नाहीं केली तुझी सेवा – संत जनाबाई अभंग – ३१३
नाहीं केली तुझी सेवा ।
दुःख वाटतसे माझे जिवा ॥१॥
नष्ट पापीण मी हीन ।
नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दुःख झालें मला ।
तें त्वां सोसिलें विठ्ठला ॥३॥
रात्रंदिवस मजपाशीं ।
दळूं कांडूं लागलासी ॥४॥
क्षमा करावी देवराया ।
दासी जनी लागे पायां ॥५॥