संत चोखामेळा अभंग

वैकुंठ पंढरी भिंवरेचे – संत चोखामेळा अभंग – २०२

वैकुंठ पंढरी भिंवरेचे – संत चोखामेळा अभंग – २०२


वैकुंठ पंढरी भिंवरेचे तिरीं ।
प्रत्यक्ष श्रीहरी उभा तेथें ॥१॥
रुप हें सांवळें गोड तें गोजिरें ।
धणि न पुरे पाहतां जया ॥२॥
कांसे सोनसळा नेसला पिंवळा ।
वैजयंती माळा गळां शोभे ॥३॥
चोखा म्हणे ऐसें सगुण हें ध्यान ।
विटे समचरण ठेवियेले ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वैकुंठ पंढरी भिंवरेचे – संत चोखामेळा अभंग – २०२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *