॥ संत राजाई ॥
संत नामदेवांच्या पत्नी राजाई यांची जन्म तारीख, ठिकाण, समाधी यांची माहिती कुठेही फारशी उपलब्ध नाही. नामदेवांच्या गाथ्यात त्यांची नाममुद्रा धारण केलेल्या दहा अभंगरचना उपलब्ध आहेत. संत राजाईंच्या अभंगरचनासुद्धा त्यांच्या प्रपंचावर व संत नामदेवांच्या व्यक्तित्त्वावर प्रकाश टाकणान्या आहेत. राजाईलाही नामदेवांच्या विठ्ठलाविषयीच्या देवपितेपणाची चिंता लागली होती.
संत नामदेवांसारख्या पतीला की ज्याला देवाचे पिसेपण लागले आहे सांभाळून घेताना, संसार करताना होणारा जास संव राजाईने प्रांजळपणे आपल्या अभंगातून मांडला आहे. नामदेवांचे संतपण, विठ्ठलाशी असणारे नाते कुटुंबातील श्री संतांना प्रथम फारसे उमजले नसल्याने लौकिकातील संसारात घरातील कर्त्या पुरुषाने काय करावे, या अपेक्षा संत गोणाईने धरलेल्या आहेत. अर्थात माता गोणाई व पत्नी राजाई यांचा नामदेवांबद्दलचा सूर सारखा असला, तरी अभंगातून व्यक्त केलेली भूमिका अंतरीचा भाव मात्र काहीसा वेगळा आहे. संत गोणाईचा वत्सलभाव, तर राजाईचा पतीविषयी प्रेमभाव आहे.
संत राजाईंची नामदेवांविषयीची तक्रार विठ्ठल ऐकून घेत नसावेत म्हणून आई रखुमाबाईसमोर त्या संसाराची झालेली परवड दुर्दशा मांडताना दिसतात.
खरं म्हणजे लौकिक जीवनातील कुटुंबातील वस्तुस्थितीचे एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीजवळ आपले दुःख, व्यथा, अंतरीच्या भावना मांडाव्यात तशा राजाईने आपल्या अभंगात मांडल्या आहेत. आपल्या समकालीन बरोबरीच्या स्त्रियांचे सुखाचे संसार पाहून राजाईला अधिकच भरते येत आहे. नामदेव सतत विठ्ठलाच्या सान्निध्यात असल्याने मुलाबाळांची, घराची झालेली दयनीय स्थिती संत राजाई सांगतात.
“कन्या आणि पुत्र झाले उपवरी अजोनि न घरी पर प्राणनाथ जन लोकामाजी केले येणे हसे म्हणती लागले पिसे नामवासी । जन्मी न देखे उपाय येणे केले अपाये कोणी सांग माय सुखदुःखा।। “
आपल्या अभंगरचनेमधून संसाराबद्दल राजाईने स्त्रीमनाचे अतिशय हृदयस्पर्शी चित्र स्पष्ट केले आहे. त्यांनी अभंगातून प्रत्यक्ष विठ्ठलाशी संवाद न साधता माता रुक्मिणीशी संवाद साधला आहे. आपल्या मनातील दुःख मातेजवळ प्रत्यक्षात व्यक्त केले आहे. की जेणेकरून रुक्मिणीमाता विठ्ठलाला सांगून घरसंसारातील अडी-अडचणीमध्ये नामदेवांनी लक्ष द्यावे, यासाठी प्रवृत्त करतील. खरा हा हेतू या गाहाण्यामागे होता. अर्थात स्त्रीची व्यथा ही स्त्रीच जाणू शकते, असा भाव संत राजाईजवळ असल्याने त्या रुक्मिणीशी संवाद साधताना दिसतात.
व्यथित झालेल्या संत राजाईंचा जीवनप्रवास पती देवपिसे झाल्याने लौकिकाकडून अलौकिकाकडे होताना दिसतो. पांडुरंगावर असलेल्या आत्यंतिक निष्ठेमुळे नामदेवांचे श्रेष्ठत्व त्या मान्य करतात. अशा विठ्ठलभक्त पतीची पत्नी होण्याचे भाग्य लाभले, याचा त्यांना आनंद वाटतो आणि विठ्ठलाचे चरणी आपल्याला जागा मिळावी, अशी संत राजाई मनापासून अपेक्षा व्यक्त करतात.
“आता ये संसारी मीच धन्य जगी जे तुम्हा अर्धांगी विनटले । परि मला एक वेळ घाला विठ्ठलाचे पायी । विनविते राजाई नामदेवा।।”
संत नामदेवांप्रमाणे देवभक्तीचा आनंद घेण्यातील एक समजूतदारपणाही त्यांच्याजवळ आहे. जणू संत राजाईला देवभक्तीचा साक्षात्कार झालेला दिसतो.
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या