गुरुपुष्यामृत योग

गुरुपुष्यामृत योग

गुरुपुष्यामृत योग

हे आपण दिनदर्शिके मध्ये नेहमीच बघतो पण आपल्याला सहसा कळत नाही की हा गुरुपुष्यामृतयोग काय आहे. काय असते यादिवशी. तर आज आपण या गुरुपुष्यामृत योगाबद्दल थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत.गुरुपुष्यामृतयोग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृतयोग्य असतो. हा शुभ दिवस मानल्या जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधल्या जाते. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते. या दिवशी माता लक्ष्मी ची पूजा केली जाते.सर्व सामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो.या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप, तप, ध्यान, दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात.जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नौकरी, व्यवसाय, घरातील काही कार्य, काही बंद झालेले कार्य सुरु करायचे असेल तर आपणास गुरुपुष्यामृतयोग हा लाभदायक ठरू शकतॊ.गुरुपुष्यामृतयोग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो.या शुभ मुहूर्तावर आपण सोने-चांदी खरेदी, नवीन घर, घराचे बांधकाम, वाहन घेणे हे कार्य करू शकता.गुरुवारी कुठलेही शुभ कार्य करणे फार चांगले असते आपल्याला कुठल्याही कार्यात यश हे मिळू शकते.जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो.आपणास लग्नाचा बस्ता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे.एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्या करीता देखील हा चांगला दिवस असतो. ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस.ज्यांना या गुरुपुष्यामृत योग बद्दल माहिती आहे असे जाणकार ह्या दिवशी माता महालक्ष्मी ची साधना करतात.या दिवशी कुठलीही साधना केल्यास चांगले फळ प्राप्त होतात.याच गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्ता वर जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात.कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्यामृत योगला आपल्या इष्ट देवाची पूजा, अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते.गुरुपुष्यामृतयोग हा पूजा-अर्चना, मंत्र सिद्धि, तंत्र सिद्धि, यंत्र सिद्धि, साधना व संकल्प या करता उत्तम व यश देणारा आहे.गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते.नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते.

हे पण वाचा: पुत्रदा एकादशी 

गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग होतो. हा सर्व कार्यास शुभ समजला जातो. या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे. मात्र हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. एक सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो. अशुभता पासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे.आपल्या जीवनात यशाची प्राप्तीसाठी या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते.गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतं. ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं, त्या दिवशी गुरुपुष्यामृतयोग असतो. गुरुवारी शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्ये करणे शुभ असते.पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग बनतो.साधकासाठी फायदेशीर ”गुरुपुष्यामृत योग”या दिवशी विद्वान लोकं देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात. या दिवशी देवी लक्ष्मीला पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी मिळते.या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात.गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे.व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांचा जीवनात वृद्धी होते. त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते. पण कधी कधी जीवनात दुर्भाग्यात येते अपयश येते. अश्या वेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात.पुष्य नक्षत्र म्हणजे कायपुष्य चा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा.विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे. त्यांचा मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे. त्याच प्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधा सारखेच आहे. पौष्टिक, लाभकारी, आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा.या नक्षत्रात तीन तारका दिसतात जे बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचा वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्य क्रांती वर पडतो. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगळदायी किंवा मांगलिक तारा असे ही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह श


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या 

ref: webduniya and mh28

गुरुपुष्यामृत योग 2020
गुरुपुष्यामृत योग मराठी
गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय
गुरुपुष्यामृत योग 2021
गुरुपुष्यामृत योग 2020 Date
रवि पुष्य योग
गुरुपुष्यामृत योग 2019 मराठी
गुरुपुष्यामृत योग 2021 मराठी

Leave a Comment

Your email address will not be published.