bhaubeej - भाऊबीज

bhaubeej – भाऊबीज

bhaubeej information in marathi video

भाऊबीज माहिती मराठी विडिओ सहित

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा ण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो.भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.


भाऊबीज कधी आहे – bhaubeej date

भाऊबीज हा बहीण आणि भाऊ यांच्यातीळ अतूट नात्यासाठी समर्पित हिंदु उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या वर्षी भाऊभीज बुधवार 27 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जाणार आहे. हा सन देखील रक्षा बंधन प्रमाणेच साजरा केला जातो. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. हा दिवस कायस्थ समाजाचे लोक चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा करतात.(bhaubeej)


हे पण वाचा: दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व


काय आहे भाऊबीज? जाणून घेऊ या सणाविषयी – (what is bhaubeej)

दिवाळीतला आणखी ए महत्त्वाचा ण. भाऊबीज आज सर्वत्र साजरा होतोय. पण, ही भाऊबीज आहे तरी काय? आजच्या दिवशी बहिण भावाला का ओवाळते? महाराष्ट्रातच नव्हे तर, उत्तर भारतातही हा सण साजरा केला जातो. त्याला भाई दूज असं म्हटलं जातं.
कार्तिक शुद्ध द्वितियेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला `यमद्वितिया` असेही म्हटले जाते. द्वितियेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा `बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहो`, अशी यामागची भावना आहे.(bhaubeej)

आपल्या मनातील द्वेष व असूया दूर करून सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत व्हावी याकरिता हा भाऊबीजेच्या सण. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिन. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ ओवाळणीच्या ताटात `ओवाळणी` देऊन बहिणीचा सत्कार करतो. जैन धर्माच्या काही विशिष्ट समाजांत फक्त भावाकडूनच ओवाळणी `वसूल` केली जात नाही तर, बहीणही भावाला आणि वहिनीलाही भेटवस्तू देत असते.


दिवाळीच्या दिवसांत अशी घ्या तब्येतीची काळजी…

भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वत:च्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे, असे शास्त्रात सांगितले आहे.
– एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे.

– यमद्वितीयेला यमराज आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला जातो. त्यामुळे या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो. त्यामुळे भाऊबीजेला वेगळे महत्व आहे.

– यमीचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी. भाऊबीजेच्या दिवशी यमुना नदीत स्नान करणाऱ्याला अपमृत्यू येत नाही, तसेच मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.

– अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीयेस मृत्यूची देवता यमधर्म याचे पूजन केले जाते. तसेच त्याच्या चौदा नावांनी तर्पण करण्यास सांगितले आहे..अपमृत्यू निवारणार्थ `श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।` असा संकल्प करून तर्पण करावयाचे.


काय कराल? कसे कराल?

– भाऊबीजला बंधूना पूर्वेकडे तोंड करून पाटावर बसवावे. पाटाभोवती रांगोळी काढलेली असावी. तसेच समोर दीप तेवता असावा.

– बहिणीने बंधूंच्या कपाळी टिळा लावून त्याना ओवाळावे.

– त्यानंतर बहिणीने भावाच्या हातावर लाल-पिवळा धागा बांधावा.

– त्यानंतर गोड पदार्थ भावाला खाऊ घालावा.

– भावाने बहिणीला चरणस्पर्श करुन तिचा आशीर्वाद घ्यावा आणि तिला भेटवस्तू द्यावी.


bhaubeej information in marathi end

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *