आमच्या संसाराचा घेतला असे भार – संत माणकोजी बोधले अभंग
आमच्या संसाराचा घेतला असे भार। स्वामी विश्वंभरा पांडुरंगा ॥१॥ तुझिया उपकाराच्या जाल्या बहुत रासी । त्या तुझ्या तू जाणसी कोणा सांगो ॥२॥ त्रिभुवनी एक दाता तूचि गा समर्था । निवरिली व्यथा संसाराची ॥३॥ ऐसा आम्हा दिना का केला अंगिकार । तू आमचे माहेर पांडुरंगा ॥४॥ तू आमचा माता पिता सोयरा इष्ट बंधू । तुजसि समंधू आमचा देवा ॥५॥ बोधला म्हणे तुज वाचुनी नेणे काही । चित्त तुझे पायीही बैसलेसे ॥६॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
आमच्या संसाराचा घेतला असे भार – संत माणकोजी बोधले अभंग