संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

विवेक नदीये बैसोनि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७७

विवेक नदीये बैसोनि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७७


विवेक नदीये बैसोनि ।
सांगड सत्त्वाची बांधोनी ॥१॥
एक पंढरी वैकुंठ ।
येर वाउगे बोभाट ॥२॥
चारी वेद विवादती ।
पुराणें साक्ष देती ॥३॥
बोले निवृत्तीचा दास ।
संत गर्जती पापा नाश ॥४॥

अर्थ:-
मुमुक्षुने सत्त्वगुणाची सांगड कमरेला बांधून, विवेकनदीतून पंढरीरुपी वैकुंठात जाणे हेच श्रेयस्कर आहे. बाकीच्या साधनांचा उगीच बोभाट असल्यान ती फुकट आहेत. या म्हणण्यास चारी वेद व पुराणे साक्ष देतात. तसेच सर्व पाप नाश होण्यास पंढरीशिवाय अन्य स्थान नाही. संत गर्जना करुन म्हणतात असे निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतात.


विवेक नदीये बैसोनि – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७७

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *