बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो वळी जीवें माझ्या ॥१॥ आतां कोणावरी रुसों नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥ आहे जें संचित तैसें होत जात । वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥ चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे । झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.