संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

बरवा वो हरि बरवा बो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७

बरवा वो हरि बरवा बो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७


बरवा वो हरि बरवा बो ।
गोविंद गोपाळ गुण गरुवा वो ॥१॥
सावळा वो हरि सावळा वो ।
मदनमोहन कान्हो गोवळा वो ॥ध्रु०॥
पाहतां वो हरि पाहतां वो ।
ध्यान लागलें या चित्ता वो ॥२॥
पढिये वो हरि पढिये वो ।
बाप रखुमादेविवरु घडिये वो ॥३॥

अर्थ:-
जीवाचे कल्याणास उपयोगी पडतील असे अनंत उत्तम गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, असा भगवान श्रीहरि म्हणा, गोविंद म्हणा किंवा गोपाळ म्हणा अशी हजारो नावे ज्याला आहेत; तोच श्रीहरि सर्वोत्तम आहे हो ! ॥१॥ तो सावळ्या वर्णाचा असून गाई राखतो खरा; परंतु तो मदनालाही मोह उत्पन्न करणारा आहे. ॥धृ॥ काय सांगावे ! त्या हरीला पाहताच माझे चित्ताला ध्यान लागून गेले आहे हो ! ॥२॥ तोच श्रीहरि मनाला वारंवार आवडतो हो ! असे त्या श्रीहरीचे रूप आहे. ॥३॥ जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥


बरवा वो हरि बरवा बो – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ३७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *