बाई मी लिहिणें शिकलें - संत जनाबाई अभंग - ११४

दूत विनविती कर – संत जनाबाई अभंग – २४१

दूत विनविती कर – संत जनाबाई अभंग – २४१


दूत विनविती कर जोडुनी ।
म्हणती आरुढावें विमानीं ॥१॥
ऋषि म्हणे न घडे ऐसें ।
ह्याची तृप्ति नाहीं आस ॥२॥
पटावरोनी काढिला ।
पटीं बैसवीन ह्याला ॥३॥
थोर वाजत गाजत ।
विप्र मंत्रघोष करीत ॥४॥
विजयी झाला हरिश्चंद्र ।
आडवा पावला परिवार ॥५॥
लक्षानुलक्ष आरत्या करिती ।
नगरनारी वोवाळिती ॥६॥
ऋषि अभिषेकिती रायाला ।
थोर मनीं आनंदाला ॥७॥
राया प्राप्‍ती जाला पट ।
गुडी उभवी वसिष्‍ठ ॥८॥
येथुनी हरिश्चंद्र आख्यान ।
नामयाची जनी म्हण ॥९॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दूत विनविती कर – संत जनाबाई अभंग – २४१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *