बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

असो थोरथोरांची मात – संत जनाबाई अभंग – १८८

असो थोरथोरांची मात – संत जनाबाई अभंग – १८८


असो थोरथोरांची मात ।
तूंचि मिळालासी गोपाळांत ॥१॥
त्यांच्या शिदोर्‍या सोडिसी ।
ग्रासोग्रासीं उच्छिष्‍ट खासी ॥२॥
न म्हणे सोंवळें ओवळें ।
प्रत्यक्षचि तें ओवळें ॥३॥
स्वानंदाचे डोहीं हात ।
धुतले सर्वांही निश्चित ॥४॥
हातीं काठया पायीं जोडे ।
दासी जनी वाट झाडे ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

असो थोरथोरांची मात – संत जनाबाई अभंग – १८८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *