संत माणकोजी बोधले अभंग

धन्ये ते पंढरी पुन्ये पावन – संत माणकोजी बोधले अभंग

धन्ये ते पंढरी पुन्ये पावन – संत माणकोजी बोधले अभंग


धन्ये ते पंढरी पुन्ये पावन ।
जेणे तारियेले विश्वलोक ॥१॥
धन्ये तेणे पावन केले ।
आम्हासी दाखविले निज सुख रे ॥ २॥
धन्ये ते भीमा चंद्रभागा ।
धन्ये ते भूमी वैकुंठ रे ॥३॥
धन्ये पांडुरंग धन्य पुंडलिक ।
पुण्ये जाली उत्कृष्ट रे ॥४॥
धन्ये नामदेव नाम च भरला ।
हाता आले नवनित रे ॥५॥
संत साधुजन जेवविले जेणे ।
आवघे केले संतृप्त रे ॥६॥
तेथे वडिलाचे धान्य वाटत आहे ।
म्हणोनि कानी आइकिली मातु रे ॥७॥
ते देती न देत म्हणोनी ।
भित भित गेलो तेथ धणि भेटला अवचिते रे ॥८॥
त्याणे भेउ नको म्हणोनि नाभिकार दिल्हा ।
मस्तकी ठेविला हात रे ॥९॥
आमचे आम्हासि देवूनी ।
त्याणी सुखी केले सावचित रे ॥ १० ॥
बोधला म्हणे घ्या रे घ्यारे तुम्ही ।
नका राहु दुचित रे ॥११॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धन्ये ते पंढरी पुन्ये पावन – संत माणकोजी बोधले अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *