संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

निशियेचे भरीं भानु प्रतिबिबीं बिंबला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग 708

निशियेचे भरीं भानु प्रतिबिबीं बिंबला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०८


निशियेचे भरीं भानु प्रतिबिबीं बिंबला ।
बिंबचि गिळुनि ठेला बिंबामाजी ॥१॥
रात्रि सूर्य वाहे दिनु चंद्र जायें ।
विपरीतगे माये देखीयेले ॥२॥
उदय ना अस्तु तेथें कैचेंनि त्रिगुण ।
आपणचि दर्पण होऊनि ठेला ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तोचि जाणे ।
संत ये खुणें संतोषले ॥४॥

अर्थ:-

‘अविद्येचिया निदा, या माऊलीच्या उक्तीप्रमाणे किंवा अविद्यावच्छिन्न जीव व मायोपाधी ईश्वर या मताने अविद्येच्या आवरणामुळे भानु म्हणजे परमात्मा बुद्धित आणि तो जीव जेंव्हा प्रतिबिंबीत झाला. आत्मस्वरूपा विषयी विचार करू लागला. तेंव्हा विचारांती प्रतिबिंब सापेक्ष बिंब हा भाव जाऊन परमात्मरूप झाला. याचे कारण विचारांती बुद्धिरूपी रात्रीत परमात्म रूपी सूर्य प्रकाशमान झाला. त्यामुळे विद्यारूपी दिवसांत आनंदवाप्तीरूपी चंद्र प्रकाशला. हे सर्व जगत दृष्टिने विपरीत आहे. परंतु तात्त्विक दृष्टिने पाहिले तर मूळ स्वरूपाचे ठिकाणी ज्ञान, अज्ञान नाही मग सत्त्व, रज, तम हे गुण कसे असणार? उलट त्रिगुण कार्य जो विश्वाभास त्याला आपणच दर्पण आहे ही गोष्ट जो अनुभवी असेल तोच जाणेल आणि संत त्या खुणाच्या भाषणाने संतोष पावतील असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


निशियेचे भरीं भानु प्रतिबिबीं बिंबला – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७०८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *