संत राजाई अभंग

संत राजाई अभंग

संत राजाई-एकूण १० अभंग

संत राजाई अभंग – १

आई जे शिकवी तीतें तुम्ही नाईका नाहीं भय शंका लौकिकाची।।१।।
लाखोनि लंगोटी जाती गोसावी आमुची उठाठेवी कोण करी ||२||
ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवन काय करूं ।।३।।
धडचि कांटीये घातले हो कैसें बळेंचि आपणा पिसें लावियेलें ।।४।।
सुखाचा संसार करोनि बारा वाटे नांव केलें मोठे जगामाजीं ।।५।।
तोडियेला मोह सांडियेली माया भुलविले तुमचिया चित्ता कोणें ।।६।।
कवर्णे पुण्य ऐसी जोडियेली जोडी केली बिघडाबिघडी आम्हां तुम्हां।।७।।
तुमचि हे गति लेकुरें नेणति । कोण चालविती घराचार||८||
म्हणोनि माझें चित्त आपुलेनि उद्वेगें। कवणा जीवींचे सांगे सुखदुःख ।।९।।
सर्वस्यें सांडोनि धरिला तुम्ही देव येणें पुसिला ठाव संसारींचा ||१०||
आमची कणव न वाटेचि कांहीं विनविते राजाई नामदेवा।।११।।


संत राजाई अभंग  – २ 

घरधनि याण केला गुरू। बाई मी आतां काय करूं। असोनि नाहींसा संसारू। चमत्कार कृपेचा || १ ||
धांवे पावे गे मेसाई येथें कोणाचें न चाले कांहीं। सत्यपण तुझे ठायीं तरी हैं नाहिसें करी गे ||२||
मंत्र घेतला जैसा। घरीं संताचा वोळसा वोस पडो हरिदासा। गेले नमत मागुते ||३||
काय सांगों याची रीती। सोसे सोसे पाये चरणाप्रती । अवघे भांबडभूत होती। नाचताती आनंदे ||४||
लौकिकांत गेलीं वायां । एकाच्या एक पडती पायां। म्हणती ये गा पंढरिराया। ब्रह्मानंदें डुल्लतां ||५||
भोळी सासू गोणाबाई। पांढरा स्फटिक व्याली पाही । त्यानें जोडिला शेषशायी काय राजाई करूं म्हणे ॥६॥


संत राजाई अभंग  – ३ 

दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत राजाई वृत्तांत सांगे माते ।।१।।
अहो रखुमाबाई विठोबासि सांगा अतारासि कां गा वेडें केलें ॥२॥
स्त्र पात्र नाहीं खाया जेवयासी । नाचे अहर्निशीं निर्लज्जसा ।।३।।
चवदा मनुष्ये आहेत माझ्या घरी हिंडती दारोदारी अन्नासाठीं ॥४॥
बरा मार्ग तुम्ही उमजोनि सांगा नामयाचीराजा भली नव्हे ॥५॥


संत राजाई अभंग  – ४ 

सावध सावध राजाई हो सुखें नामयानें दुःख निरसिलें ||१||
संसार सांतें या येऊनि भाग्याचा छंद विठ्ठलाचा लागला यासी।।२।।
याचें नाम ऐसें न दिसे त्रिभुवनीं नायकों दुर्जे कर्णी नाम्या ऐसें ||३||
वैष्णवांचे गजर टाळघोष दिंडी । उभयतां ब्रह्मांडीं घोष गेला ||४||
तयाच्या दर्शने कलिमाजीं तारिलीं । भाग्यें विनटलीं विठ्ठलेंसी।।५॥
राजाई म्हणे माते रखुमाई बुद्धिवंते आमुच्या अदृष्टार्ते लिहिलें कैसें ॥६॥


संत राजाई अभंग – ५

परियेसी रुक्माई जैसा बैसला पार्टी दैन्य पैं न सोडी काय करूं।।१।।
सदैवाच्या खिया अलंकारमंडित। मजवरी नाहीं प्रीत काय करूं।।२।।
दरिद्रे विश्रांति घातली वो कैसी सांगो कोणापाशीं माउलिये ॥३॥
एकी दिव्य व नेसल्या परिकर मज खंडे जर्जर मिळालेसें ||४||
मोडकें खोंपट वारा येतो भराभराट बहु होती कष्ट कोणा सांगों ।।५।।
कैंची कुसुमसेज कैंचे पटकुळ फाटकी वाकळ अंथरूणा ||६||
कन्या आणि पुत्र जाली उपवरी। अजोनि न घरी घर प्राणनाथ ॥ ७॥
जनलोकांमाजीं केलें येणें हार्से म्हणती लागलें पिसें नामयासी ||८||
जन्मीं न देखे उपाय येणें केले अपाये कोणा सांगो माये सुखदुःख ||९।।
आमुच्या वडिलां शस्त्र सुई आणि कातरी हा बाण आणि सुरी वागवितसे ।।१०।।
एकांतें भाकिलें रुदना करि त्याची नारी चाहियेली सुरी नागनाथ ।।११।।
लज्जेचा हा गांव सांडियेला येणें शिकवावें कोणें माउलिये ।।१२।।
संसाराचा येणें सांडिला पसारा कणव स्त्री बाळा न ये कैसी।।१३।।
नसतां विठोबा नसतां पंढरी तरी हा सुर्खे घरी नांदतां कीं।।१४।।
होणार होऊन गेले शिकवूं आतां काई विनविते राजाई रखुमाईसी ।। १५ ।।


संत राजाई अभंग – ६ 

शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता । कां आम्हां अनाथा कष्टवितो ||१||
न्मोनियां आमुची पुरविली पाटी मोडिली राहाटी संसाराची ॥२॥
आतां आम्ही काय करणे माउलिये चै सालिये कवणाचिये ||३||
माझ्या भ्रतारासी लावियेला चाळा क्षण जी वेगळा न करी त्यासी ||४||
आमुचा वेव्हार विध्वंसिला पाहीं । करुणा माझी कांहीं न ये त्यासी ||५||
सकळाचें मूळ आपणा आधीन केलें येणें जाणें पांडुरंगें।६।।
आपुलें परायें मोहो हा सोडिला आंगोठा मोडिला उपाधीचा ॥७॥
उपधार लौकिक वेव्हार । धरिला निर्धार याचे नामीं ॥८॥
रात्रंदिवस जपे गोविंद हृदयीं । आमुची चिंता कांहीं नलगे त्यासी।।९।।
तुमचे सन्निधानें जालो आम्ही दीन न वाटे निर्माण कैसे तुम्हां ॥१०॥
संसाराचिव्यथा नेणवे सर्वथा होय तें उचिता करणें आम्हां ।।११।।
घरी निरंतर एकचि उत्तर परि हा तुम्ही विचार काय केला ॥१२॥
ा अनुभव अनुभवीं जाणें तुम्हीं समर्थपणें । सदासुखीं म्हणे नामीं तुझ्या || १३||
जन्मोनि अवधी तुमचीं पोसणीं । नेणो तुम्हांवांचोनि कोणी दुजें ।। १४ ।।
कायावाचामनें तुमचिये पाईं। विनविते राजाई जिवलगा ।।१५।।


संत राजाई अभंग  – ७ 

अंगोळिये विठा कडियेसी नारा। राजाई पंढरपुरा चालिबेली।।१।।
भिवरा संपूर्ण जातसे भरवेली। राजाई बोलली कैसें जालें ॥२॥
एकली मी बाळें काय करूं आतां। आहा पंढरिनाथा काय केलें ॥३॥
एक बांधिलें पाठीसी दुजें बांधिलें पोटासी। वेणुनादापाशीं वाहावत गेली ||४||
हंबरडा हाणोनि बोभाये नामया। आवर्ती पडोनियां तळास गेली ।।५॥
योगनिद्रा सारोनि देव जागा जाला । त्वरित पावला काढिली तियें।।६।।
नारा विठा दोघे कडियेसी घेतले। राजाईस धरिलें दक्षिण करीं ||७||
आणिलीं महाद्वारा पुढे दे लेकुरा । विठोबा सामोरा नामा आला ||८||
बाबा बाबा म्हणोनि नारा धाविनला नामा त्या बोलिला परतें होई।।९।।
देखोनि राजाईसी गहिंवरू पैं आला। अरे बा विठ्ठला काय केलें ।।१०।।
वाळेसहित विख घेईन मी आतां पाहे पंढरिनाथा बुडवीन घर।।११।।
मेला सर्प होतां तो ओटिये घेतला खांडोनि घातला डेन्यामाजीं ।। १२ ।।
खाली ज्वाळ पाली उकळी फुटली पोटासी धरिली दोघे बाहें ॥१३॥
देह विठोबासी समर्पण करूं। ऐसा पॅ निर्धारूं धरियेला ||१४||
रुक्मिणी म्हणे देवा अनर्थ मांडिला । नामा बाहेर गेला निश्चयेंसी ।।१५।।
डेरा उघडोनि राजाई जंब पाहे । तोंडभरी भरलाहे अवर्षे सोनें ॥१६॥
राजाईनें धरिले नामयाचे चरण । कृपादृष्टी पाहणें आम्हांकडे ||१७||
विठ्ठल विठ्ठल ऐसें बोलियेला निवांत राहिला घटका चारी ।।१८।।
कांपत कांपत महाद्वारी आला तुझी माव विठ्ठला नकळे कांहीं ||१९||
अष्ट दिशा देवा वरुता आणि खालुता । तुजविण सर्वथा ठाव नाहीं ॥२०॥
तंव नामदेव निजला देखिला। अंतरीं उठिला विठ्ठल ध्वनी ।। २१ ।।
राजाई म्हणे प्रयत्न न चले तेथे आतां । प्रार्थं पंढरिनाथा बहुतांपरी ।।२२।।
राजाईनें धरिले विठोबाचे पाय । कृपादृष्टि पाहे आम्हांकडे ।। २३॥


संत राजाई अभंग  – ८ 

ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बायें दिधलें ऐशियासी ।।१।।
खाया ना जेवाया लेया ना नेसाया। दैन्य भोगावया आलें जन्मा ||२||
जयाचि करीं भक्ति त्याचेंचि करणें घरोघरी हिंडणें न चुके माझें ।।३।।
लाज सांडुनियां निलाजरा जाला सूड पडसूड मारिला जोग ज्याणें ||४||
देवासुरीं वाहिली तेचि देना आली उचित राहिली तेहनि ||५||
ऐसी भक्तकांता मनी वा चिंता काय जाला करिता पंढरिराय॥ ६ ॥
वेष वाणियाचा सर्वे बैल द्वयाचा म्हणे नामा आमुचा केउतां गेला ॥७॥
बिद उमा राहिला घर पुसों लागला म्हणे नामा राहिला कोणें ठायीं ॥८॥
सांगितलें बिराड तुळसीवन अपार । तेंचि जाणा घर नामयाचें ॥९॥
बाहेर तरी कोणी बैसलासे द्वारीं । बोलविली नारी नामयाची ||१०||
अहो घ्याहो बाई हे ठेवावी गोणी नामा येतो परतोनी येईन मी ।।११।।
येरी म्हणे तुम्ही त्याचें काय जाणा । आपुली नाम खुणा सांगा तुम्ही ।।१२।।
नाम पुसेल तरी केशवशेटी सांगावें लागेल तितुकें बेचायें हैं द्रव्य ।।१३।।
आणिक मज मागावें कांहीं न ठेवावें । माझें क्षेम सांगावें सखा म्हणोनि ।।१४।।
इतुकें बोलुनि देव पाठमोरा जाला। सवेंचि घरा आला विष्णुदास ।। १५ ।।
म्हणे कैंची गोणी टाकुन गेला वाणी । परि आम्ही कोणी ओळखूं ना।। १६ ।।
त्यानें नांव केशवशेटी म्हणितलें। तंव धेरें जाणिलें माझा देव ।।१७।।
कां गे धांवा केला देव माझा कष्टला। अपराध जाला तुजपाशीं ।।१८।।
राजाई म्हणे आम्हां थोर लाभ जाला। बिडवई भेटला केशवी ।।१९।।


संत राजाई अभंग – ९ 

नामदेवा घरी पाहुणे मेहुणे आले दोघेजण पंढरिसी ।।१।।
राजा बंधु देखुनि दृष्टिसी उल्हास मानसी थोर जाला ॥२॥
कडकडूनि भेटि लोभाची आवडी टाकली घोंगडी वैसावया ॥३॥
प्रतार लागले विठोबाचे ध्यानीं संसाराची मनीं आस्था नाहीं ||४||
नाचतो निर्लज्ज होऊनि निःशंक सांडिला लौकिक देहभाव ॥५॥
ऐसें जंव सांगे राजाई बंधुसी। तंव आले घरासी नामदेव ।।६।।
तयासी सोयरे अभ्युत्थान देती । न भेटे तयासी विष्णुदास।।७।।
देखुनी कांतेसी क्रोध आला फार असोनि संसार नाहीं आम्हां ||८||
अगडधूत येती घेऊनि टाळविणा । लागे त्यांचे चरणा वेळोवेळां ।।९।।
जन्मामध्ये आले माझे सहोदर न बोले उत्तर त्यांसी कांहीं ।। १० ।।
भोंदु घरी येती हरिनामें गर्जती । धुवुनि त्यांचें पिती पायावणी ।।११।।
माझे सखे बंधु घरा आले बाई रामराम तोहि न घे त्यांचा ॥ १२ ॥
नामा म्हणे कांते राम हृदयांत सांठवुनी तृप्त जालों आम्ही ॥१३॥


संत राजाई अभंग  – १० 

राजाई तें पुसे अहो नामयाला करा जेवायला कांही यासीं ।। १ ।।
प्रातःकाळी घरी सारूनि भोजन । आले ते चालून माझे भेटी ॥२॥
नामा म्हणें कांते दशमी एक भुक्ति भोजन निश्चिती करूं नये ||३||
उदईक हरिदिनी उपवास जागरण ऐकायें कीर्तन चार प्रहर।१४।।
द्वादशी पारणें जालिया भोजन ऐकोनी पाहुणे चिंतातुर ।।५।।
क्षुधातुर पोटीं निद्रा नलगे कांहीं । वर्षाएवढी पाही रात्र जाली ॥६॥

(संत नामदेव गाथेतील आत्मनिवेदनपर अभंग संत राजाईच्या नाममुद्रा असलेले अभंग)


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *