संत जोगा परमानंद अभंग

बैसोनि संता घरी हो – संत जोगा परमानंद अभंग – १

बैसोनि संता घरी हो – संत जोगा परमानंद अभंग – १


“बैसोनि संता घरी हो।
घेतली गुरगुंडी ॥ ध्रु०्॥
आधी ब्रह्मांड नारळ।
मेरू सत्त्व तो आढळ ॥
निर्मळ सत्रावीचे जळ।
सोहं गुरगुंडी, गुरगुडी।।
चिलमी त्रिगुण त्रिविध।
मी पण खटा तो अभेद।।
तमतमाखू जाळून शुद्ध।
वैराग्य विरळा घडघड़ी ॥
सावधान लावुनिया नळी।
मीपण झुरका विरळा गिळी॥
जन्ममरणाची मुरकुंडी सांभाळी।
धूरविषयाचा सोडी।
लागला गुरू गोडीचा छद।
झाला प्रसन्न परमानंद।।
जोगी स्वामी तो अभंग।
गुरुचरण न सोडी।
बैसोनि संताघरी हो।
घेतली गुरगुंडी गुरुगुडी।”


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बैसोनि संता घरी हो – संत जोगा परमानंद अभंग – १

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *