Skip to content
नेणों तुमचे मन कठिण – संत चोखामेळा अभंग – ८९
नेणों तुमचे मन कठिण कां झालें ।
मज कांहीं न कळे पूर्व कर्म ॥१॥
किती आठवण मागिलाचि करूं ।
तेणें पडे विचारू पुढीलासी ॥२॥
आतां अवघड दिसतें कठीण ।
मनाचें हें मन चिताडोहीं ॥३॥
चोखा म्हणे काय करूं तें आठवेना ।
निवांत वासना कई होय ॥४॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
नेणों तुमचे मन कठिण – संत चोखामेळा अभंग – ८९