ahilyabai-holkar

अहिल्याबाई होळकर

अहिल्याबाई होळकर ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे,तोच स्वकर्तुत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो* असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा 31 मे हा जन्मदिवस…! सर्वधर्मसमभाव ,अस्पृश्यता उच्चाटन ,सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना विषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा …

संत वामनभाऊ महाराज

संत वामनभाऊ महाराज संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज (जन्म – १ जानेवारी, इ.स. १८९१ मृत्यू – २४ जानेवारी, इ.स. १९७६) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिध्दपुरुष, साक्षात्कारी संत होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले आणि …

संत सखू

संत सखू कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते. तिच्या पतीचे नाव होते दिगंबर. तिच्या घरी तिची सासूही रहात असे. तिची सासू फार खाष्ट होती. ती सखूला फार त्रास देत असे. तिचा हरप्रकारे छळ करत असे. तिला उपाशी ठेवत असे, मारहाणही करत असे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू …

संत संताजी जगनाडे महाराज

संताजी जगनाडे महाराज (अंदाजे इ.स. १६२४ – इ.स. १६८८) हे संत तुकारामांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाचे – अर्थात तुकाराम गाथेचे – लेखनिक होते. महाराष्ट्रातील सुदुंबरे गावी त्यांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. बालपण संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या तील मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. …

संत कान्होपात्रा

संत कान्होपात्रा सामान्य कुटुंबात जन्मालाआलेल्या आणि विठ्ठलभक्तिपर अभंगरचना करणार्‍या कान्होपात्रा या इ.स.च्या १५ व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाच्या संतकवयित्री होत्या. पंढरपूर जवळच्या मंगळवेढा येथे त्यांचे वास्तव्य होते. बिदरच्या बादशहाने मागणी घातली म्हणून कान्होपात्रा यांनी पंढरपूरला विठ्ठलचरणी डोके ठेवून प्राण सोडले. विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार घडवणाऱ्या कान्होपात्रेविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांनी बरीच अभंगरचना केली असावी, …