संत विठाबाई जीवनचरित्र

संत विठाबाई जीवनचरित्र

संत विठाबाई जीवनचरित्र

संत विठाबाईचा जन्म आषाढ वद्य चतुर्दशी (मंगळवार, पहाटे) इ.स. १७९२ मध्ये पंढरपूर येथे झाला. म्हणजेच १८व्या शतकाच्या शेवटच्या काळात जन्माला आलेली एक स्त्रीसंत. वडिलांचे नाव रामप्पा नायक तर आईचे नाव संतूबाई या दांपत्याची ही एकुलती मुलगी होय. त्यांना पंढरीच्या विठ्ठलाचा स्वप्नात दृष्टांत झाला, आणि त्यांच्या पोटी मुलगी जन्माला आली, म्हणूनच की काय मुलीचे नाव विठा ठेवले.

संत विठाबाईने सुमारे चार हजार अभंग रचलेल्याचा संदर्भ सापडतो. संत नागरी किंवा संत बहेणा यांना ज्या प्रमाणे अभंगातून स्वतःची चरित्र कहाणी सांगितली तशी विठाने आपली कहाणी अभंगातून सांगितली. त्या पूर्वजन्मही जनाबाई असल्याचे अभंगातून जन्मवृत्तांत सांगतात. त्यांनी ‘राजाराम’ नावाच्या गुरुचे शिष्यत्व स्वीकारले होते. पूर्वी ते संत तुकाराम होते, अशी त्यांची श्रद्धा होती. विठाचे आज सहाशे अभंग उपलब्ध आहेत असे सांगितले जाते. शिवाय सहा-सात पदे असल्याचे सांगतात, बत्तीस अभंग उपलब्ध झाले आहेत. अभंगाचे विषय गुरुमहात्म्य, नाम महिमा, संत महिमा व स्वतः विषयीची अभंगरचना यांनी केल्या आहेत.

संत विठाबाईची सर्व अभंगरचना हस्तलिखीत स्वरूपात गौड नावाच्या एका कुटुंबाकडे आहे. संबंधित कुटुंब अभंगाच्या बादामी नित्य पूजा करीत आहे. अभंगाचे बाह (हस्तलिखीत संबंधित कोणाच्याही हातात देत नाही, अशी माहिती मिळते. विठाईने आपल्या अभंगरचनेत प्रपंचातील सर्व अनुभव सांगितले आहेत.

पाचव्या वर्षापासून म्हणजेच कळत नसलेल्या वयात एकुलत्या एक मुलीचं हृदय विठ्ठलाच्या भक्तीशी बांधलं गेलं. असे असं वय वाढत गेलं, तसतसा तिला भक्तीचा अर्थ उमजू लागला. तिचं मन विठ्ठल चिंतनात लागल्यानं, तिनं लग्नाच्या वयात ल करण्यास विरोध केला. परंतु आई-वडिलांनी तिच्या मताला मान्यता दिली नाही. समाजातील परंपरा आई-वडिलांनी सांगितल्या. पालकाला आपली अविवाहीत तरुण मुलगी त्यांना पायाखाली ठेवलेला विस्तव वाटत होता. जननिंदेची भिती शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी इच्छा नसतांना घरातील वडिलधाऱ्यांनी एका पुरुषाशी त्यांचा विवाह लावून दिला.

विठाबाईचे पंढरपूर हेच माहेर आणि सासर होते. संसारात त्यांना गोडी वाटत नव्हती. सासरकडच्या सर्वांचा त्रास सुरू झाला. पतीचा छळ पुढे सतत सहन करावा लागता. त्यांना प्रपंच कधी सुखाचा वाटला नाही; दुःखाचे भोग सुरू झाले. पतीचे बळजबरीने देहभोग सुरू झाले, हे सारं त्यांना असह्य झाले. या संदर्भात रात्री-अपरात्री नवरा मारझोड करीत असे.

भ्रतार हो मजसी वोदतो येकांती भोगावे मजसी म्हणुनीया ।
ओडोनिया बहुत मारीतो मजसी । मध्यरात्र जाण समयासी।’

असं स्पष्टपणे त्यांनी अभंगात लिहून ठेवलं आहे. हे सगळं अती झाल्यावर विठाबाईनं संसाराचं दार सोडलं. सखासांगाती विठ्ठल त्याची मूर्ती जवळ घेऊन अनवाणी रानावनात भटकू लागल्या. सासर-माहेरचा आधार नाही. यास्थितीत देवाचा धावा करू लागल्या. पोटापाण्याची सोय नसलेल्या विठा देवाशी संवाद करू लागल्या. विठ्ठल विठाबाईस स्वप्नात भेटले, दृष्टांत दिला. ‘मी ब्राह्मणाच्या वेषात कुंदगोळ गावी भेटेन, ‘राजाराम’ हा माझा भक्त प्रत्यक्ष तुकाराम माझ्या वाटेने तुला घेऊन येईल. विठाबाई म्हणू लागल्या, ‘करुना येवू दे आई तुझे मी लेकरू । परदेसी मज करून टाकले।’  

एक दिवस रात्री विठाबाईस देवाने दर्शन दिले, आणि सकाळी विठाबाईच्या घरासमोर त्यांना दिंडी आलेली दिसली. पुढे दोन महिने दिंडीबरोबर गावोगावी हिंडत फिरत कुंदकळला त्या पोहचल्या. तेथे ब्राह्मण वेशातील चिदंबर स्वामींनी तिचा शिष्य म्हणून स्वीकार केला. चिदंबरस्वामीमध्ये विठाबाईने विठ्ठल पाहिला नसून देवासारखा महापुरुष पाहिला. परंपरेतील सारे देव, स्वतः आणि राजाराम यांना विठाबाईने संत परिवारात पाहिलं,

विठ्ठलाच्या भेटीने विठाबाई एकटी, अनाथ, निराधार उरली नाही. चिदंबरस्वामी, राजाराम यासारख्या सद्गुरुंचा त्यांना आधार मिळाला, स्वतःला विठ्ठल भक्तींच्या परंपरेत गुंतवून घेतले. शेवटी कुटुंबातील नवरा, आई, वडील त्यांना शोधत कुंदगोळा पोहचले मी विठा नाहीच, अशा भावनेनी त्यांच्या बरोबर जाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला पती मारण्यास धावला. विठाबाई निर्भय स्वतंत्र झाल्या होत्या, त्या म्हणू लागल्या, “तुझी सत्ता माझ्या देहावर आहे; माझ्यावर नाही; देह म्हणजे मी स्वतः नाही. नंतर त्या समाधीत तल्लीन झाल्या. आलेले सर्व आप्तेष्ठ ती मेली म्हणून पंढरपूरला निघून गेले; स्वामींनी विठाबाईच्या मस्तकावर हात ठेवला.

संत विठाबाईला वारकरी संतपरंपरेची चांगली ओळख होती. पारमार्थिक ग्रंथाचे त्यांचे वाचन विस्ताराने असावे. संत मीरेच्या चरित्राचा त्यांना परिचय होता. त्यांच्या भक्तीपर अभंगातून फार स्पष्टपणा जाणवतो. संत तुकारामांचे अभंग त्यांनी वाचले असावेत, त्यांच्या अभंगातील संत तुकारामांची मानसिकता त्यांना फारच जवळची वाटत असावी; कारण त्यांच्या अभंगात संत तुकारामांच्या विचाराचा आवेश आढळतो. भक्तिभावनेची स्पष्टताही जाणवते.

आपल्या आत्मचरित्रपर अभंगामधून त्यांनी आपली जन्मकथा कथन केली आहे. आपले गुरु राजाराम (बाभूळगाव, औरंगाबाद) यांचे चरित्र मांडले आहे. विठाबाईच्या बहुतेक रचना या विठ्ठलाच्या संदर्भात असून भक्तिप्रवण आहेत. त्यांनी चिदंबरस्वामी, गुरु राजाराम, निळा, हरी, संत सुशीलम्मा, या विठ्ठलभक्तांची अतिशय सुंदर कथात्म चरित्रे लिहिली आहेत. संत विठाबाईची समाधी तिथी व स्थळ सापडत नाही.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *