संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

चिदानंद रुप चेतवितें एक – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २

चिदानंद रुप चेतवितें एक – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २


चिदानंद रुप चेतवितें एक ।
एकपणें गुणागुणीं दावी अनेक ॥१॥
आदि अंतीं गुण सर्वत्र निर्गुण ।
गुणासी अगुण भासतीना ॥ध्रु०॥
कैसें जालें अरुपीं गुणीं गुणवृत्ती ।
सगुण पाहतां अंतरलें गती ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु नंदनंदनु ।
आदिअंतु एकु पूर्ण सनातनु गे माये ॥३॥

अर्थ:-
चिंदानंद स्वरुपाचा तो गुणांच्या मुळे अनेक रुपांनी दिसत आहे. आदि अंत गुणाने तो सर्वत्र निर्गुण रुपात आहे. व त्यामुळे गुणच अगुण झालेले दिसतात. त्या निर्गुणाच्या ठायी हे गुण कसे दिसतात हे कळत नाही. व सगुणरुप पाहता द्विमुढ झाल्याने मनाची गती कशी खुंटते ते कळत नाही. तो नंदाचा नंदन नसुन तो पुर्ण सनातन ब्रह्मच आहे असे माऊली सांगतात.


चिदानंद रुप चेतवितें एक – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग समाप्त

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *