेहमी हसतमुख आणि उदार अंतकरण असे काही विशेष पैलू आपण ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सांगू शकतो. असे सद्गुरु गहिनीनाथ महाराज यांची विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी सोबत सतत विठ्ठल भक्ती प्रसाराच्या निमित्ताने मंदिर समितीच्या कार्याच्या निमित्ताने भेट होत असते.

परंतु मोठ्या थोर व्यक्तींसोबत नेहमी कार्य करत असूनही सद्गुरु गहिनीनाथ महाराजांच्या स्वभावात कोठेही या गोष्टींचा अहंमभाव दिसून येत नाही. लाखो शिष्यमंडळींशी त्यांचा संपर्क आहे परिचय आहे .लाखोंच्या संख्येने शिष्य समुदायाशी परिचय असूनही त्या प्रत्येक शिष्याला मग तो कोणत्या मोठ्या कुटुंबाचा की लहान कुटुंबाचा प्रतिनिधी आहे किंवा श्रीमंत, गरीब, ज्ञानी अज्ञानी असा आहे का ? याचा कसल्याही प्रकारचा भेद न करता त्या प्रत्येकाशी समान वर्तन सद्गुरु गहिनीनाथ महाराजांचे असते. या प्रत्येक व्यक्तीला ते त्याच्या नावानिशी ओळखतात. जेव्हा जेव्हा या व्यक्तींची आणि त्यांची भेट होते त्या व्यक्तीला ते त्याच्या नावानिशी संबोधित करून बोलतात तेव्हा ती व्यक्ती देखील सद्गुरु गहिनीनाथ महाराजांच्या या अलोट प्रेमामुळे सदगतीत होऊन जाते. सद्गुरु गहिनीनाथ महाराजांनी स्वतःची सेवाभावी वृत्ती माता-पित्यांचे संस्कार भावंडांचे सहकार्य आणि त्यांच्या अर्धांगिनी कै.सौ.

गीताई साहेब यांच्या साथीने विठ्ठल चरणी आपली भक्तीची सेवा अखंडितपणे सुरू ठेवली आहे . त्यांचे चिरंजीव श्री श्रीरंग महाराज ही त्यांच्या या सेवेमध्ये सहभागी होत आहेत . सद्गुरु गहिनीनाथ महाराजांनी वयाच्या अगदी नवव्या वर्षीपासून सुरू केलेली ही सेवा आज वयाच्या 65 व्या वर्षी पर्यंत तेवढ्याच उत्साहाने आणि निस्वार्थ वृत्तीने सुरू ठेवण्याची दखल समाजाने आणि विविध अशा सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांनी वेळोवेळी घेतली असून त्यांच्या या निस्वार्थ कार्याचा सन्मान करत असताना त्यांना अनेक पुरस्कारानी सन्मानित केलेले आहे.
स.श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना प्रदान करण्यात आलेले पुरस्कार
1 )धर्मस्कार धर्मभास्कर पुरस्कार
2 )गुरूचरणकमलचंरिका पुरस्कार
3 )वेदवेदांती पुरस्कार
4 )श्रीस्वामी चरण पुरस्कार
5 )पं.मदनगोपालजी व्यास पुरस्कार
6 )आर्ट ऑफ लिव्हिंग पुरस्कार
7 )वि.स.पागे पुरस्कार
8 )मराठवाडा भुषण पुरस्कार
9 )धर्मकेसरी पुरस्कार
10 )सिध्दरत्न पुरस्कार
11 )समाजप्रबोधनपर पुरस्कार
12 )महाराष्ट्र भुषण पुरस्कार
13 )धर्म प्रचार कार्य पुरस्कार
14 )गांधी फोरम पुरस्कार
15 )कै.श्री.भि.मेनकुदळे पुरस्कार
16 )वारकरी पुरस्कार
17 )किर्तनकार पुरस्कार
18 )हिंदुत्वके आधारस्तंभ पुरस्कार
19 )संतश्रेष्ठ पुरस्कार


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *