सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज

सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज

द्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज


सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज हे मुळचे बीड जिल्ह्यातील पिठी नायगाव चे बाबांचा जन्म 1929 मध्ये पिठी या गावी झाला बाबांच शिक्षण पहिली बाबांचे गुरु काशिगिरी महाराज बाबांना बालवयापासून पांडुरंगाच्या भक्तीची आवड होती बाबा गाईगुरे चारण्यासाठी जंगलात जात दिवस भर पांडुरंगाचं भजन चिंतन रत असत वाळु मध्ये महादेवाची पिंड तयार करणे तरवडा चे फुलं वाहणे असा बाबांचा नित्यनियम होता गाईंची सेवा करत .
नंतर बाबांनी निश्चय केला पंढरीला राहण्याचा जवळच काशी गिरी महाराज यांच्या सोबत राहण्याचा निश्चय केला पण आई वडील ते मान्य करत नव्हते ते बाबांना घरी चल तुझं लग्न करू कसे असे बाबांना म्हंटले बाबांनी सांगितले मला लग्न नाही करायचे त्यांनी बाबांना न विचारता लग्न जमवले व त्या वेळेस बाबांना समजले आपलं लग्न आहे त्यावेळेस बाबा पळून गेले व जवळ या जवळ वाघोबाची वाडी या गावी बाबा संन्याशी म्हणून बाबांनी दऱ्यांमध्ये बत्तीस वर्ष लिंबाचा पाला खाऊन तपश्चर्या केली नंतर बाबा नगद नारायणाच्या गडावर दहा-बारा वर्ष गाई वळल्या नंतर बाबांनी पुढे जाण्याचा विचार केला बाबांच्या जवळ वाघाचा आखाडा ही वाडी आहे रामचंद्र होते हे नगर जिल्ह्याची संबंधित होते त्यांनी बाबांना नगर जिल्ह्यातील तांदुळनेर या गावी आणले बाबांनी तेथे बिरोबा ची सेवा व मंदिराची उभारणी केली एक दिवस संत कवी महिपती महाराज यांचा दृष्टांत बाबांना झाला महिपती महाराज यांनी बाबांना सांगितलं की माझ्या समाधीवर गवत उगवलं आहे तुम्ही माझ्या जवळ या मग बाबा ताराबाद या गावी पंचाळीस वर्ष संत कवी महिपती महाराज यांची सेवा केली मंदिर उभारणी केली बाबा भिक्षा मागून वल्ल्या वस्ता री कोणाला न शिवता जेवण करायचे स्वयंपाक स्वतः बनवायचे बाबांना रिद्धी सिद्धी प्राप्ती होती बाबांनी ताहाराबाद ते पंढरपूर आषाढी कार्तिकी वारी सुरू केली काही कारणास्तव बाबांनी तहाराबाद सोडलं रामेश्वर वरवंडी येथे म्हातारपणात रामेश्वराच्या मंदिराची उभारणी केली संत कवी महिपती महाराज यांची मूर्त वरवंडी या गावात प्राणप्रतिष्ठा केली विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधलं बाबांना वरवंडी येथे करमत नसेल मग बाबांनी खळी कांगणवाडीमध्ये डोंगराच्या दऱ्यात मध्ये दत्त देवस्थान आहे या देवस्थानाचा बाबांनी उद्धार केला बाबा तेथे राहू लागले बाबांनी अद्भुत कला म्हणून एक झरा खनला उन्हाळा पानकाळा या पाणी असतं काही दिवस वरवंडी तर काही दिवस उंबरेश्वर या ठिकाणी स्थायिक होत होते बीड जिल्ह्यामध्ये संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांच्यावर बाबांची खूप श्रद्धा प्रेम जिव्हाळा होता बाबांनी भक्ती विजय मध्ये शेख महंमद महाराज यांचे वर्णन ऐकले बाबांनी शेख मोहम्मद महाराजांची जन्मभूमि कोठे आहे शोधाशोध सुरू केली व बैलगाडीने प्रवास करीत करीत ते वाहिरा या नगरीत आले 28 वर्ष शेख महंमद बाबांची सेवा केली बाबांनी पांडुरंगाच्या मंदिराची भव्यदिव्य उभारणी केली अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला पंढरीची दिंडी सोहळा सुरू केली


शेवरे तालुका माढा जिल्हा सोलापूर

अशी बाबांची खूप मोठी स्थळे निर्माण झाली बाबांनी संगमनेर नगर जिल्ह्यातील संपूर्ण गावागावातून हरी नामाची आवड कशी निर्माण होईल हे प्रयत्न करीत राहिले गावोगाव सप्ताह सुरू केला भिक्षा सुरू केली दिंड्या सुरू केल्या बाबांचं वय 107 होतं बाबांनी रामेश्वर वरवंडी या गावी देह ठेवला त्यानंतर बाबांनी ह भ प महंत मठाधिपती दत्त गिरी महाराज यांना गादीवर घेतले व अखंडपणे बाबांची वाट ठेवत आहे इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गंगनवरी या म्हणीप्रमाणे चालू आहे.


 ठिकाणे :-

  • माणिक गड वाहिरा तालुका आष्टी जिल्हा बीड
  • रामेश्वर वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
  • उंबरेश्वर तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर
  • दत्त गिरी विठ्ठल विसावा आश्रम शिंदोडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर
  • गोशाळा विठ्ठल विसावा पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर आळंदी जिल्हा पुणे

या ठिकाणी बाबांचे मोठमोठे आश्रम फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह माणिक गिरी बाबा यांनी सुरू केलेला आहे आळंदी पंढरी त्र्यंबकेश्वर पैठण या ठिकाणी बाबांनी दिंड्या सुरू केल्या लाखो भक्त मंडळ बाबांनी तयार केले

२४.०६.२००९ या रोजी माणिक बाबांनी देह ठेवला ठिकाण रामेश्वर वरवंडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर


माहिती :-
ह भ प गणेश दत्तगिरी महाराज माणिक गड वाहिरा ता .आष्टी जि. बीड.


सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *